कोल्हापूर / प्रतिनिधी
दि16/2/21
किरण शिंदे यांना आविष्कार फौंडेशनचा राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पणजी मडगाव येथे आविष्कार फौंडेशनचा राष्ट्रस्तरीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भारताचे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
किरण शिंदे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून आविष्कार फौंडेशन मार्फत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमासाठी आविष्कार फौंडेशन चे अध्यक्ष संजय पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उज्ज्वला सातपुते आदींसह मान्यवर उपस्थित होते.