Saturday, 30 April 2022

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात गुणवत्ता दाखवावी -- डॉ अजितकुमार पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 
कसबा बावडा येथील प्राथमिक शिक्षण समिती संचलित म न पा  राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बाबडा, कोल्हापूर सी आर सी अंतर्गत राजर्षी शाहू कथाकथन स्पर्धा संपन्न झाल्या. 
प्रथम क्रमांक कल्पना नारायण मैलारी-- म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा,कोल्हापूर व द्वितीय क्रमांक सानवी सत्यजित नाळे छत्रपती शाहू विद्यालय,कोल्हापूर यांचे क्रमांक प्राप्त झाले एकूण 9 स्पर्धक सहभागी झाले होते.अमर मोटे, सायली जाधव,रणजित पाटोळे,यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .
स्पर्धा यशस्वी साठी आसमा तांबोळी, विद्या पाटील, अनुज कारंडे, समर्थ चौगले,यश दाभाडे,यांनी सहकार्य केले.स्पर्धा संयोजक डॉ अजितकुमार पाटील यांनी केले. व आभार तमेजा मुजावर यांनी मानले.

Thursday, 28 April 2022

विद्यार्थ्यांनी करिअर करून नाव उज्वल करावे - अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

--
 
--पालकांनी जागरूक राहणे काळाची गरज आहे.


हेरले प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी रँगीग  , मोबाईलचा दुरुपयोग करणे यासारख्या गोष्टीत राहू नये. स्वतःचे करिअर करून आई, वडील, गाव , गुरु व महाविद्यालयाचे नाव उज्वल करा.   विद्यार्थ्यांनी क्षनिक सुखाच्या मागे न लागता भविष्यकाळाचा विचार जबाबदारीने रहावे. धावत्या युगात  कुटुंबातील संस्कार झालेले   विद्यार्थी नेहमी चांगल्या गोष्टीत पुढे असतात. पालकांनी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे .लहानपणापासूनच मुलांच्या अभ्यासाबरोबरच वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन  गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले. त्या नवे पारगाव ता हातकणंगले येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या आयोजित विद्यार्थी पालक जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या .अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ .शिल्पा कोठावळे
 होत्या .स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी यांनी केले.
                  
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन दीपप्रज्वलन झाले. अधीक्षक जयश्री गायकवाड भाषणात पुढे म्हणाल्या महिलांच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्भया पथक तैनात असून घटना घडल्यास पंधरा ते अठरा मिनिटात निर्भया पथकाची मदत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थीदशेत  हातून चूक होऊन गुन्हा दाखल झाल्यास भविष्यकाळात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागेल. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रवेश घेतलेल्या व नीट परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या भाषणात डॉ .शिल्पा कोठावळे यांनी दंत महाविद्यालयातील गुणवत्तेविषयी व  सोयी-सुविधांची माहिती दिली. तसेच नवनिर्वाचित विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा पुढे सुरु ठेवावी असे सांगितले.
     याप्रसंगी डॉ सविता  ठक्कनवार, डॉ रजनी कुलकर्णी, डॉ सूर्यकांत मेटकरी, डॉ के के माने  ,डॉ अभिजीत शेटे, डॉ संगीता गोलवलकर, डॉ किशोर चौगुले, डॉ शिल्पा शेट्टी, डॉ सुधा पाटील - हंचनाळे ,डॉ राहुल ढाले, डॉ नंदन ,डॉ विना, डॉ अंकुर कुलकर्णी ,डॉ स्नेहल शेंडे, डॉ योजना पाटील डॉ शर्मिष्ठा घोडके , डॉ डेव्हिड उपस्थित होते. सूत्रसंचालन अथर्व महाडिक रिया रोचलानी यांनी केले आभार डॉ सुमित शेठगार  यांनी मानले 

फोटो   1)नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ हरीश कुलकर्णी सोबत व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ शिल्पा  कोठावळे

2) नवे पारगाव येथे तात्यासाहेब कोरे दंत  महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न.


