Wednesday, 29 December 2021

हेरले पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन

हेरले / प्रतिनिधी

हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांना हेरले पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत निराधार योजनेतील पेन्शनसाठी दिव्यांग बांधवाना उत्पन्नाची अट शिथिल करावी व सर्व दिव्यांगांना रेशन कार्डवर अंत्योदय योजनेतून धान्य मिळावे या बाबत चर्चा झाली. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांना आदेश देऊन प्रलंबित  १५ रेशन कार्ड तात्काळ देण्याच्या सूचना केल्या.
   यावेळी माजी उपसरपंच  राहुल शेटे, वेद अपंग सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष  शिवाजी भोसले, अमित पाटील, सुधीर चौगुले, कपिल पाटील, अशोक राजमाने व हालोंडी, चोकाक, अतिग्रे गावचे दिव्यांग प्रतिनिधी होते.
       फोटो 
हातकणंगले तहसीलदार  कल्पना ढवळे यांना हेरले पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन देतांना माजी उपसरपंच राहूल शेटे शिवाजी भोसले ,अशोक राजमानेसह  अन्य

स्पर्धा परीक्षेत विध्यार्थ्यांनी सातत्य ठेवावे : सपोनि राजेश खांडवे


    हेरले / प्रतिनिधी                   
                        
स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि होत असलेली गर्दी लक्षात घेता त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सातत्य आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी काढले.     
     शिये (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समिती यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या एमपीएससी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच रेखाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील प्रमुख उपस्थित होते.
      सपोनि खांडवे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलले आहे.मात्र या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थ्यांचा टक्का देखील वाढलाय. या स्पर्धा परीक्षेत करवीर तालुक्याचा टक्का इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी असल्याने हा टक्का वाढण्यासाठी शिये ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती आणि गावातील सर्व संस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरी हॉल येथे एमपीएससी प्रशिक्षण, मार्गदर्शन वर्गाची सुरुवात करणे गौरवास्पद आहे.       
 यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, नव्याने नियुक्त झालेले पोलीस उपधीक्षक विपुल पाटील, तहसिलदार संदीप पाटील यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यशाचा कानमंत्र दिला. या प्रशिक्षण वर्गास ४० हून अधिक विध्यार्थी उपस्थित होते. 
    यावेळी पोलीस पाटील मनीषा सिसाळ, हनुमान सेवा संस्थेचे माजी चेअरमन हणमंत पाटील, महादेव दूध संस्थेचे चेअरमन किरण चौगले ,प्रभाकर काशिद, तेजस्विनी पाटील, उत्तम गाडवे, पिलाजी मगदूम,शहाजी काशीद, जगन्नाथ बुगले, बाळासाहेब माने,यशवंत मगदूम, प्रकाश पाटील प्रवीण चौगले, आप्पासो सिसाळ आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
    प्रास्तविक जालिंदर शिंदे यांनी केले. सुत्रसंचलन आसिफ पठाण यांनी केले.तर आभार विश्वास चरणकर यांनी मानले.
................................
फोटो : शिये : येथील एमपीएससी मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करताना सपोनि राजेश खांडवे, सरपंच रेखाताई जाधव , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील व इतर मान्यवर.

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन च्या विद्यार्थ्यांची इंस्पायर अवार्ड साठी निवड


हेरले / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेजच्या दोन  विद्यार्थिनींची इंस्पायर अवार्ड साठी निवड झाली आहे.
 कु. गायत्री शिवाजी अकिवाटे  इयत्ता नववी व कु भावना सागर भोसले इयत्ता सातवी यांची भारत सरकारच्या राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने संशोधन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट नवनिर्मितीसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय इंस्पायर अवार्डसाठी निवड झाली.
    विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय जीवनापासून विकास व्हावा यासाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये विविध वैज्ञानिक उपकरणे तसेच आणि सामाजिक समस्याचे निराकरण करणारे वेगवेगळे प्रकल्प सादर केले जातात.
    या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती जाहीर झाली  आहे.
  या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र माने सर यांचे सहकार्य लाभले तर शालेय विज्ञान विभागाचे शिक्षक श्री डोंगरे बी . ए. सर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली तसेच सर्व विज्ञान विषय शिक्षकांचे सहकार्य मिळाले.

Monday, 27 December 2021

डॉ. बी.एम.सरगर यांची प्रोफेसरपदी निवड

कोल्हापूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर चे रसायशास्त्र विभागाच्या एम एस्सी या पदव्युत्तर विभागाचे प्रमुख समन्वयक डॉ.बी.एम.सरगर यांची नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या कॅस अंतर्गत प्रोफेसर या सर्वोच्च पदावरती पदोन्नती झाली. संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर हे यश त्यांनी मिळविले आहे. या आधी ते सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत होते.
शिक्षण क्षेत्रात प्रोफेसर पद हे सर्वोच्च व प्रतिष्ठित मानले जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवाल व शिफारशीवरून ही पदोन्नती दिली जाते. प्रोफेसर पदासाठी विद्यापीठाकडून विविध निकष लावले जातात. यासाठी तज्ज्ञ समितीपुढे प्राध्यापकांना विशिष्ट निकषांची पूर्तता व त्यांचे संशोधन कार्य सादर करावे लागते.
प्रोफेसर डॉ. सरगर हे जयसिंगपूर कॉलेज मध्ये गेली १९ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत असून सध्या ते एमएस्सी रसायनशास्त्र या विभागाचे प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ३५ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. सौर ऊर्जा, फोटोकॅटालायसीस, गॅस सेन्सिंग, सॉल्व्हन्ट एक्सट्रेक्शन या संशोधन क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत २ विद्यार्थ्यांनी आपली पीएच. डी प्रबंध सादर केला आहे तर ४ विद्यार्थी पीएच डी शिक्षण घेत आहेत. तसेच ते भारतातील अनेक विद्यापीठाचे पी.एच.डी परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
डॉ. सरगर हे नेहमीच मूलभूत व समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात. आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला चालना दिली आहे. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
या निवडीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Sunday, 26 December 2021

मौजे वडगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. गावठाण पासून रस्ता सुरु करावा या मागणीवर शेतकरी ठाम .

हेरले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाणपासून सुरू न केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. या अगोदर गावातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता यांना रस्ता गावठाणपासून सुरु करावा अशा मागणीचे लेखी निवेदनही दिले होते. परंतु ठेकेदाराने आपली मनमानी करीत ठिकाणी अर्धवट रस्ता सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या खडी व मुरुमाचा भरावा पास करून ऊस वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. सदर रस्त्यावर याअगोदर उसाची वाहने पलटी झाली असून वाहनांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठेकेदारांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली आहे .
          सदर रस्त्याची सुधारणा ही गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होत आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गावठाण ते पाझर तलाव रस्ता करण्याचे ठरले असून सदर कामाची वर्कऑर्डर तशीच आहे. परंतु गावापासून पाचशे ते सातशे मीटर अंतर सोडून रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले आहे .त्यामुळे वर्क ऑर्डर नुसार काम न केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम बंद पाडले .तसेच सुरुवातीपासून काम चालू करा अन्यथा काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
        यावेळी मनोहर चौगले, बाळासो थोरवत, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश कांबरे, विलास सावंत, भुपाल चौगुले ,गुणधर परमाज, विलास येलाज, शितल परमाज, तानाजी सावंत ,स्वप्नील चौगुले, बाळासो पाटील, गणपती कदम, दगडू थोरवत, अमर सावंत, यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

         प्रतिक्रिया
 गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरु करावा सुरुवातीपासून रस्ता चालू न केल्यास पुढचा रस्ता सुरू करू देणार नाही .
   मनोहर चौगले - शेतकरी

        प्रतिक्रिया
 ठेकेदार जरी रस्त्या संदर्भात वर्क ऑर्डर नुसार रस्त्याचे काम करीत नसेल व प्रशासनाचा  आदेश मानत नसेल तर त्या ठेकेदाराला काळया यादीत  टाका. 
    माजी उपसरपंच सुरेश कांबरे -शिवसेना शहर प्रमुख
 
 
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रोलर आडवून रस्त्याचे काम बंद पाडले.

Monday, 20 December 2021

शिक्षकांनी त्यांची शक्ती, युक्ती आणि सक्ती केली नसती तर गुणवंतांची यशस्वी बॅच घडली नसती.- - नागाव हायस्कूल माजी विद्यार्थ्यांच्या भावना.

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिक्षकांनी त्यांची शक्ती, युक्ती आणि सक्ती केली नसती तर गुणवंतांची यशस्वी बॅच घडली नसती. नागाव हायस्कूल नागावच्या सन १९९२ - ९३ सालच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या या भावना.  वयाची साठी पार केलेले शिक्षक आणि त्रेचाळीस पार विद्यार्थी - विद्यार्थीनींंच्या  तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर जमलेल्या स्नेहमेळाव्यात व्यक्त झाल्या. कोल्हापूर येथील हाॅटेल पॅव्हिलियन येथे हा कार्यक्रम झाला. 
विद्यार्थी आमच्यापेक्षाही जास्त शिकले आणि आपापल्या क्षेत्रात ते यशस्वी ठरले यापेक्षा आणखी मोठी गुरुदक्षिणा एका शिक्षकासाठी असू शकत नाही, असे मत निवृत्त मुख्याध्यापक अशोक मुंडे यांनी व्यक्त केले. आमचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, तसेच विविध क्षेत्रात कर्तबगार बनले हे पाहून आपणास समाधान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. 
शिक्षणात मन रमत नव्हते. म्हणून शाळेत जाणे बंद केले. पण त्यावेळी शिक्षकांनी जबरदस्तीने शाळेत नेले. अगदी पेनापासून लागणारे साहित्य दिले. म्हणूनच आज आपण रत्नाकर बँकेच्या वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत पोहचू शकलो असे राजेंद्र बेळंके यांनी सांगितले. 
साम, दाम, दंड, भेद या चतूसुत्रीचा वापर करून शिक्षकांनी अभ्यास करून घेतला. त्यामुळे एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांना हाताळणे कठीण जात नाही, असे शोभा कांबळे यांनी सांगितले. 
शिक्षणाचा पाया भक्कम झाल्याने उद्योग - व्यापार आणि राजकीय क्षेत्रात आपण यशस्वी ठरलो असे पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी सांगितले. 
यावेळी ए. के. चौगले, आर. टी. चौगुले, श्री. ठिकणे, श्री. कांबळे, सौ. स्वामी, सौ. चौगले,  प्रकाश लंबे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. 
पोलिसपाटील बाबासो पाटील, संदिप पाटील, शितल पाटील, सुनील सावंत, प्रविण चौगुले, माणतू कोळी, शिवाजी हराळे, सुनिल नागावकर, माणिक नागावकर, मिलिंद जोशी, अभिजित कुलकर्णी, सागर पाटील,  वैशाली मगदूम, रेशमा राजहंस, माधवी लंबे, अर्चना शिरगावे, सरिता लंबे, संगिता यादव, मनिषा यादव,    आदी उपस्थित होते. 
डॉ. धनाजी घाटगे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. 
संगीता बोरगावे यांनी प्रास्ताविक केले. 
गोविंद नागावकर यांनी आभार मानले. 
.......................
फोटो
नागाव : स्नेहमेळाव्यास उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी 
.........................................................................................

