कोल्हापूर प्रतिनिधी
**_कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण
समिती ,कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती उत्साहात संपन्न झाली. शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे केंद्र मुखाद्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकातील महिलांनी सक्षम व अभ्यासू असणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबातील शिक्षणाचा व संस्कृती,संस्कार यांचे विचार समाजातील व्यावहारिक जीवन जगत असतांना उपयोग करावा.कोरोनाकाळींन आपत्तीमुळे घराचे आर्थिक व्यवस्था कोलमडून पडत आहे.त्यावर उपाय म्हणून आपल्या अंगी जे कौशल्य असेल त्याचा वापर करून उधोजक बनले पाहिजे.राजमाता जिजाऊ यांनी ज्याप्रमाणे शिवरायांना लहान वयात असतांना रामायण, महाभारत यामधील असणाऱ्या चांगल्या उपदेशपर गोष्टी सांगून कठीण प्रसंगी संस्काराचे योग्य असे वळण लावल्यामुळेच शिवरायांच्या मनावर त्याप्रमाणे संस्कार घडत गेले.तेंव्हाच्या काळातील शिक्षण हे स्वराज्याची निर्मिती व आत्मसंरक्षण कसे करणे याला महत्व दिले होते. व्यायाम, दांडपट्टा, कुस्ती,भालाफेक,किल्यांची माहिती घेणे,पाण्याची व्यवस्था, धान्य कोठार, पिकांना संरक्षण देणे, यासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडत असत.त्यामुळेच स्वराज्यात सर्व जाती,धर्म एकमेकांना विचारांचा सन्मान राखत असत.
आज एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत त्यामुळे समाजातील तरुणांनी शिवरायांचे संस्कार,विचार यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.देशाला व समाजातील प्रगतीकडे नेणारे शिक्षण घेऊन देशासाठी झटले पाहिजे तरच खरी शिवजयंती करण्यास पात्र आहोत.तरुणाने व्यायाम, अभ्यास, नवीन तंत्रज्ञान, त्याच बरोबर जीवन कौशल्य कसे वापरावे याचा विचार केला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्यासाठी कसा करता येईल ह सुद्धा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन केले.
सोशल डिस्टनस च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
नंबर आलेल्या विदयार्थ्यांना केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,उत्तमराव कुंभार, फायरमन संभाजी ढेपले, विजयसिंह पाटील ,रोहन लकडे यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी सुशील जाधव, विद्या पाटील,अश्विनी पाटील,मंगल मोरे,अभिषेक बिरणगे,तनिष्का पाटील, समीक्षा जामदार,अस्मिता लोंढे,समर्थ कांबळे, जान्हवी ताटे, अक्षरा लोंढे, पायल पाटील,श्रावणी पाटील,हेमांतकुमार पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सोशल डिस्टनस चे नियम पाळून कार्यक्रम शिस्तबद्ध करण्यात आला.
आभार प्रेम महेश कापसे यांनी मानले.