कोल्हापूर/ प्रतिनिधी

   लोकराजा राजर्षी छत्रपती  शाहू महाराज  स्मृतिशताब्दी कृतज्ञता महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व शैक्षणिक वर्ष २०२२ / २३ च्या शैक्षणिक नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची  माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ  आंबोकर यांचे अध्यक्षतेखाली प.बा.पाटील माध्यमिक विद्यालय मुदाळ येथे  मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली.
     माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर  यांनी लोकराजा राजर्षि शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञतापूर्वच्या निमित्ताने घेण्यात  येणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ग्रंथप्रदर्शन या संदर्भाने माहिती दिली.तसेच ग्रंथप्रदर्शनास द्यावयाच्या भेटीचे तालुका निहाय नियोजन सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजनाच्या अनुषंगाने शाळा सिद्धी स्वच्छ विद्यालय पुरस्कार, विविध पत्रके परिपत्रके, आधार कार्ड अपडेशन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क, अधिनियम-२०१५ च्या कलम तीन मधील पोटकलम एक अन्वये लोकसेवा घोषित करणे याचे मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस शिष्यवृत्ती संदर्भामध्ये नियोजन करणे यासाठी                    सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
    या मुख्याध्यापकांची सहविचार सभेस भुदरगड तालुक्यातून  ५१,  राधानगरी तालुक्यातून ५७ व कागल तालुक्यातून ६५ असे एकूण १७३ शाळांचे मुख्याध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
   जागृती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज मध्ये मुख्याध्यापकांची सह विचार सभा झाली. या सभेत आजरा तालुक्यातून २९ , गडहिंग्लज तालूक्यातून ५९ तर चंदगड तालुक्यातून ५९ असे एकूण १४७ माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
     या सहविचार सभे प्रसंगी प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांनी केले.प.स.भूदरगडचे  गटशिक्षणाधिकारी दीपक  मेंगाणे,  उपशिक्षणाधिकारी एस. बी. मानकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर,मुख्याध्यापक संघाचे  उपाध्यक्ष बी. आर. बुगडे,संचालक प्राचार्य एस. आर. पाटील, एन.बी. पाटील आदी मान्यवरांसह मुख्याध्यापक संघाचे व सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     फोटो 
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर  मुख्याध्यापकांच्या  सहविचार सभेत बोलतांना.

Wednesday, 27 April 2022

हेरले येथील बाबासो दत्तू खांबे यांचे अल्पशा आजाराने निधन

निधन वार्ता
हेरले (ता.हातकणंगले) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व  कामधेनू दूध संस्थेचे माजी चेअरमन बाबासो दत्तू खांबे (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली चार जावाई व एक मुलगा असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवार दि. २८ रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

शिरोली विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

हेरले / प्रतिनिधी

पुलाची शिरोली येथील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेल्या शिरोली विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. 
नुतन संचालक मंडळ.
शब्बीर देसाई, संजय पाटील, धनाजी पाटील (सिक्सर), सतिश पाटील, जगन्नाथ पाटील, मदन संकपाळ, संदीप वंडकर, चंद्रकांत जाधव, बाबासाहेब कांबळे, अमित मुखरे, विश्र्वास गावडे, श्रीमती कमल सोडगे, श्रीमती अनुसया करपे.
निवडणुकीसाठी सत्ताधारी महाडिक गट व विरोधी शाहू समविचारी आघाडी या दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सर्वसाधारण गटामध्ये ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधील माजी उपसरपंच उदय पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील व भाजपाचे दिलीप शिरोळे या तिघांचे उमेदवारी अर्ज कर्जाची उचल न केल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते. तर शाहू आघाडीचे शंकर कोळी यांचा इतर मागास प्रवर्ग गटातील अर्ज दाखल्यावरुन अपात्र ठरविण्यात आला होता. 
या निवडणुकीसाठी विद्यमान चेअरमन निवास कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, माजी चेअरमन नारायण मोरे, के.व्ही. पाटील, सदाशिव संकपाळ, राजकुमार पाटील, शब्बीर देसाई, दिनकर पाटील, बजरंग खवरे, बाबासाहेब कांबळे आदी मान्यवर व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी सर्वसाधारण कर्जदार गटांमध्ये २७, महिला गटांमध्ये ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटांमध्ये २, भटक्या विमुक्त गटामध्ये २, अनुसूचित जाती जमाती गटामध्ये ३, असे एकूण ४० उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी होवून तब्बल अठ्ठावीस उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने हि निवडणूक बिनविरोध पार पडली. याची घोषणा १० मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक डॉ. प्रगती बागल करणार आहेत.
 हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी उपसरपंच उदय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, छत्रपती राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, कृष्णात खवरे, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, मारुती वंडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर माजी चेअरमन नारायण मोरे, के.व्ही.पाटील, दिनकर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार पाटील, बजरंग खवरे, सदाशिव संकपाळ आदींचे सहकार्य लाभले.