Friday, 17 December 2021

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनमध्ये सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन.



पेठ वडगाव / प्रतिनिधी
        
  सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलीत छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेचा शैक्षणिक वर्ष 2021 / 22 साल चा वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दीपप्रज्वलनाने व क्रीडा ज्योतीच्या व शस्त्र पूजनाने झाली. 
   प्रमुख पाहुणे एम.आय.डी.सी. शिरोली पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक  राजेश खांडवे म्हणाले गरीबीचे चटके सोसलेले व आई-वडील यांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती जीवनात कधीही वाया जात नाही.  खेळातून मनुष्य शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होतो त्यामुळे आयुष्यातील संकटाला सामोरे जाताना आपणाला बळ देतात. त्यांनी आपल्या पोलीस सेवेतील काही चित्तथरारक अनुभवाचे उदाहरणेही दिली.
    प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुरेख कवायत संचलनाच्या माध्यमातून  उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कुस्ती मल्लखांब कराटे रोप स्किपिंग व लाटीकाठीच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि सर्वच उपस्थितांची मने जिंकली.
   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान  विष्णू जोशीलकर विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, आयुष्यात खडतर प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरे जा कोणत्याही परिस्थितीत यश तुमचेच असेल.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक  राजेंद्र माने यांनी आपल्या भाषणातून प्रशालेच्या खेळाची दैदिप्यमान  अशी परंपरा सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच उत्तम करियर घडवण्याचा राजमार्ग या अनुषंगाने खेळाचे महत्व पटवून सांगितले.
     कार्यक्रमास राष्ट्रीय कुस्ती खेळाडू  जयदीप जोशिलकर,  मिणचे सरपंच रंजना जाधव,उपसरपंच अभिनंदन शिखरे, संस्थेचे खजानीस  बापुसो माने, क्रीडा महोत्सव प्रमुख  सागर आवळे, प्रशालेचे विभाग प्रमुख सासणे, एम आर पाटील, किशोर इंगळे, बाजीराव डोंगरे, जिमखाना प्रमुख  आनंद पाटील, दिशा इंग्लिश मीडियम स्कूल क्रीडा प्रमुख पी के चौगुले , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी कार्यक्रमास उपस्थितीत होते.  सूत्रसंचालन  एस.जे.सासणे व एम आर पाटील यांनी केले तर आनंद पाटील  यांनी  आभार मानले.

      फोटो 
छत्रपती शिवाजी व विद्यानिकेतन व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेत सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सव चे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचा सत्कार करतांना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माने सपोनि राजेश खांडवे व मान्यवर.

कठोर परिश्रम हाच क्रीडा स्पर्धेतील यशाचा गुरुमंत्र आहे-आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिज्ञा पाटील.


पेठ वडगाव / प्रतिनिधी

    हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथील आदर्श विद्यानिकेतन ॲण्ड ज्युनियर कॉलेज मिणचे या प्रशालेचाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
   या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय नेमबाज  अभिज्ञा पाटील, राष्ट्रीय खेळाडू दीपक बागल, सोएब शिकलगार, अक्षय जाधव, बॉडी बिल्डर शिवप्रसाद सातपुते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, सचिव एम. ए. परीट, क्रीडा विभाग प्रमुख  शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्रशालेतील राष्ट्रीय खेळाडू हर्षवर्धन केकेले, पार्थ खोत, अथर्व साळवे या खेळाडूंनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व खेळाडूंना अमरिष बहिरगौडे यांनी क्रीडा शपथ दिली. उद्घाटन प्रसंगी कुस्ती, आर्चरी, मलखांब, योगा व बॉडी बिल्डिंगचे चित्तथरारक प्रात्यक्षिके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  क्रीडा विभागाचा अहवाल जिमखाना प्रमुख शिवाजी पाटील यांनी सादर केला. आपल्या मनोगतातून आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील ने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदका  पर्यंतचा प्रवास कसा खडतर होता व कठोर परिश्रमाशिवाय ते साध्य करता आला नसता हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितला व वार्षिक क्रीडा महोत्सव साठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे माजी विद्यार्थी व  राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू शिकलगार यांनी मैदानावरील अनुभवांचा जीवन प्रवासात पावलोपावली उपयोग होतो हे नमूद केले. इचलकंजी येथील प्रसिद्ध बॉडी बिल्डर शिवप्रसाद सातपुते यांनी आपल्या खेळाडूंना सोबत घेत बॉडी बिल्डींगची चित्तथरारक प्रात्यक्षिके व महत्त्व विशद केले.
    संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे यांनी  प्रशासनाच्यावतीने विद्यालयांमध्ये चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमाचे आभार डॉ. डी. एम. शेटे यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप तोडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुगल मीट द्वारा पालका पर्यंत पोचवण्यात आले.

        फोटो 
 वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ज्योत प्रज्वलीत करतांना आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील, राष्ट्रीय खेळाडू दीपक बागल, सोएब शिकलगार, अक्षय जाधव, बॉडी बिल्डर शिवप्रसाद सातपुते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, सचिव एम. ए. परीट, क्रीडा विभाग प्रमुख  शिवाजी पाटील आदी मान्यवर.

Wednesday, 15 December 2021

शिक्षकांनी आण्णांच्या संस्काराचा आदर राखावा. डॉ अजितकुमार पाटील

**
कोल्हापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष कै शिवाजीराव पाटील उर्फ आण्णा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्ताने शहर शाखा शेठ रुईया विद्यालय कोल्हापूर मध्ये शिक्षक संघाचे सेवानिवृत्त अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व शेठ रुईया विद्यालयात विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आल्या.
अध्यक्षस्थानी वसंतराव चव्हाण, नामदेव बरगे,संघाचे विद्यमान अध्यक्ष मनोहर सरगर,संदीप सुतार,सुनील गणबावले, डॉ अजितकुमार पाटील,कमलाकर काटे,प्रमोद गायकवाड, राजेंद्र पाटील, कुलदीप जठार, विजय सुतार, नामदेव वाघ,सुभाष मराठे,अशोक जोग,सुनील कोळी,तानाजी इंदुलकर, दिलीप माने,श्रीकांत हुबाले, राहुल बागडी आदी  पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यतिथी स्मरण करण्यात आले.
प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात येऊन डॉ अजितकुमार पाटील यांनी *शिक्षक महर्षी शिवाजीराव पाटील आण्णा* यांच्या जीवनकार्याचा शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचा वेध घेणारा *साप्ताहिक शोध*
या वैचारिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
डॉ अजितकुमार पाटील यांनी या लेखांमधून शिवाजीराव पाटील आण्णा यांच्या जीवनकार्याची माहिती देत असतांना नेतृत्व गुण,संघटना चातुर्य,चौफेर ज्ञान,कसे असावे व शासन दरबारी प्रश्न कसे मांडावेत याबद्दल मनोगत व्यक्त केले.अण्णांच्या संस्काररुपी वसा एकविसाव्या शतकातील कार्यकर्ते शिक्षक, पदाधिकारी यांनी कसे जपावेत व संस्कारांची गरज कशी आहे ते मत  व्यक्त केले.
सेवानिवृत्त संघटनाचे वसंतराव चव्हाण यांनी शिक्षक अधिवेशनात अण्णांचा आवाज व विचार कसे होते त्यांच्या रत्नागिरी,शिर्डी, दिल्ली,अहमदनगर, सांगली, व इतर ठिकाणी झालेल्या शिक्षक अधिवेशनातील कार्याची माहिती व विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप सुतार व विजय सुतार यांनी केले तर आभार मनोहर सरगर यांनी मानले.

Tuesday, 14 December 2021

हेरले येथे महावितरणवर मोर्चा

हेरले / प्रतिनिधी

   सन 2020 व 2021 या दोन वर्षांमध्ये कोरोनाची जागतिक महामारी आपल्या हेरले परिसरात अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच लोकांचे रोजगार व नोकरी गेली आहे.त्यामुळे सर्वच कुटुंबातील आर्थिक गणित कोलमडली आहेत.त्यामध्येच महावितरण कंपनीने अन्यायकारक वीज दरवाढ केली आहे व मनमानी पध्दतीने वीज कनेक्शन तोडले  जात आहे.त्याविरोधात हेरले ( ता. हातकणंगले) येथील सर्व पक्षीय कृती समिती व युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून लेखी निवेदन महावितरणचे हेरले कनिष्ठ अभियांता संदीप कांबळे यांना देण्यात आले.
    लेखी निवेदनाचा आशय असा की
 घरगुती वीज बिलामधील दंड व्याज आकारणी रद्द करण्यात यावी,
अन्यायकारक वाढविलेला स्थिर आकार व १६%वीज शुल्क यामध्ये कपात करणेत यावी,ताबडतोब वीज तोडणी बंद करण्यात यावी,शेती वीज बिलासाठी कृषी संजीवनी योजनेला डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढ देणेत यावी,शेतामधील वीज पूर्ववत दिवस व रात्र पाळी मध्ये १० तास करणेत यावी.या सर्व बाबींचा विचार करून महावितरण कंपनी ने ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन करणेत येईल असा लेखी निवेदनाद्वारा इशारा देण्यात आला. 
     या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शुभम मोरे,हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनिर जमादार,कुमार इंगळे,डी एन पाटील उपसरपंच फरीद नायकवडी, शिव सेनेचे माजी उपसरपंच विजय भोसले, माजी उपसरपंच संदीप चौगुले,राहुल शेटे,दादासो कोळेकर, मज्जीद लोखंडे, शिवराज घेवारी, राजू खोत,इसुब पेंढारी, साजिद नायकवडी, संतोष उलस्वार, दादासो भोसले, श्वेतांबर रुईकर आदी उपस्थित होते.
       
लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेल्या मागण्या महावितरण च्या वरिष्ठ अधिकारांच्याकडे पाठवित आहे. यामधून योग्य निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील आहे असे आश्वासन हेरले कनिष्ठ अभियांता संदीप कांबळे यांनी दिले.

      फोटो 
हेरले ( ता. हातकणंगले) येथील सर्व पक्षीय कृती समिती व युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून विविध मागण्यांचे लेखी निवेदन महावितरणचे हेरले कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे यांना देतांना शुभम मोरे  माजी सभापती राजेश पाटील मुनिर जमादार व अन्य पदाधिकारी.

Monday, 13 December 2021

शासनाच्या सर्व सोई सुविधा दिव्यांगापर्यंत पोहचविणार - जि.प. सदस्या डॉ पद्माराणी पाटील

हेरले / प्रतिनिधी

    शासनाच्या सर्व सोई सुविधा दिव्यांगापर्यंत पोहचविणार असे प्रतिपादन माजी सभापती जि.प. सदस्या डॉ पद्माराणी पाटील यांनी  केले त्या हातकणंगले तालुक्यातील हेरले  येथे वेद अपंग सेवाभावी संस्थेने जागतीक अपंग दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात  बोलत होत्या. अध्यक्षस्थानी हातकणंगले पंचायत समितीचे सहाय्यक गटविकासअधिकारी  विजय देशमुख होते.
   सहाय्यक गटविकास अधिकारी विजय देशमुख म्हणाले,संस्थेला प्रशासनाचे पुर्ण सहकार्य देण्यात येईल.अपंगांना ग्रामपंचायत न घरफाळा आणि पाणीपट्टीत सवलत द्यावी.
यावेळी ग्रामपंचायत स्वनिधीतुन अपंगांना 5% निधी धनादेश वाटप करण्यात आले.हेरले डाँक्टर असोशिएशनने आपल्या  खाजगी दवाखान्यात पन्नास टक्के सुट दिव्यांगांना जाहीर केली  आहे. 
      यावेळी सरचिटणीस मुनिर जमादार , वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख ,माजी उपसरपंच राहुल शेटे ग्रामपंचायत सदस्य निलोफर खतीब , दादासो कोळेकर ,ग्रामसेवक संतोष चव्हाण वेद संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.
  या कार्यक्रमास वेद अपंग सेवाभावी संस्था हेरलेचे  अध्यक्ष  शिवाजी भोसले , उपाध्यक्ष अमित पाटील,
सदस्य  संदीप पाटील ,संजय शेंडगे हाशिम मुलाणी, सुरेश चोगुले ,सुरेश मगदूम ,उज्वला परमाज, दीपाली माकणे ,भाग्यश्री जाधव ,संदिप पाटील  यांचेसह सदस्य उपस्थित होते.
फोटो :- जागतीक अपंग दिना निमित्त कार्यक्रमामध्ये बोलताना  माजी सभापती जि.प. सदस्या डॉ पद्माराणी पाटील शेजारी मुनिर जमादार, डॉ.राहुल देशमुख व अन्य मान्यवर.

Friday, 10 December 2021

रांगोळी स्पर्धेत शाहूंच्या विद्यार्थ्यांचे सुयश

** कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्र 11,सेंट्रल स्कुल कसबा बावडा मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव व दिव्यांग सप्ताहानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते गजानन बेडेकर प्राथमिक शिक्षण समितीचे पी आर ओ रसूल पाटील शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोहर सरगर जिल्हा समन्वयक शकीला मुजावर राजेंद्र अप्पूगडे सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .
 कार्यक्रमामध्ये रसूल पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर न्याय देण्याचे महत्वाचे आहे असे मनोगत व्यक्त केले गजानन बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व शाळेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे त्यांनी आवाहन केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पालकांची सुद्धा कौतुक केले समाजामध्ये वावरत असताना भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण दिनानिमित्त या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबर सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे भारतीय राज्यघटना नुसार न्याय स्वातंत्र्य समता बंधुता सर्वधर्मसमभाव हक्क या संविधानाचा आदर राखून पहिली ते सातवीतील  विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक न्याय द्यायचे कार्य शाळा करत आहे त्यामध्ये आमच्या शाळेचे सर्व शिक्षक माजी विद्यार्थी मित्र मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी समितीचे सदस्य खरोखरच विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे कार्य करत आहेत याचा मला अभिमान आहे असे मनोगत डॉ अजितकुमार पाटील यांनी व्यक्त केले. 
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रथम क्रमांक वेदांतिका पाटील द्वितीय क्रमांक पल्लवी कोरवी तृतीय क्रमांक तेजस्विनी माने उत्तेजनार्थ जानवी ताटे व आदिती बिरंगे यांनी संपादन केले सर्व सहभागी स्पर्धकांना रसूल पाटील मनोहर सरगर गजानन बेडेकर राजेंद्र अप्पूगडे सचिन चौगुले या इतर मान्यवरांच्या हस्ते वही व पेन देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सुशील जाधव शिवशंभु गाटे आसमा तांबोळी तमेजा मुजावर विद्या पाटील हेमंत कुमार पाटोळे शाळा व्यवस्थापन सदस्य अनुराधा गायकवाड सोनाली जामदार दिपाली चौगुले स्नेहा दाभाडे शिक्षण तज्ञ मुजावर उपस्थित होते परीक्षक म्हणून सुरेखा पाटील जयश्री पुजारी सुनिता अंबाडेकर यांनी काम पाहिले तर आभार उत्तम कुंभार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

Friday, 3 December 2021

जिल्हा बँकेसाठी शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.


: अनुसूचित जाती प्रवर्गातून दावेदारी :

 हेरले / प्रतिनिधी  
मौजे वडगाव येथील शिवसेना शहर प्रमुख व माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती या प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 
      जिल्हा बँकेच्या कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख  मुरलीधर जाधव यांच्या सूचनेनुसार व शिवसेना पदाधिकारी यांचे उपस्थित अर्ज दाखल केला. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्रानुसार शिवसेना सदैव कार्यरत आहे. त्या अनुषंगाने मी केलेल्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला निश्चितपणे शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली .
      याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, शिव सहकार सेना जिल्हा संघटक संजय जाधव, तालुका संघटक संदीप दबडे, रमेश शिंदे, पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन धोंडीराम चौगुले, बाळासो थोरवत, ग्रा.पं .सदस्य अवधूत मुसळे ,अविनाश पाटील, महादेव शिंदे ,सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, अमोल झांबरे, अण्णासो पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.

 फोटो 
   शिवसेना शहर प्रमुख माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी जिल्हा बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाप्रमुख  मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, संजय जाधव, संदीप दबडे ,व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोजिमाशि पतसंस्थेकडून सभासदांसाठी १० लाख रुपयांची अपघात विमा योजना जाहीर

*.* 
पेठ वडगांव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे 
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८८३६ सभासदांना १० लाख रुपये विमा कवच असणारी अपघात विमा योजना दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ पासून १ वर्षासाठी कार्यान्वित राहील. या अपघात विमा योजनेतून संस्थेच्या सभासदांसाठी ८८३ कोटी ६० लाख रुपये इतके विमा कवच  लागू राहील. सदर विम्याची  प्रीमियम रक्कम कोजिमाशि पतसंस्थेमार्फत  भरली आहे अशी माहिती कोजिमाशि  पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी दिली. पतसंस्थेच्या शाहूपुरी येथील प्रधान कार्यालयात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी श्री.आनंद कुलकर्णी, ब्रँच मॅनेजर श्रीकांत कोले व सल्लागार  योगेश सकट यांनी कोजिमाशि पतसंस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर,व्हा.चेअरमन सुभाष पाटील,सीईओ अरविंद पाटील यांचेकडे अपघात विमा पॉलिसी सुपूर्द केली.याप्रसंगी कोजिमाशिचे संचालक कैलास सुतार, अनिल चव्हाण,संदीप पाटील,सौ.सुलोचना कोळी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे,संगणक  अधिकारी नितीन शिंदे,प्रशासन अधिकारी उत्तम कवडे आदी उपस्थित होते. सदरच्या अपघात विमा योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना १० लाख रुपयांचा  लाभ दिला जाणार आहे. तसेच अंशतः अपंगत्व आल्यास म्हणजे  एक डोळा,एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास ५ लाख रुपये विमा कवच सभासदांना मिळणार आहे. सदरची योजना कोजिमाशि पतसंस्थेच्या सभासदांना वरदान ठरणार आहे अशी माहिती चेअरमन बाळ डेळेकर यांनी दिली.सभासदांकडून कोणतीही विमा हप्ता रक्कम भरून न घेता या अपघात विमा  योजनेची संपूर्ण रक्कम कोजिमाशि पतसंस्था स्वतः भरणार आहे हे या योजनेचे वैशिट्य मानावे लागले.स्वतः विम्याची रक्कम भरणारी कोजिमाशि पतसंस्था ही जिल्ह्यातील पहिली संस्था ठरली आहे.

