________________________
कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.21/2/21
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघा मध्ये आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते.
मुंबई येथील आझाद मैदानावर प्रचलित नियमानुसार अनुदान मागणी साठी आंदोलन सुरू असून शासनाने कारण नसताना तपासणीचा घाट घातला. या दरम्यान शासनाने तपासणी करून अनुदान पात्रतेसाठी याद्या जाहीर केल्या परंतु कोल्हापूर विभागाची तपासणी मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांनी केली पण त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी यांनी वेळेत मागणी करुन देखील शासनास सादर केला नाही.त्यामुळे १०९ ज्यु.काॅलेज मधील शेकडो शिक्षक वेतना पासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.वेतना पासून गेली अनेक वर्षे वंचित असलेल्या शिक्षकांना आत्महत्या करणेची वेळ आली आहे.ज्या अधिकारऱ्याच्या हलगर्जीपणा मुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे त्यांची चौकशी होऊन शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि सदर १०९ ज्यु.काॅलेजना अनुदान द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे वतीने सोमवार दिनांक २२फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११वाजल्या पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे एस.डी.लाड यांनी घोषित केले.
सदर बैठकीस वसंतराव देशमुख , खंडेराव जगदाळे, इरफान अन्सारी,आर.वाय.पाटील,डी.एस.घुगरे,पी.एस.हेरवाडे,एस.एस.चव्हाण, संदीप पाटील ,सुधाकर सावंत,बी.डी.पाटील, गजाननकाटकरपोतदारएस.एन.वरपे ,एस.एम.पाटील,आर.डी.पाटील,पी.एस. घाटगे, आदी मान्यवरांसह शिक्षक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना एस.डी.लाड, आर.वाय.पाटील,वसंतराव देशमुख , इरफान अन्सारी, खंडेराव जगदाळे