काखे येथील एएसके फौडेंशनच्या वतीनेआमदार निलेश लंकेना मानपत्र प्रदान

...............................

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोरोना काळात कौतुकास्पद काम करणाऱ्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा काखे येथील ए.एस.के.फौडेंशन यांच्यावतीने फौडेंशनचे अध्यक्ष प्रकाश सुर्यवंशी व युवराज चव्हाण, विजय चौगुले यांच्या हस्ते मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत असताना अनेक नेते,स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत कोविड सेंटरची उभारणी केली अशाच एका कोविड सेंटरची चर्चा राज्यासह अवघ्या देशभरात झाली होती. पारनेरन विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी भावळणी इथं तब्बल १ हजार १०० बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. फक्त कोविड सेंटर उभा करुन निलेश लंके थांबले नाहीत तर कोरोना रुग्णांवरील औषधोपचार,आहार इ. गोष्टींकडेही त्यांनी एखाद्या डॉक्टरप्रमाणे लक्ष दिलं.कोविड सेंटरमध्ये योग शिबिरं आयोजित करुन लंके यांनी रुग्णांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली.या कोव्हीड काळात आम.लंके यांच्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून मदतीचा हात दिला

आमदार लंके यांच्या कामाचं कौतुक म्हणूनच ए.एस.के.फौडेंशन, काखे यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. मेजर मारुती सूर्यवंशी, विजय चौगुले, युवराज चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी (अध्यक्ष ), दिपक सूर्यवंशी वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी मोरे, शिवाजी जंगम , शुभम लठ्ठे, विशाल कावळे, संदिप दाईंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. 


फोटो- काखे येथे पारनेरचे आमदार लंके यांचा ए.एस.के.फौडेंशन, काखे यांच्यातर्फे मेजर मारुती सूर्यवंशी, विजय चौगुले, युवराज चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी,दिपक सूर्यवंशी , शुभंम लठ्ठे यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.

Monday, 25 April 2022

पन्हाळा शाहुवाडी तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न.


कोल्हापूर / प्रतिनिधी

   लोकराजा राजर्षी छत्रपती  शाहू महाराज  स्मृतिशताब्दी कृतज्ञता महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व शैक्षणिक वर्ष २०२२ / २३ च्या शैक्षणिक नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची  माध्यमिक शिक्षणाधिकारी  यांचे मार्फत तालुकानिहाय खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा पन्हाळा तालुक्यातील देवाळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवाळे येथे पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न झाली.  देवाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.डी.भोसले  यांनी स्वागत केले.प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे  यांनी केले .
     माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर  यांनी लोकराजा राजर्षि शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञतापूर्वच्या निमित्ताने घेण्यात  येणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ग्रंथप्रदर्शन या संदर्भाने माहिती दिली.तसेच ग्रंथप्रदर्शनास द्यावयाच्या भेटीचे तालुका निहाय नियोजन सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजनाच्या अनुषंगाने शाळा सिद्धी स्वच्छ विद्यालय पुरस्कार, विविध पत्रके परिपत्रके, आधार कार्ड अपडेशन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क, अधिनियम-२०१५ च्या कलम तीन मधील पोटकलम एक अन्वये लोकसेवा घोषित करणे याचे मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस शिष्यवृत्ती संदर्भामध्ये नियोजन करणे यासाठी                    सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
     सभेसाठी पन्हाळा तालुक्यातील  ६३ व शाहूवाडी तालुक्यातील  ४६ असे  एकूण १०९ मुख्याध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.सहविचार सभे प्रसंगी उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे,  सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अजय पाटील,शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी एन.एस. शेळके, मुख्याध्यापक संघाचे तालुका स्तरावरील अध्यक्ष एस. आर. पाटील, मुख्याध्यापक संघाचे सहसचिव ए. एम. रणदिवे व सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक एच. वाय. शिंदे यांनी मानले.
    फोटो 
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर  पन्हाळा शाहूवाडी तालुक्याच्या मुख्याध्यापकांच्या  सहविचार सभेत बोलतांना.