Sunday, 28 November 2021

घोडावत पॉलिटेक्निकमध्ये "कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग" या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा



हेरले / प्रतिनिधी

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार एम एस एम ई  टेक्नॉलॉजी सेंटर सितारगंज  व संजय घोडावत पॉलिटेक्निक  अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने "कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग" या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा  दिनांक ३० नोव्हेंबर  २०२१  वेळ ११ .००  ते ४ .००  या वेळेत आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती प्राचार्य विराट गिरी यांनी दिली आहे.
या कार्यशाळेस   सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन  विद्यार्थी,  आय टी आय, डिप्लोमा, डिग्रीचे विद्यार्थी व हे सर्व  शिकण्याची  इच्छा असणारे  सर्व युवक –युवती सहभाग घेवू शकतात. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम एस एम ई चे मा. श्री.आदित्य चौधरी आणि त्यांची टीम लाभलेले आहेत.
या कार्यशाळेस सहभागी होणाऱ्या सर्वांना  एम एस एम ई चे शासनमान्य ई प्रमाणपत्र मिळणार आहे. ई-प्रमाणपत्राचा उपयोग उद्योग आधार नोंदणीसाठी तसेच शासकीय योजनेतील कर्ज प्रकरणासाठी उपयुक्त असेल. तरी या कार्यशाळेस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी केले आहे.
या कायर्शाळेच्या आयोजनाला कॉम्प्युटर इंजिनीरिंग विभागाचे प्रमुख प्रा.सागर चव्हाण व टीम यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनी राजेश खांडवे यांचा सत्कार

कोल्हापूर / प्रतिनिधी

ट्रान्सपोर्ट असोसिएशन ऑफ नागाव शिरोली यांचे वतीने शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचा सत्कार असो. अध्यक्ष कुलभूषण कोळी,उपाध्यक्ष जावेद पुणेकर यांच्या हस्ते करणेत आला. 
यावेळी वाहतूक व्यावसायिकांना होणाऱ्या पार्किंगच्या अडचणींबाबत व इतर समस्यांबाबत चर्चा करणेत आली. 
याप्रसंगी सचिव  महेंद्र पाटील,  दिलीप शिरोळे, राहुल चौगुले , प्रभाकर यद्रे,  लक्ष्मण चौगुले,  योगेश माळी,  कुमार मोरे, जयसिंग एकसिंगे,  रमेश तोंडकर इत्यादी वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते.

फोटो.....
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचा सत्कार करताना कुलभूषण कोळी व इतर मान्यवर.

Saturday, 27 November 2021

वडगाव विद्यालय (ज्युनियर कॉलेज ) च्या विद्यार्थ्यांचे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

मिलींद बारवडे
पेठ वडगाव / प्रतिनिधी

 सन २०२० /२१ च्या शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवी इयत्तेसाठी संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहिर झाला असून या परीक्षेमध्ये वडगाव विद्यालय (जुनियर कॉलेज ) वडगावच्या सहा विद्यार्थ्यांनी गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे.
   पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयाचे १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्या पैकी कु. राजवर्धन प्रताप पसाले याने ( १९८ ) गुण संपादन केले.  कु.केदार संदीप नायकवडी याने  (१६८ ) गुण संपादन केले. कुमारी शर्वरी शरद पाटील हिने (१२८) गुण संपादन करून हे तीन विद्यार्थी पात्र झाले.
       आठवी शिष्यवृत्ती परीक्षामध्ये १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील तीन विद्यार्थी पात्र झाले. कुमारी आर्या सचिन गुरव हिने  (२४०) गुण संपादन केले. कुमारी श्रद्धा मुरलीधर पाटील हिने (२३४ ) गुण संपादन केले. कुमारी भक्ती अजित लाड हिने  (१७८) गुण  संपादन केले. आदी विद्यार्थ्यांनी या परीक्षेममध्ये यश मिळविले बद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार मुख्याध्यापक आर.आर.पाटील     यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन अकबर     पन्हाळकर यांनी केले.
  या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई,अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, उपाध्यक्ष शिवाजी सावंत, कौन्सिल मेंबर बाळासाहेब डेळेकर यांची प्रेरणा लाभली.
मुख्याध्यापक आर. आर. पाटील,उपमुख्याध्यापक एस. डी. माने पर्यवेक्षक  डी. के. पाटील,तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी,कार्यवाह के. बी. वाघमोडे, डी. एस. शेळके, डी. एस. कुंभार आदीसह विषय शिक्षक मिलींद बारवडे, आर. एस. पाटील,एस. के. खाडे,  जे. एम. मणेर ,  सचिन पाटील,          जेष्ठ अध्यापिका आर.आर.पाटील,        ए.डी.जाधव,एस. एस. चौगुले, एस. ए. पाटील, जी.व्ही. मोहिते ए. ए. गुरव,   एस.जे.क्षीरसागर आदींचे मार्गदर्शन लाभले.

            फोटो
वडगाव विद्यालय (ज्युनियर कॉलेज ) वडगावचे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षामधील यशस्वी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक आर. आर. पाटील व शिक्षक वृंद.

शिक्षक बँकेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल या रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करण्याची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.२७/११/२१

शिक्षक बँकेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल या रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करा अशी मागणी  दि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या
संचालिका  सौ.लक्ष्मी पाटील यांनी सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
        दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर या बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपून दोन वर्षे होत आले आहेत. सध्या निवडणूक लावण्याचा कार्यक्रम सहकार खात्याने सुरू केला आहे. दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर ही सर्व कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक सभासद असणारी बँक आहे त्यामुळे एकूण सर्व सभासद पैकी एकही सभासद आर्थिक दृष्ट्या दुर्बल या गटात समाविष्ट होऊ शकत नाही. शिक्षक बँकेच्या सभासदांच्या संख्येनुसार बँकेत एकूण १८ संचालक मंजुरी आहे. मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल या घटकात कोणीही सभासद नसल्यामुळे ती जागा रिक्त राहत आहे. 
       या उलट इतर कोणतेही संस्थे पेक्षा महिलांची सभासद संख्या ही जवळपास ५० टक्के असताना बॅंकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत आरक्षित दोन जागेवर महिला संचालक निवडून येत आहेत. तरी रिक्त राहणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल जागे ऐवजी  ती जागा महिला आरक्षित करून वाढवावी, जेणेकरून सभासदांच्या प्रमाणात थोडेफार महिलांना संचालक मंडळामध्ये स्थान मिळेल अशी मागणी दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापुर च्या संचालिका सौ. लक्ष्मी पाटील यांनी  आयुक्त सहकार खाते महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

        फोटो 
पुणे सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापुर च्या संचालिका सौ. लक्ष्मी पाटील लेखी निवेदन देतांना.

Thursday, 25 November 2021

शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण नि: शुल्क न केल्यास शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन करणार



कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.२५/११/२१

    राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी साठी दिले जाणारे प्रशिक्षण नोंदणी बाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.सदर प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी रुपये २०००/ इतके शुल्क आकारले जाणार आहे.हा निर्णय अत्यंत चुकीचा  व शिक्षकांचेवर अन्याय करणारा आहे. याचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे वतीने निषेध करण्यात आला.
        आज पर्यंत अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने कधीही शुल्क आकारलेले नाही. प्रशिक्षण हे नि:शुल्कच असायला पाहिजे.
शासनाने हा निर्णय ताबडतोब रद्द करावा अन्यथा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्याच्या संदर्भाचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे  यांना देण्यात आले. 
     या वेळी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, वसंतराव देशमुख ,मिलिंद पांगिरे,  आर.वाय.पाटील,उदय पाटील ,  के.के.पाटील,पी.एस.हेरवाडे, संतोष आयरे,गजानन काटकर, अशोक पाटील, चंद्रकांत लाड, राजेश वरक आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.
             फोटो कॅप्शन -- 
शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना निवेदन देताना शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड , वसंतराव देशमुख, मिलिंद पांगिरे,उदय पाटील,के.के.पाटील,आर. वाय.पाटील, पी.एस.हेरवाडे, गजानन काटकर, अशोक पाटील, चंद्रकांत लाड, संतोष आयरे, राजेश वरक आदी

Tuesday, 23 November 2021

पर्यावरणप्रेमी डॉ. दीपक शेटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

*
हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती यांच्याकडून *डॉ . दीपक मधुकर शेटे* यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .याबाबतची पत्र *महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी शिंदे व उपाध्यक्ष रंजन खरोटे यांनी दिले* .
डॉक्टर दिपक शेटे हे स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिणचे या निवासी शाळेत गेली 22 वर्षे गणित व विज्ञान हे विषय शिकवतात .
डॉ दिपक शेटे सातत्याने पर्यावरण पूर्वक सण साजरे करण्यासाठी  नेहमी प्रयत्नशील असतात . त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी विशेष उपक्रम हाती घेतली आहेत . स्टार अकॅडमी च्या मार्फत शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे .त्यांच्या या  उपक्रमाबद्दल  प्रबोधन समितीच्या वतीने गौरवपत्र देण्यात आले व त्यांची निवड करण्यात आली . त्यांच्या निवडीबद्दल पर्यावरण प्रेमीच्या कडून कौतुक होत आहे .

"विवेकबुद्धी ने श्रद्धा ठेवून पर्यावरण प्रेमी बनवण्यास आम्ही प्रयत्नशील  राहू. "- 

डॉ दिपक शेटे

Saturday, 20 November 2021

कोजिमाशि पतसंस्थेच्या कोविड संसर्ग शिक्षक सभासदांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ लाखाचा मदत निधी

