पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.26/2/21
या वर्षीचे मुल्यमापन तसेच नवे शैक्षणिक वर्ष धोरण बाबत राज्य शासनाकडून स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. या बाबत चे निवेदन सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले.
कोरोनाच्या संसर्गामुळे आठ ते नऊ महिने सर्व प्राथमिक शाळा बंद आहे गेल्या महिन्यापासून पाचवी ते आठवीचा वर्ग सुरू झाले असून सध्या पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत यावर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे परंतु ऑनलाईन अध्यापनात अनेक अडचणी पालकांकडे मोबाईल फोन , इंटरनेट सुविधा नसणे इ. निर्माण होत आहेत त्यामुळे सध्याच्या शैक्षणिक वर्ष हे रद्द करणे तसेच नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू करणे याबाबत पालक आणि विद्यार्ध्यी यांच्यात संभ्रम निर्माण झाले आहे.
यावर उपाय म्हणून या वर्षाची शैक्षणिक वर्ष रद्द केल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे सदरची शैक्षणिक वर्ष रद्द न करता 40: 60 या सूत्राचा वापर करून अर्थात इयत्ता पहिली चा नवीन वर्ग 15 जून पासून सुरू करणे व दुसरीच्या वर्गापासून गेला इयत्तेचा सुरुवातीचा 40 टक्के भाग हा ( चार महिने ) मागील वर्षाचा अभ्यास पूर्ण करून घेणे व 60 टक्के भाग हा ( ६ महिने ) त्याच वर्गातील अभ्यास पूर्ण करून घेतल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले जाईल.
त्याच बरोबर दिल्ली सरकारने पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द केले आहे त्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन पद्धतीमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत राज्य शासनाने योग्य ते आदेश द्यावेत अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात महासंघाचे राज्य उपाध्यक्ष एम.डी. पाटील कार्याध्यक्ष संतोष आयरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, राजाराम संपकाळ ,नितीन पानारी, टी. आर. पाटील ,एस वाय पाटील, अभिजीत साळोखे ,संतोष पाटील, राज मेंगे ,स्नेहल रेळेकर, दशरथ कुंभार ,कैलास भोईटे , युवराज गायकवाड यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
लेखी निवेदन सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना देताना कार्याध्यक्ष संतोष आयरे राज्य उपाध्यक्ष एम डी पाटील विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे व इतर.