एकविसाव्या शतकात संगणक ज्ञान आवश्यक डॉ अजितकुमार पाटील

*कोल्हापूर प्रतिनिधी 
प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बाबडा, कोल्हापूर मध्ये विवेकानंद महाविद्यालय व म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 संयुक्त पणे संगणक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली त्यामध्ये 5 वी ते 7 वी मधील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान व धडे देण्यात आले.कार्यशाळेचे उद्घाटन केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांचे हस्ते करणं आले,
प्रसंगी केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी एकविसाव्या शतकात संगणक ज्ञान हे कोरोनाकाळातील व त्यांनतर विद्यार्थ्यांना नवीन दिशा देण्यासाठी व नवीन तंत्रज्ञान घेत असताना त्याचा वापर योग्य प्रमाणात करून शैक्षणिक ज्ञान आत्मसात करावे व नवीन अभ्यासक्रम,शैक्षणिक व्हिडीओ,शैक्षणिक अभ्यास करत असताना अद्यावत ज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनातील महत्वाच्या गोष्टी साठी करावा असे प्रतिपादन केले. 
विवेकानंद महाविद्यालयचे टेक्नोसॅव्ही वाघमारे सर,राजश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार, सुशील जाधव,सुजाता आवटी,तमेजा मुजावर, शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी,इत्यादी नि कार्यशाळासाठी सहकार्य केले,व कल्पना मैलारी यांनी आभार मानले.

Saturday, 23 April 2022

शीतल अरुण व्हटे यांची 'सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन ऑफिसर 'अ' वर्ग ' पदी निवड

हेरले / प्रतिनिधी


         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिस या विभागासाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये हेरले (ता. हातकणंगले) येथील शीतल अरुण व्हटे (मुळ गाव सांगोला) यांची 'सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन ऑफिसर 'अ' वर्ग ' पदी निवड झालेने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