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.20/11/21

    कोजिमाशि पत संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ५०६ कोविड संसर्ग शिक्षक सभासदांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ लाखाचा मदत निधी  दिला. तसेच संस्थेच्या वतीने माफक व्याजदरात मोठ्या रक्कमेचे कर्ज दिले जाते. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या सहकार अभ्यासातून विविध उपक्रम सभासद हिताचे राबिवले जात आहेत,संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे कौन्सील सदस्य तथा अध्यक्ष विनोद कुमार लोहिया यांनी केले.
      कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर अंतर्गत कोजिमाशि महिला सखी मंचच्या वतीने निबंध व गायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण , लाभार्थी सभासदाना कोविड आधार भेट  समारंभ, राजर्षि शाहू महाराज सभागृह मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर  येथे संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
    कोजिमाशि तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले कोजिमाशि   पतसंस्थेची सत्ता हाती घेतली त्यावेळी संस्थेमध्ये ३२ कोटी ठेवी होत्या. सतरा वर्षाच्या कार्य कालामध्ये ४७१ कोटी ठेवी संस्थेत जमा झाल्या आहेत. पहिला संस्थे मार्फत दहा ते बारा टक्के लाभांश दिला जायचा. सत्ता आल्यापासून २१ ते २४ टक्के लाभांश दिला जातो तसेच संस्थेस ऑडीट अ वर्ग मिळाला आहे. ११ कोटी रुपयांचे मयत सभासद  कर्ज माफ केले आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेतल्याने संस्थेवर सभासदांची नितांत निष्ठा आहे.या प्रसंगी  प्राचार्य डी.एस. घुगरे यांनी मनोगत व्यक्त केले.पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
    गायन स्पर्धा - विजेते - प्रथम आशा कृष्णा गुरव ( व्यंकटराव हाय. आजरा), द्वितीय स्मिता विक्रम कदम ( कुमार भवन करडवाडी), तृतीय सुचिता विठ्ठल पाटील ( श्री बालाजी माध्य. विक्रमनगर इचलकरंजी), तृतीय अर्चना प्रशांत अंबिलधोक (तात्यासो तेंडुलकर ज्युनि. कॉलेज कोल्हापूर ), चतुर्थ अनुराधा दत्तात्रय जंगम ( लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हाय. जयसिंगपूर), पाचवा रूपाली प्रताप पोवार ( शाहु कुमार भवन गारगोटी )
   निबंध स्पर्धा  - प्रथम सुमन नरुटे ( माध्यमिक वि. हातकणंगले) द्वितीय अस्मिता पुंडपळ ( व्यंकटराव हाय.आजरा ) तृतीय वैशाली वडवळेकर ( व्यंकटराव हाय. आजरा) चतुर्थ सुकेशा चौगुले ( दानोळी हाय. दानोळी ) पाचवा क्रमांक प्रविणा पाटील ( आर. के. वालावलकर प्रशाला कोल्हापूर)
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कोजि माशि संचालक अनिल चव्हाण यांनी केले.या प्रसंगी गायन व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण  कोविड संसर्ग शिक्षकांना धनादेश व कर्जमाफी दाखले वितरण करण्यात आले.
     या प्रसंगी चेअरमन बाळासाहेब डेळेकर, प्राचार्य डी. एस. घुगरे, सिईओ अरविंद पाटील, मुख्याध्यपक संघ सदस्य रविंद्र मोरे, जितेंद्र म्हैशाळे, प्रकाश पोवार, एस. एस. चव्हाण, सारीका यादव, अनिता नवाळे, प्रा. एच. आर. पाटील, राजेद्र रानमाळे, संजय डवर, सुलोचना कोळी, के एस. खाडे,शांताराम तौवंदकर अनिल चव्हाण, एस डी पाटील, जनार्दन गुरव, प्रकाश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.आभार व्हा चेअरमन  एस.डी. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन निशा साळोखे व उत्तम कवडे यांनी केले.

         फोटो 
कोल्हापूर : गायन व निबंध स्पर्धेतील विजेत्या शिक्षिकांच्या सोबत शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन बाळासाहेब डेळेकर व्हा.चेअरमन एस डी पाटील प्राचार्य डी. एस. घुगरे आदीसह अन्य मान्यवर.

         
शिक्षणतज्ञ कै. डी. बी. पाटील यांची मुख्याध्यापक संघावर ५३ वर्षे सत्ता होती.त्यांच्या पवित्र कार्याचा वसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत अहोत.
        दादासाहेब लाड
   शिक्षक नेते तथा तज्ञ संचालक     कोजिमाशि

Thursday, 18 November 2021

कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षण व विद्यार्थी

कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षण व विद्यार्थी
डॉ अजितकुमार पाटील, ( पीएच डी ,मराठी )केंद्रमुख्याध्यापक.म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा, कोल्हापूर

ऑनलाइन शिक्षणाची सुरूवात

:सध्याच्या कोरोनाकाळात 
मार्च 2020 मध्ये सर्व ठिकाणी कोरोनामुळे टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या तरी फोन आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षक मुलांशी जोडलेले आहेत. शिक्षकांनी तयार केलेल्या चित्रफिती व्हॉट्सअॅपवर पाठवण्यापासून सुरू झालेला प्रवास झूम, गुगल मीटसारख्या माध्यमांतून ऑनलाइन अध्यापनापर्यंत येऊन पोचला आहे. हा प्रवास निश्चितच सोपा आणि सुकर नव्हता. बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षकांनी त्यातून चांगल्या प्रकारे मार्ग काढला. नवी तंत्रज्ञान शिकून घेत ही नवी पध्दत आत्मसात केली.
'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' या शासनाच्या भूमिकेमुळे ऑनलाइन अध्यापन तर सुरू झाले, पण ऑनलाइन अध्ययना' चे काय? शाळेत शिकतानादेखील वाचन-लेखन- गणनात मुले किती मागे आहेत, हे वारंवार झालेल्या सर्वेक्षणातून, वर्तमानपत्रात आलेल्या आकडेवारीतून आपल्याला समजते. मग या ऑनलाइन पध्दतीत संकल्पनांचे आकलन होते आहे का? ऑनलाइन शिक्षण मुलांसाठी योग्य आहे का? तळागाळातील मुलांपर्यंत ते पोचतेय का? अंतर्मुख करायला लावणारे हे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत.

अडचणीची मालिका

ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारा स्मार्टफोन, संगणक किंवा टॅब आणि हेडफोन, तसेच उत्तम दर्जाचे इंटरनेट मुलांकडे असले की शिक्षण निदान सुरू तरी होईल. पहिली शंका मनात येते की कोल्हापूर भागातील बराचसा ग्रामीण भाग हा सोयी नसलेल्या भागातील आहे.म्हणजे पालक अन्न व नोकरी शोधण्यात धडपडत असतात. काही ठिकाणी जिथे अद्याप वीजही घड पोहोचलेली नाही, तिथे इंटरनेटची काय सविधा असेल याविषयी न बोललेलेच बरे.... ग्रामीण आणि शहरी भागांतही आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील मुलांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नसते, तिथे स्मार्टफोन कसा घेणार? अशा अडचणींमुळे ही मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचितच राहत आहेत. आवश्यक साधने नसल्याने त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होऊन शिक्षणाच्या प्रवाहापासून ती दूर जाणार नाहीत ना, अशी भीती मनात येतेय. 

ऑनलाइन शिकणे

स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा असलेल्या मुलांचे तरी ऑनलाइन पध्दतीत 'शिकणे घडतेय का ?... शिक्षकांनी मुलांना शिकवणे, ही पारंपारिक पध्दत आता बदलतेय. घरी, शाळेत, परिसरात, मित्रमैत्रिणींसोबत अनेक गोष्टी बघत, ऐकत, हाताने करत अनुभवा घेत मुले शिकत असतात. त्यासाठी योग्य वातावरणनिर्मिती, शैक्षणिक साधने आवश्यक संधी शिक्षक उपलब्ध करून देत असतात. मुलांचे जास्तीत जास्त शिज्ञकणे हे त्यांनी घेतलेल्या अनुभवातून घडतं. ऑनलाइन शिक्षणात असे अनुभव घेता येत नसल्याने त्यांच्या शिकण्याला मर्यादा येते. चेहरयावरील भाव पाहून मुलांना समजलेय की नाही हे शिक्षकांना कळते. कित्येकदा सांगूनसुध्दा मोठी मुले व्हिडिओ बंद ठेवतात, त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे समाधान मिळत नाही आणि काहीही न घडता दिवस संपतो. परंतु मुलांच्या शिकण्याला पूरक असे वातावरण शिज्ञक्षकांनी निर्माण केले, तर मुलांचे शिकणे खूपच सुलभ होते,हा माझा स्वतःचा असा काही अनुभव नक्की सांगावेसे वाटतात. प्राथमिक शाळेतील मुलांना ऑनलाइन शिक्षण झेपेल का? मोबाईल हाताळाणे, माईक चालू- बंद करणे हे मुले सराईतपणे करू लागली. पहिली हा मूलभूत शिक्षणाचा पाया असतो. या टप्प्यावर अक्षरओळख, शब्द वाक्य व छोटे उतारे अशी एकेक पायरी चढत मुले वाचन-लेखन करू लागतात. संख्याओळख, बेरीज-वजाबाकी या मूलभूत गाणिती क्रियांची ओळखदेखील याच इयत्तेपासून होते. ऑनलाइन पध्दतीने हे कसे शक्य होईल? परंतु एकमेकांशी तसेच शाळेच्या पदाधिकरयांबरोबर चर्चा करून केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणूनच की काय, मुले वाचू-लिहू लागली आहेत.