      शीतल अरुण व्हटे यांची ' सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन क्लास वन ऑफिसर' पदी निवड झालेने त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या माझ्या या यशामध्ये शालेयस्तर व कॉलेज स्तरावरील शिक्षकांचे मार्गदर्शन मौलीक ठरले. आई-वडिलांनी आहोरात्र केलेल्या कष्टमय जीवनातून मला उच्च शिक्षण देण्यासाठी धडपड सुरू ठेवून या पदापर्यंत पोहचविले, शिक्षकांचे व आई वडिलांचे माझ्या आयुष्यातील योगदानाची कृतज्ञता सदैव ज्ञात ठेवून मार्गक्रमन करणार आहे. या पदाच्या माध्यमातून तलाव बांधणे,बंधारा बांधणे व दुरुस्ती असे कार्य आपल्या अधिकारी पदातून होणार आहे. या कार्याच्या माध्यमातून जलसिंचन क्षेत्राची वाढ व जास्तीत शेती क्षेत्र ओलीता खाली आणून शेतकरी वर्गास जलसिंचनाची सोय करून उत्पादन वाढीच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
     वडील अरुण व आई संगिता व्हटे यांच्या जेष्ठ कन्या शीतल व्हटे यांचे माहेर 
 सोलापूर जिल्ह्यातील सांगोला गाव आहे.
 वडील अरुण व्हटे यांनी गावी चहाची टपरी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत प्रतिकूल परिस्थीत आपल्या लेकीला बीटेक व एमटेक पर्यंतचे उच्च शिक्षण दिले. त्यांचा लहान मुलगा संदीप व्हटे  बीएसी ॲग्री पदवी पर्यंत शिक्षण प्राप्त करून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी प्रचंड कष्ट केले आहे. मुलीने स्पर्धा परीक्षेतून यश मिळवित 'क्लास वन अधिकारी ' पदास गवसणी घालून आई वडिलांच्या कष्टाचे सोने केले.
        शीतल व्हटे यांनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण     माध्यमिक सांगोला विद्यामंदीर ज्युनिअर कॉलेज सांगोला  या ठिकाणी पूर्ण केले. बीटेक ( सिव्हील )इंजानिअरिंग शिक्षण केआयटी कॉलेज कोल्हापूर, एमटेक ( सिव्हील)चे पदवीत्तर शिक्षण सुरत या ठिकाणी पूर्ण केले. एमटेक शिक्षण पूर्ण झाले नंतर त्यांनी २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. चौथ्या प्रयत्नात सन २०१९ साली त्यांनी पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन केले. त्यांनी सन २०२२ च्या सुरुवातीस  मुलाखत दिली होती. या परीक्षेचा  मागील आठवड्यात निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये त्यांची सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन ऑफिसर 'अ वर्ग 'पदी निवड झालेने त्यांच्या माहेर कुटुंबियांना व सासर कुटुंबियांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले.
     त्यांचे मागील आठवड्यामध्ये दि. १३ एप्रिल रोजी  हेरले (  ता. हातकणंगले) येथील  विश्वजीत दादासो कोळेकर यांच्याशी विवाह झाला आहे. पती विश्वजीत यांचे  शिक्षण बीटेक झाले असून ते पुणे येथे सॉप्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी करीत आहेत. त्यांच्या लग्ना दिवशीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्या निकालामध्ये शीतल व्हटे यांची सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन ऑफिसर अ वर्ग पदी निवड झाली. त्यांना या दिवशी जीवनसाथी व क्लासवन अधिकारी पद एकच दिवशी प्राप्त झालेने त्यांच्या जीवनामध्ये दुग्ध शर्करा योगायोग जुळून आला.
       हेरले (ता. हातकणंगले) येथील दादासो कोळेकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनीआपला मुलगा विश्वजीत यास बीई पर्यंतचे उच्च शिक्षण दिले आहे.विश्वजीत पुणे येथे नोकरी करीत आहे. त्यांची पत्नी मिनाक्षी या ग्रामपंचायत सदस्या असून ते व पत्नी दोघेही गावची समाजसेवा करीत आहेत.
या दोन्ही कुटुंबांनी मुलांना उच्च शिक्षण देऊन समाज सेवेचा व्रत जोपासला आहे. या दोन्ही कुटुंबियांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.  
          शितल व्हटे यांचा सत्कार गावातील समस्त धनगर समाजाने केला. या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, डॉ. विजय गोरड, संदीप चौगुले,प्रा.संतोष कोळेकर ,प्रा. जी. बी. कोळेकर,स्वप्नील कोळेकर,शशिकांत कोळेकर,सुकुमार कोळेकर,आंबाजी कोळेकर ,वडील अरुण व्हटे,आई संगिता व्हटे, भाऊ- संदीप व्हटे,पती विश्वजीत कोळेकर, सासरे दादासो कोळेकर, सासू मिनाक्षी कोळेकर आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते.
        फोटो 
हेरले : शितल व्हटे यांचा सत्कार गावातील समस्त धनगर समाजाने केला. या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील,प्रा.संतोष कोळेकर ,प्रा. जी. बी. कोळेकर,वडील अरुण व्हटे,आई संगिता व्हटे,सासरे दादासो कोळेकर, सासू मिनाक्षी कोळेकर,पती विश्वजीत कोळेकर, भाऊ संदीप व्हटे आदी मान्यवर.

पुलाची शिरोली येथील गोदामाला शॉर्ट सर्किटने आग, पंचवीस लाख रुपयांचे नुकसान

हेरले / प्रतिनिधी

पुलाची शिरोली येथील अंबिका ट्रेडर्स या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री साडे बाराच्या सुमारास लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी आठ अग्निशमन टँकर सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रयत्न करत होते. आगीची भीषणता एवढी होती की यामध्ये छताला असणारे लोखंडी अँगलही वितळले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण आग लवकर आटोक्यात येत नसल्याने शेजारी असणार्‍या दुसर्‍या गोदामामध्ये आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. अंबिका ट्रेडर्स चे मालक लालजी रामजी भानुशाली यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. 
याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : कोल्हापूर - सांगली मार्गावर पुलाची शिरोली येथील श्री सिमंधर धाम जैन मंदिरासमोर मार्बल लाईनला अंबिका ट्रेडर्स हे बारदानाचे गोदाम आहे. भानुशाली कुटुंबातील हा व्यवसाय असल्याने त्याला लागूनच त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची गोदामेही आहेत. अंबिका ट्रेडर्सला लागून असणार्‍या वीजेच्या खांबावर रात्री साडे बाराच्या सुमारास स्पार्किंग झाले. त्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे अंबिका ट्रेडर्स या गोदामाला आग लागली. काही कळण्या अगोदरच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर कोल्हापूर, पेठवडगाव व इचलकरंजी येथील आठ अग्निशमन दलाच्या टँकरना पाचारण करण्यात आले. सभोवती टँकरने पाणी फवारणी सुरू होती. तरीही आग आटोक्यात येण्यासाठी तब्बल दहा तास लागले. गोदामात उंचच्या उंच रचून ठेवलेली शेकडो टन बारदाने यात जळून खाक झाली. शिवाय छप्पराला असणारे लोखंडी अँगलही वितळले. यामुळे मोठे नुकसान झाले. आगीचे लोट आणि झळांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांनाही दूर राहून पाणी मारावे लागत होते. आज दिवसभर नुकसानीचा अंदाज घेऊन याबाबत शिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.  
.....................
फोटो
शिरोली : येथील अंबिका ट्रेडर्स या गोदामाला लागलेली भीषण आग व झालेले नुकसान. 
........................................................................................

सल्फरची मात्रा कमी ठेवून साखरेचे उत्पादन केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आणि दर दोन्ही चांगले - मंत्री उमेश कत्ती

हेरले / प्रतिनिधी

सल्फरची मात्रा कमी प्रमाणात ठेवून साखरेचे उत्पादन केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आणि दर दोन्ही चांगले आहे. याचा फायदा साखर कारखान्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केला. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, पुणे व विश्वराज शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. कोल्हापूर येथील हाॅटेल फर्न येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी संकेश्वरच्या हिरा शुगर्सचे अध्यक्ष निखिल कत्ती, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष व उगार शुगरचे सोहन शिरगांवकर, सचिन शिरगांवकर, व्ही. एम. बायोटेकचे विष्णूकुमार कुलकर्णी, कार्यकारी संचालक मुकेश कुमार हे प्रमुख उपस्थित होते. 
मंत्री कत्ती म्हणाले, साखरेतील सल्फर हा घटक माणसाच्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे साखरेतील सल्फरची मात्रा कमी करत सल्फरमुक्त साखरेची निर्मिती हे उद्दिष्ट ठेवून विश्वराज शुगरने उत्पादन प्रक्रियेत बदल केले. परिणामी कमी प्रमाणात सल्फरची मात्रा ठेवून साखर उत्पादन घेतले. या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आणि चांगला दर मिळाला. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा चांगला दर देता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते करण्यात आले. 
विश्वराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मुकेश कुमार आणि स्वतंत्र कार्यकारी संचालक व व्ही. एम. बायोटेकचे विष्णूकुमार कुलकर्णी यांनी ऊसाच्या रसापासून थेट शुध्द साखरेची निर्मिती कशी करता येते याबद्दल माहिती दिली. यामुळे साखर कारखान्यांच्या रिफायनरी प्रकल्पावर होणार्‍या खर्चात बचत होईल. आणि त्याचा फायदा ऊस उत्पादकांना देता येईल याबाबतची तांत्रिक माहिती दिली. 
नाथ मास्कोबा साखर कारखान्याचे डॉ. वाय. एस. नेरकर यांनी बीटापासून साखर उत्पादन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. 
मोहन डोंगरे यांनी साखर आणि इथेनॉल उत्पादनाबाबत माहिती दिली. मोहन पाटील यांनी रिसेंट टेक्निक टू इन्प्रू शुगर कलर या विषयावर मार्गदर्शन केले. 
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या वतीने एन. व्ही. थेटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. 
..................
फोटो
कोल्हापूर : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन व विश्वराज शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना कर्नाटकचे मंत्री उमेश कत्ती, शेजारी निखिल कत्ती, एस. बी. भड, सोहन शिरगांवकर, व्ही. एम. कुलकर्णी, मुकेश कुमार आदी. 
...............................................................................................