पालकांची भूमिका

ऑनलाइन शिक्षणात पालाकंची भूमिकाही महत्त्वाची आहे. निरक्षतेमुळे आणि कामामुळे वेळ न देऊ शकणारे, मुलांना आवश्यक तिथेच मार्गदर्शन करणारे आणि मुलांच्या अध्ययनात अवाजवी हस्तक्षेप करणारे असे तीन प्रकारचे पालक आम्हाला दिसतात.मुलांना काही कृती पालकांबरोबर कराव्या लागतात. पाकांनी समजून करून घेतल्या तर मुलेही व्यवस्थित करतात. वाचन-लेखनाचा खूप सराव घ्यावा लागतो. शाळेत वेगवेगळया पध्दतीने सराव घेतला जातो. जे पालक असा सराव घेतात आणि त्या मुलांना थोडासा सराव पुरेसा असतो, ती मुले व्यवस्थित वाचू लागली आहेत. परंतु ज्यांचे आई बाबा साक्षर नाहीत किंवा ज्यांना पुरेसा वेळ देता येत नाही, अशा मुलांच्या शिकण्यात अडचणी येतायत.
काही पालक ऑनलाइन वर्गाच्यावेळी मुलांजवळच असतात. एखाद्या संकल्पनेचे विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरे बरोबरच यायला हवीत, यासाठी हा पाकांचा अट्टहास असतो. मुलाचा मेंदू तरतरीत ठेवायचा असेल तर सतत डोक्याला चालना मिळाली पाहिजे, वेगवेगळे प्रश्न समोर आले पाहिजेत. मेंदूसमोर जितक्या अवघड गोष्टी आपण ठेवू त्यातून तो शिकत जाईल, हे मेंदूचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी अनेक प्रयोगांअंती सिध्द केलेले आहे. नेमकी किती, कुठे आणि कशा प्रकारची मदत द्यावी याबाबत पालकसभेत वारंवार बोलत राहावे लागते. आकलन न होण्यामागचे आणखी एक मोठे कारण आहे, शाळेतल्या आणि घरातल्या वातावरणातला फरक. शाळेचे वातावरण मुलांच्या शिकण्याला पूरक असते. मुले विविध शैक्षणिक साधने वापरून, कृती करून, अनुभव घेऊन संकल्पना समजून घेत असतात. गरज लागेल तिथे शिक्षकाना प्रश्न विचारतात. त्या विषयावर पाठयपुस्तकापलीकडच्या अवांतर गप्पा होतो. शिक्षक आणि मुलांचा संवाद घडतो. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना मुलांसोबत त्यांचे समवयस्क असतात. असेही म्हणतात की मोठयांपेक्षा आपल्या समवयस्कांकडून चांगल्या प्रकारे मुले समजून घेऊ शकतात. ऑनलाइन शिक्षणात या सगळ्या गोष्टींना मर्यादा येतात. शाळेत शिक्षकांकडून मिळणारी शाबासकीची थाप कौतुकाचे शब्द, शिक्षकांचा आश्वासक स्पर्श मुलांना हवाहवासा असतो. वर्गातील मुलांच्या साथीने शिकणे, वर्गातील मुलांच्या साथीने शिकणे, वर्गातील गमतीजमती, हसणे, भांडणे, मधत्या सुटीतील मजा, एकत्र डबा खाणे, मैदानावरचे खेळ, मित्र-मैत्रिणींसबोत शाळेत येणे या सर्व भावनिक आणि शारीरिक गरजा ऑनलाइन शिक्षणात पूर्ण होऊ शकत नाहीत. सर्वच मुलांच्या घरचे वातावरण शिकण्यासाठी पोषक असेलच याचीही खात्री आपण देऊ शकत नाही.
शिक्षणक्षेत्रात अनेक वर्षे मी शैक्षणिक कार्य व यु ट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देत आहे. पण आपल्या मित्रांना याचा आनंद घेता येत नाही.ऑनलाइन वर्गात मित्र- मैत्रिणी दिसले तरी त्यांच्यासोबत खेळणे, गप्पा मारणे या गोष्टी मुलांना करता येत नाहीत. त्यामुळे काही मुले अस्वस्थ होतात. पहिलीतील एक मुलगा ऑनलाइन वर्गात फक्त आपल्या मित्राला शोधत असतो. तो मित्र नसेल तर हाही लक्ष देत नाही आणि 'आधी त्याला फोन करून वर्गात यायला सांग, तरच मी अभ्यास करीन' असे आईला सांगतो. सध्या मुले खूपच चिडचिडी झाली आहेत, असेही पालक सांगतात.


शिकण्याच्या संधी


ऑनलाइन शिक्षणामुळे शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांनाही मुलांना मुकाचे लागते. शाळेतील प्रदर्शन, स्नेहसंमेलन, वस्तू तयार करून दुकानजत्रेत विकणे, खेळदिनाला चुरशीने खेळ खेळणे आणि मुले पहिलीपासून ज्याची वाट पाहत असतात असे चौथीचे रात्रशिबिर अनुभवणे (एक रात्र मित्रमैत्रिणी व ताईसोबत शाळेत राहणे) यांसारख्या उपक्रमांची मजा मुलांना अनुभवता येत नाही. डोंगरावर, जंगलात फिरणे, सार्वजनिक वाहनाने सहलीला जाणे यांसारखे अनुभवही घेता येत नाहीत. आमच्या अ. भि. गोरेगावकर या माध्यमिक शाळेतही एकेका विषयावर मुले प्रदर्शन मांडतात. हे अनुभव मुलांच्या वाढीत मोलाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक शाळेत थोडयाफार फरकाने असे उपक्रम ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा प्रयत्नदेखील केला, पण शाळेतली मजा तिथे आली नाही. *मूल्यमापन* हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. शिकण्याचा हेतू अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि मूल्यमापन हे चक्र पूर्ण झाले तरच शिकणे घडले असे म्हणतात. हे शिकणे घडले का ते मुलांचे प्रतिसाद, मुलांच्या चेहऱ्यावरील भाव, मुलाचे स्मितहास्य पाहूनही लक्षत येते. हे प्रतिसाद शिक्षक आपल्याकडे नोंदवूनही ठेवतात. एखाद्या संकल्पनेचे आकलन झाले का हे तपासण्यासाठी रोजच्या सरावपत्रिका, दर आठवडयाच्या चाचण्या घेतल्या जाता. त्यामुळे शिक्षकाला अध्यापनाची दिशा ठरवतात येते, उणिवा कमतरात भरून काढता येतात. वर्गात मैदानात, सहलीला, उपक्रमाच्यावेळी मुलांचे मिळणारे प्रतिसाद हेही मूल्यमापनच असते. सध्या हे अजिबातच घडू शकत नाही. मूल्यमापनाच्या वेगवगळ्या पध्दती वापरण्यालाही मर्यादा आहेत. तसेच मुलांचे शिकणे घडले का याबाबतही मनात सभ्रम आहे. जर शिकणे घडलेच नसेल तर मूल्यमापन परीक्षा घेणेही अर्थहीन आहे. आता सरावपत्रिका चाचण्या दिल्या जात असल्या तरी मुख्य अडचण म्हणजे हे काम मुलानेच केले का याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शिकवलेल्यापैकी कितपत मुलांपर्यंत पोचले ते तपासण्यासाठी मूल्यमापन घेता येईल. पण तेही योग्य मूल्यमापन आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. तरीही पूढच्या वर्षीच्या नियोजनासाठी त्याचा उपयोग नक्कीच होईल.
येणाऱ्या काळासाठी ऑनलाइन शिक्षणात काही गोष्टी सकारात्मकही आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे मुले 'स्मार्ट' झाली आहेत. 'माईक म्युट / अनम्युट करा, पुन्हा जॉईन व्हा, लिंकवर क्लिक करा, कॅमेरा ऑन / ऑफ करा, स्लाईड बघा...' ही भाषा सुरूवातीला सवयीची नसल्याने मुले गांगरून जात होती. आता मात्र ती सरावली आहेत. पूर्वी कॅमेरासमोर कमी बोलणारी किंवा लाजणारी मुले आता आत्मविश्वासाने कवितेचा व्हिडिओ तयार करून पाठवत आहेत. कला-कार्यानुभवाच्या तासाला काही समजले नाही तर आम्ही व्हिडिओ बघून करू असे सांगून त्याप्रमाणे करू लागली आहेत. दुसरीकडे, ऑनलाइन वर्गासाठी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे,शिक्षण उप आयुक्त रविकांत अडसुळे, प्रशासनाधिकारी एस के यादव यांच्या प्रेरणेने टेक्नॉलॉजी शिक्षकांनी तयार केलेल्या पीपीटी,टिलिमिली कार्यक्रम, शनिवारच्या गोष्टी,टी व्ही वरील व्हिडीओ ,स्वाध्याय उपक्रम,यु ट्यूब, गुगल मिट, झुम मिटींगवर या सारखे शैक्षणिक उपक्रम ने विद्यार्थ्यांना घरी,शाळा परिसर मध्ये प्रभावी अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे. व्हॉट्सअप गटांचा उपयोग सूचनांपुरता मर्यादित न ठेवता मुलांचे शिकणे अधिक सुलभ होण्यासाठी चित्रफिती, ध्वनिफिती पाठवणे, घरी मुलांना सरावासाठी सरावपत्रिका, स्वध्यायपत्रिका पाठवणे यासाठीही करून घेता येईल.काही दिवसांनी शाळा नियमित सुरू होतील की नाही याबाबत आपण सध्या तरी काही सांगू शकत नाही. पण जो काही वेळ मिळेल त्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करून मुलांच्या राहिलेल्या क्षमता पूर्ण करून मुलांच्या राहिलेल्या क्षमता पूर्ण करून घेण्यासाठी वेगवेगळया मार्गाचा शिक्षकांना अवलंब करावा लागेल.

विचारांची देवाणघेवाण

सर्व मुलांना एकाच पातळीवर आणण्यासाठी कृती योजना तयार कराव्या लागतील तसेच मुलांचे शिकवणे म्हणजे काय? यावावत पालांचेही प्रबोधन करावे लागेल. मुलांच्या शिकण्यात राहिलेल्या कमतरता भरून काढण्यासाठी *शिक्षणक्षेत्रात विचारांची देवाणघेवाण* करावी लागेल. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत जे जे नवीन शिक्षकांच्या आणि मुलांच्या पदरी पडले आहे, ते सोडून न देता शिक्षकांचे शिकवणे अधिक प्रभावी आणि मुलांचे शिकणे अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी टिकवून ठेवले पाहिजे. शाळा व परिसरातून मिळणारे शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण
यांचा योग्य मेळ घालून एकविसाव्या शतकातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मुलांना सक्षम करणे आणि येणाऱ्या काळासोबत यशस्वीरीत्या पुढे जात राहणे यासाठी आपण सर्वांनीच आता तयार राहिले पाहिजे.
प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाइन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि क्षमता आपल्याकडच्या पालकांकडे आहे का?याचा विचार करणे गरजेचे आहे.
सत्य विचार केला असता
ऑनलाइन,व कोरोना,कोरोनानंतरचे जगामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करोनोनंतरच्या काळात शाळा कशा असतील, या प्रश्नांची चर्चा  घडत आहे. त्यात प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षण या मुद्द्यावर भर आहे. पण त्यापाठोपाठ असेही प्रश्न उपस्थित होत आहेत की, या चर्चेची एवढी घाई कशाला? अशा ऑनलाइन मंचांची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणा-या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? लहान मुलांना मोकळे का सोडले जात नाही? इत्यादी इत्यादी. 

मूलभूत प्रश्न 

सर्वच क्षेत्रात कोव्हिडं 19 ने प्रश्न उभे केले आहेत. त्यास शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही. कोरोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्रे सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे, अशा आशयाच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची हीच वेळ आहे. पण, प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाइन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आपल्याकडच्या पालकांकडे आहे का?
मुलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे गुंतवणे ही महाकठीण गोष्ट. निदान शाळेत मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणांमुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना अभ्यासाकडे लक्ष देतात *वातावरणाचा अभाव*:  घरात मात्र या सर्व वातावरणाचा अभाव असल्याने ‘घरून शिक्षण’ (लर्न फ्रॉम होम) या संकल्पनेचं काय होईल, ती यशस्वी ठरेल का, अशा शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
लहान मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून जेवढे तुम्ही रोखाल तेवढे ते आणखी हट्टाने तीच कृती करतात. मोबाइलचेच उदाहरण घ्या ना. मोबाइल घेऊ नको, असं कितीही बजावून सांगितले तरी ते या ना त्या कारणाने मोबाइल डोळ्यासमोर धरतातच. याला सध्याच्या परिभाषेत ‘स्क्रीन टाइम’ असे म्हटले जाते. स्मार्टफोन आणि स्क्रीन यांच्यापासून लहान मुलांना फार काळ दूर ठेवणे शक्य होत नाही. टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेल्या लहानग्यांना या स्क्रीन टाइमपासून कसं भरकटवायचे हा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.