Thursday, 21 April 2022

फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी कोल्हापूरला मेस्टा एक्सलंट स्कूल अवॉर्ड

कोल्हापूर / प्रतिनिधी
  महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन तर्फे देण्यात येणारा 'मेस्टा एक्सलंट स्कूल अवॉर्ड' फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी नागाळा पार्क यांना कोल्हापूरला देण्यात आला. हा पुरस्कार राज्यभरात उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना प्रदान करण्यात आला.
     शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते तसेच शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शाळाबाह्य उपक्रम तसेच विद्यार्थांचा बौद्धिक शारीरिक विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. संस्थापक अण्णासाहेब मोहिते,  मा मुख्याध्यापक सॅविओ फर्नाडिस सतत क्रियाशील असतात. या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला.

    या पुरस्काराचे वितरण १९ एप्रिल  रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री  नाम. ओमप्रकाश कडू,  शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षाताई गायकवाड,  पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  पर्यटन व पर्यावरण  विशेष उपस्थिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डेव्हिड प्लॅनेट  ऑस्ट्रेलिया या मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक  सॅविओ फर्नांडिस यांनी उच्चशिक्षण मंत्री नाम.उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.


फोटो 

मुंबई : शाळेचे मुख्याध्यापक  सॅविओ फर्नांडिस यांनी उच्चशिक्षण मंत्री नाम.उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना.

शौमिका महाडिक यांच्याकडून पेयजल योजनेच्या कामाची पाहणी

            
हेरले /प्रतिनिधी  
 मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाची पाहणी जि .प .च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केली. व सरपंच काशिनाथ कांबळे यांच्याकडून राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या कामाविषयी सध्या स्थितीचा आढावा घेतला.
      मौजे वडगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही २०१८ साली माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या फंडातून व माजी आमदार अमल महाडिक व शौमिका महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली. परंतु दोन वर्षे कोरोना चा काळ असल्याने सदर योजनेचे काम थोडे दिवस बंद होते. सध्या फिल्टर हाऊस व किरकोळ कामे वगळता ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे .तरी येत्या दोन-तीन महिन्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे कम पूर्ण करून गावासाठी शुद्ध व मुबलक पाणी देण्याचा मार्ग सुकर करावा अशा सूचना शौमिका महाडिक यांनी प्रशासनाला दिल्या.
         यावेळी सरपंच काशिनाथ कांबळे, दत्त सेवा संस्थेचे माजी चेअरमन श्रीकांत सावंत, ग्रा .पं. सदस्य अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, मधुकर अकीवाटे, स्वप्नील चौगुले, जयवंत चौगुले, अमोल झांबरे ,सागर आकिवाटे, शितल परमाज, पप्पू पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो 
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची पाहणी करताना जि .प .च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, सरपंच काशिनाथ कांबळे, श्रीकांत सावंत, व मान्यवर (छाया सुरेश कांबरे)

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व शैक्षणिक वर्ष २०२२ / २३ च्या शैक्षणिक नियोजनासाठी सहविचार सभा