कौटुंबिक नाते सबंध

उलटपक्षी असाही विचार करणारे आहेत की, आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडा बदल करण्यात थोडे जरी यशस्वी ठरलो आणि लहान मुलांच्या कलेनुसार घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा स्क्रीन टाइम कमी करता येईल. त्यांचे गॅजेट्सवरील अवलंबित्व कमी केले तर पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर त्यांचे नाते आणखी दृढ होण्यास मदत होईल. मात्र, अल्प उत्पन्न गटातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे अगदी असंच्या असे घडेल, याची काही शाश्वती नाही.
घरच्या घरी शाळा, हा पर्याय होऊ शकतो?
आधुनिक विचारांच्या आणि सुशिक्षित पालकांच्या मते घरच्या घरी शाळा हा पारंपरिक शाळांना उत्तम पर्याय आहे. त्यातील अनेकांना आता या कोरोना संकटाच्या काळात हा पर्याय योग्य वाटत नाही. मात्र, या घरातील शाळांचे अनेक फायदे असले तरी ते वास्तवात किती परिणामकारक ठरतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाळांकडून येणा-या माहितीत मोलाची भर घालून त्यांना परिपूर्ण करण्याच्या पालकांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
मुलांना गणितासारखा अवघड विषय सोपा करून सांगताना वेगवेगळी उदाहरणे देण्याकडे पालकांचा कल असतो. त्याचप्रमाणे इतिहासाचे धडे समजावून सांगण्यासाठी ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या माध्यमातून मुलांना इतिहास समजावून सांगण्यासाठी हल्लीचे पालक आग्रही असतात. ज्ञान आणि कौशल्यांबरोबरच पालकांच्या दिमतीला हल्ली ऑनलाइन साहित्यही असते. परंतु असे असले तरी प्रत्येकाच्या बाबतीत या घरातील शाळा हा उपक्रम यशस्वी ठरेल का, हा प्रश्न उरतोच.

अनेकदा अनेक कुटुंबांमध्ये काही प्रमाणात अशा काही कमतरता असतात की ज्यांमुळे शिक्षणाचे स्वरूप कसेही असो, त्या कमतरतांमध्ये बदल करता येतच नाही. लांबलेल्या सुट्ट्यांमुळे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील मुलांच्या शैक्षणिक सत्रातील यशाचे नुकसान झाल्याचे काही अभ्यासातून पुढे आले आहे. अशा प्रकारे शिकवण्याच्या वेळांमध्ये बदल होईल तसेच पालकांना उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये बदल होईल.
अनेक पालकांना या पद्धतीसाठी आवश्यक असे ऑनलाइन साहित्य मिळविणेही दुरापास्त होईल आणि त्याचा अंतिम परिणाम विद्यार्थ्याच्या ज्ञानार्जनावर होईल. त्यामुळे कमी उत्पन्न असणा-या तसेच डिजिटली गरीब असलेल्या कुटुंबांतील मुले मागे पडतील. उपकरणांच्या किमतींमुळे तसेच परवडू न शकणा-या डेटा प्लॅन्समुळेही ही मुले ऑनलाइन अभ्यासात मागे राहतील. अनेक पालकांसाठी पर्यायाने त्यांच्या पाल्यांसाठीही महागडी उपकरणे दुष्प्राप्य आहेत. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासाच्या शर्यातीतून अशा प्रकारचे विद्यार्थी आपोआपच बाद होतील.


ऑनलाइन वर्ग

 ऑनलाइन वर्गांची मागणी जसजशी वाढत जाईल, तसतसा ऑनलाइन शिकवणीच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांचे प्रस्थ वाढू लागेल. एक असा टप्पा येईल की, सुरुवातीला मोफत ऑनलाइन शिक्षण देणा-या या कंपन्या त्यांच्या सेवांसाठी चांगला दाम मोजून घेऊ लागतील. ऑनलाइन शिक्षण देणा-या या कंपन्यांच्या अवाच्या सवा शुल्कामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना हे ऑनलाइन शिक्षण परवडणार नाही. त्यामुळे शाळा स्तरावर तंत्रज्ञानावर अति अवलंबित्व आणि वर्गातील सत्रांमध्ये घट, विशेषतः शहरी भागांत, या गोष्टींमुळे शालेय शिक्षण दुर्मीळ होईल आणि त्यामुळे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना तर प्राथमिक शिक्षण घेण्यातही अडथळे निर्माण होतील. इंटरनेटच्या कमी जोडण्या (२०१९ मध्ये ३६ टक्के) आणि वापरकर्त्यांमधील सामाजिक दरी यांमुळेही शालेय शिक्षणाची दैनावस्था होईल.
या साऱ्याव्यतिरिक्त इतरही घटक आहेत जे अल्प उत्पन्न आणि उच्च उत्पन्न कुटुंबातील मुलांमधील शिक्षणाची दरी अधिक रुंदावतील. अनेकदा असे होते की, अल्प उत्पन्न कुटुंबातील मुलांची कौटुंबिक परिस्थिती घरातील शाळांसाठी पोषक नसते. सामान्यतः ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक आणि इंटरनेट जोडणी या दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. मात्र, भारतात आज असे कोट्यवधी कुटुंबे आहेत की, ज्यांना इंटरनेट जोडणी परवडत नाही. तसेच या कुटुंबांतील मुलांना धड गृहपाठ करण्याइतपतही मोकळी जागा घरात उपलब्ध नसते. शिवाय क्रमिक पुस्तकांची वानवाही त्यांच्या पाचवीला पूजलेली असते.
कित्येकांना तर चार भिंतींचे घरही नशिबात नसते. गाव, घर-दार सोडून रोजगाराच्या शोधार्थ शहराकडे धाव घेणा-या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना तर त्यांचे आई-वडील गावीच सोडून जातात. अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आजी-आजोबांवर येते. सामान्यतः आजी-आजोबा फार शिकलेले नसतात. त्यामुळे मुलांच्या गृहपाठात ते सहकार्य करू शकत नाहीत. त्यामुळे अल्प उत्पन्न कुटुंबांतील मुलांना कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांचा अभ्यास आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनंत अडचणी येतात. परिणामी ते अभ्यासात मागे पडतात.
कोरोना संकटामुळे अभूतपूर्व अशी आर्थिक मंदी येणे अपरिहार्य आहे. वाढती बेरोजगारी आणि अन्नाची भ्रांत यांमुळे विद्यार्थिदशेतील मुले कुपोषण, कौटुंबिक हिंसाचार, मुलांचा छळ आणि बालविवाह या अनिष्टतेच्या चक्रात अडकू शकतात. या कोरोना संकटाच्या काळात अनेक अल्पवयीन मुलांनी हेल्पलाइन क्रमांकावर दूरध्वनी करून मदत मागितली. यावरूनच अल्पवयीन मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या छळाला सुरुवात झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मुलांना जरी इंटरनेट जोडणी आणि इतर आवश्यक गॅजेट्स दिली गेली तरी त्यांच्या घरातील वातावरण ऑनलाइन शिक्षणासाठी पोषक असेलच असे नाही.* 

इतर समस्या

त्यातच अनेक मुलांना कोरोना संकट ओसरल्यानंतर मजुरीच्या कामांना जुंपले जाण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटू शकते. त्यामुळे दीर्घकाळ सर्व व्यवहार बंद राहण्याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना संकटाच्या काळात धोरणकर्त्यांना पोषण आणि मुलांचे शिक्षण या दोन समस्या तीव्रपणे भेडसावत आहेत. शाळेत मिळणा-या आहारावरच जर गदा येणार असेल तर शाळेत जावे तरी का? असा प्रश्न मुलांना पडण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा हा भयगंड मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने मुलांना शाळांमध्ये पोषण आहार मिळेल, याची शाश्वती द्यायला हवी. केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सरकारांनी याबाबतीत वेळीच योग्य पाऊल उचलले आहे. मुलांच्या शाळा बंद असल्या तरी त्यांना घरपोच माध्यान्ह भोजन प्राप्त होईल, याची तजवीज या राज्यांनी अंगणवाडी सेवकांच्या माध्यमातून करून ठेवली आहे.

शिक्षकांनीही संगणक, वायरलेस, इंटरनेट किंवा अभ्यासासाठी समर्पित ठिकाण या सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना विद्यादान कसे करता येईल, या दृष्टीने अभ्यास करून त्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना करावी, असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. दूरस्थ शिक्षण म्हणजे फक्त ऑनलाइन शिक्षण असे नाही तर संमिश्र माध्यमातून शिक्षण होय. अशा प्रकारच्या शिक्षणाचे उद्दिष्ट टीव्ही, रेडिओ आणि लघुसंदेश सेवा या माध्यमांतून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, हे असते. टीव्हीद्वारे मुलांना शिक्षण देण्याच्या प्रक्रियेला पश्चिम बंगालमध्ये सुरुवातदेखील झाली आहे.
महाराष्ट्रातही असा प्रयोग राबविण्याचा विचार शासन पातळीवर गांभीर्याने केला जात आहे. साक्षरता आणि सामाजिक-आर्थिक दर्जा यांच्या पलीकडे जाऊन आज प्रत्येक पालक किंवा कुटुंब त्यांच्या पाल्याच्या शिक्षण प्रक्रियेत सहभागी होत आहे. पाल्याला मदत करू पाहात आहे. आपल्या पाल्यांचे शिक्षण अधिकाधिक सुकर कसे होईल, यावर पालक भर देऊ लागले असून ते एसएमएस सेवा, टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांचा अधिक खुलेपणाने वापर करू लागले आहेत.
कोरोनाचा प्रभाव ओसरू लागला की, अनेक शाळा-विद्यालये कोरोनामुळे अभ्यासापासून वंचित राहिलेल्या सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी/हिवाळी शाळा शिबिरे भरवतील. तसेच विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करून त्यांच्यासाठी जादा वर्ग किंवा नियमित शिकवण्या सुरू केल्या जातील. कोरोनाकाळात अनेक शाळांनी त्यांच्या वार्षिक परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे वर्षभरातील कामगिरीच्या आधारावरच मुलांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनातून त्यांना शिक्षणात येणा-या अडचणी ओळखता येतात तसेच शिकवण्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम पाहता येतो, त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे, या प्रक्रियेला तरी पूर्णविराम देऊ नये. तसेच सरकारनेही शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नियमित आर्थिक आधार उपलब्ध करून द्यावा.
धोरणांची आखणीही अशा पद्धतीने केली जावी की, ऑनलाइन पद्धतीने शिक्षण क्षेत्र संस्थांना पूर्ण मोकळीक  धोरण निश्चितीतही सर्जनशीलता, शैक्षणिक स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता आणि ना- नफा किंवा राजकीय प्रभावापासून दूर राहणे इत्यादी घटकांना प्राधान्य द्यायला हवे.

समारोप


धोरणांची आखणी आणि निश्चिती केली जात असताना घरच्या आघाडीवर पालकांनी मुलांवर पुरेसे लक्ष ठेवत त्यांच्यावर या अभ्यासाच्या पूर्णपणे नवीन स्वरूपाची सक्ती न करणे गरेजेचे आहे. असेही होऊ शकते की मुले स्व-अभ्यासात स्वतःला गुंतवू पाहतील किंवा नवीन छंद जोपासतील अथवा वेळापत्रकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे न पाहता नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल वाढवू शकतील.

Tuesday, 16 November 2021

शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय समजून केल्यास अधिकाधिक उन्नती - मा. आ. सुजित मिणचेकर

हेरले / प्रतिनिधी

     शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय समजून केल्यास अधिकाधिक उन्नती होऊ शकते.  असे मत माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले‌  ते  हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील श्री. हनुमान सहकारी दूध व्यवसायिक संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव व पेठवडगाव बाजार समितीचे संचालक शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ॲड. शहाजी पाटील होते.
     डॉ. मिणचेकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जात होता. पण अलीकडील काळात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे ऊस पिक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान होत आहे.  परिणामी दुग्ध व्यवसाय हाच सध्या सर्वसामान्य शेतकरी व दूध उत्पादकांना तारणहार ठरत आहे. त्यामुळे हा व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून केल्यास अधिकाधिक आर्थिक उन्नती होऊ शकते. त्यासाठी संघाच्या विविध योजना व आधुनिक पद्धतीचा दुग्ध व्यवसायात विशेषतः जनावरांच्या संगोपनात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
      ॲड. पाटील यांनी म्हैस व गाय दूध दारातील प्रति पॉईंट सध्या समान दर आहे.  त्यामध्ये बदल करून म्हैस दुधास प्रति पॉईंट दहा पैशाची वाढ करणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. याकरीता संचालक मंडळाने गांभीर्याने विचार करावा.  तसेच दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून संस्थेने गावातील राजकीय परिस्थिती न पाहता येईल त्या दूध उत्पादकाला संस्थेच्या माध्यमातून सर्वोतोपरी आपण सतत सहकार्य करत असल्याचे सांगितले. 
       स. संकलन अधिकारी सुरेश पाटील यांनी गोकुळ दूध संघ,  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या तिघांच्या माध्यमातून  म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रकरणाबाबत  मार्गदर्शन केले. तसेच संस्था व उत्पादक यांनी म्हैस दूध वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य प्रविण यादव यांचेही भाषण झाले.स्वागत प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले, आभार मोहन पाटील यांनी व्यक्त केले.‌सचिव युवराज पाटील यांनी संस्थेचा आढावा सांगितला.याप्रसंगी डॉ. देशमुख, अशोक पाटील, अशोक देसाई, रंगराव पाटील, बजरंग चव्हाण, सचिन पाटील, हणमंत पाटील आदी उपस्थित होते.
        फोटो..
लाटवडे येथील हनुमान दूध संस्थेच्या वतीने माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहाजी पाटील, प्रविण यादव, शशिकांत पाटील, सुरेश पाटील, युवराज पाटील आदी.

Friday, 12 November 2021

विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचा वापर नवसंशोधनासाठी करावा: - सदाशिव चौगुले बालावधूत हायस्कूलमध्ये लॅबचे उद्घाटन'

  हेरले /प्रतिनिधी 
शालेय दशेत विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड व कल्पकता निर्माण होऊन भावी काळात संशोधक निर्माण व्हावेत या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण अटल टिंकरिंग लॅब व आय.सी. टी. लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये  नवसंशोधनाची आवड निर्माण व्हावी .असे प्रतिपादन बालावधूत  हायस्कूलचे संस्थापक सदाशिव चौगुले यांनी व्यक्त केले.
        मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील बालावधूत हायस्कूलमध्ये उभारलेल्या  टिकरिंग लॅबचे व आय. सी. टी. लॅबचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रूपाली कसबेकर व  गौतमी कसबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहरूनिसा बारगीर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात बालावधूत महाराज व  साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. 
         रूपाली कसबेकर म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना रोबो टेक्नॉलॉजीची गरज आहे. आणि नेमके तेच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या शाळेत दिले जाते. या रोबो टेक्नॉलॉजीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात शालेय जीवनातच मोठी भर पडलेली आहे .या शाळेतील विद्यार्थी भविष्यकाळात शाळेचे नाव उज्वल करतील व शाळेच्या विकासात भर घालतील असेही त्या म्हणाल्या .यावेळी विद्यार्थ्यांनी रोबोटची वेगवेगळी प्रात्यक्षिके स्टेजवर सादर केली .
         या कार्यक्रमास मेहरुनिसा बारगीर, रूपाली कसबेकर, गौतमी कसबेकर. सोनाबाई चौगुले,शाळेचे संस्थापक सदाशिव चौगुले, बाळासो कराळे, नारायण संकपाळ, सचिव संजय चौगुले, मुख्याध्यापक संजीव चौगुले, यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आर.एस. स्वामी यांनी केले. तर आभार वैशाली करके यांनी मानले.
  
फोटो 
 अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन करताना गौतमी कसबेकर, रूपाली कसबेकर, मेहरुनिसा बारगीर, सोनाबाई चौगुले, व अन्य मान्यवर (छाया सुरेश कांबरे )

Saturday, 6 November 2021

दूध उत्पादक हेच दूध संस्थेचे तारणहार : सतीशकुमार चौगुले

   हेरले (प्रतिनिधी)

  दूध उत्पादक हेच खरे दूध संस्थेचे तारणहार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेती बरोबर पशुपालनाकडे अधिक लक्ष द्यावे .यातून आर्थिक उत्पन्न तर मिळतेच शिवाय आपले आरोग्यही चांगले राहते.जय हनुमान दूध संस्थेने गोकुळ दूध संघाच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक सभासदांसाठी विविध योजना राबवून त्यांची आर्थिक उन्नती साधली आहे. असे प्रतिपादन  जय हनुमान दूध संस्थेचे चेअरमन सतीश कुमार चौगुले यांनी व्यक्त केले .
   हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील श्री जय हनुमान सहकारी दूध संस्थेच्या वतीने म्हैस दुधास लिटरला ९ रुपये ५० पैसे व गाय दुधास लिटरला ४ रुपये ६० पैसे असे उच्चांकी फरक बिल देऊन सुमारे २४ लाख रुपये फरक बिलाचे व  भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब थोरवत होते. प्रारंभी आर्थिक वर्षात संस्थेला झालेल्या नफा तोटा याचे विषयी संस्थेचे सचिव आण्‍णासो पाटील यांनी माहिती दिली .यावेळी दूध उत्पादक सभासद व विविध मान्यवरांचा सत्कार  करण्यात आला.
     या कार्यक्रमास व्हा. चेअरमन नेताजी माने ,जयवंत चौगुले, सुरेश कांबरे, शकील हजारी, महादेव शिंदे, रहीम नायकवडी, सुभाष मुसळे, महादेव चौगुले, सुनील सुतार, यांच्यासह संस्थेचे दूध उत्पादक सभासद, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महादेव शिदे यांनी केली. तर आभार सुरेश कांबरे यांनी मानले.

 फोटो 
   दूध उत्पादक सभासदांना फरक बिलाचे वाटप करताना चेअरमन सतीशकुमार चौगुले ,बाळासाहेब थोरवत, सुरेश कांबरे,व इतर मान्यवर.

Wednesday, 3 November 2021

वेद दिव्यांग संस्थेच्यावतीने परीसरातील दिव्यांगांना दिवाळी भेट वस्तू वाटप

हेरले प्रतिनिधी
दि.3/11/21

दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांच्या सेवाभावी संस्थेस गणेश मंदिरानजीक दोन गुंठे जमिन दिली असून या ठिकाणी सभागृह उभारण्यासाठी  जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील आपल्या विकास निधीतून  प्रयत्नशिल आहेत असे मत माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केले. ते हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे येथील वेद दिव्यांग अपंग सेवाभावी संस्था यांच्यावतीने परीसरातील दिव्यांग व अपंग बांधवांना दिवाळी भेट वस्तू वाटप प्रसंगी बोलत होते.या वेळी  माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते दिवाळी भेट वस्तू वाटप  करण्यात आले.
    या प्रसंगी पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार, सरपंच प्रतिनिधी संदीप चौगुले ,उपसरपंच  फरीद नायकवडी, ग्रामपंचायत सदस्य  राहुल शेटे,बाळगोंडा पाटील, शिवाजी भोसले तसेच गावातील अपंग  दिव्यांग बांधव व महिला उपस्थित होत्या.
       फोटो 
हेरले येथे  वेद दिव्यांग अपंग सेवाभावी संस्था यांच्यावतीने परीसरातील दिव्यांग व अपंग बांधवांना दिवाळी भेट वस्तू वाटप करतांना  माजी सभापती राजेश पाटील  व अन्य मान्यवर