हेरले / प्रतिनिधी

   लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज  स्मृतिशताब्दी कृतज्ञता महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व शैक्षणिक वर्ष २०२२ / २३ च्या शैक्षणिक नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची  माध्यमिक शिक्षणाधिकारी  यांचे मार्फत तालुकानिहाय सभांचे आयोजन त्यानुसार दि.१९ रोजी कोल्हापूर शहर व करवीर तालुका यांची सहविचार सभा घेण्यात आली. दि.२१रोजी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा कर्मवीर शैक्षणिक संकुल कुंभोज येथे पार पडली.
मुख्याध्यापक संघाच्यवतीने सर्व अधिका-यांचे  स्वागत करण्यात आले . प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे  यांनी केले.
          माध्यमिक शिक्षणाधिकारी  एकनाथ आंबोकर  यांनी सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. लोकराजा राजर्षि शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञतापूर्वच्या निमित्ताने घेण्यात  येणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ग्रंथप्रदर्शन या संदर्भाने माहिती दिली.तसेच ग्रंथप्रदर्शनास द्यावयाच्या भेटीचे तालुका निहाय नियोजन सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजनाच्या अनुषंगाने शाळा सिद्धी स्वच्छ विद्यालय पुरस्कार, विविध पत्रके परिपत्रके, आधार कार्ड अपडेशन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क, अधिनियम-२०१५ च्या कलम तीन मधील पोटकलम एक अन्वये लोकसेवा घोषित करणे याचे मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस शिष्यवृत्ती संदर्भामध्ये नियोजन करणे यासाठी मार्गदर्शन केले. सभेसाठी प्रभारी उपशिक्षणाधिकारी बी.डी. टोणपे, एस.बी.मानकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अजय पाटील 
तसेच सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहविचार सभेसाठी हातकणंगले तालुक्यातील १०२ मुख्याध्यापक तर शिरोळ मधील ६५ मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन  सागर माने यांनी केले. आभार सागर चुडाप्पा  यांनी मानले.
         या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे इरफान अन्सारी, प्राचार्य डी.एस. घुगरे, जितेंद्र म्हैशाळे, पी. डी. शिंदे,खंडेराव जगदाळे, अशोक हुबाळे आदी मान्यवरांसह तालुक्याचे पदाधिकारी व सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
      फोटो 
कुंभोज :  माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर   सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करतांना.

शिरोली येथील नवजीवन विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध


हेरले प्रतिनिधी
 शिरोली येथील नवजीवन विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून तीस वर्षांची परंपरा कायम राहिली आहे. पेठ वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. 
नवजीवन विकास सोसायटी ही गावात एक नामांकित अशी संस्था आहे. या संस्थेवर वर्षानुवर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सुरेश पाटील यांनी समतोल साधत वेगवेगळ्या गटांना न्याय देण्याचा या निवडणुकीत प्रयत्न केला आहे.
 ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य के.व्ही. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश पाटील आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.
 नूतन संचालक मंडळ पुढील प्रमाणे, सुरेश तात्यासाहेब पाटील, पांडूरंग तावडे, नामदेव करपे,  परशराम पाटील, राजाराम चौगुले, शिवाजी चव्हाण, हिम्मत भालदार, शिवाजी उनाळे, बजरंग पोवार, खानू पुजारी, राजू सुतार, भागीरथी दिंडे, रुक्मिणी पाटील आदी.

Tuesday, 19 April 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न

हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथे सिद्धिविनायक नर्सिंग होम व सयुंक्त बौद्ध समाज यांच्या सयुंक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.
 शिबिरामध्ये प्रा. प्रभूदास खाबडे  यांच्या शुभ हस्ते मूर्ती पूजन करून शिबिरास सुरवात झाली.शिबिराचे आयोजन हे  विशाल परमाज ,प्रभाकाश कुरणे,राहुल कटकोळे,सुरज कदम यांनी केले.
या आरोग्य शिबिराचा ८०लोकांनी लाभ घेतला. यापैकी ६० जनांचे मोफत इलेक्ट्रोकारडीओग्राम करण्यात आले. शिबिरास पंचायत समिती माजी सभापती जयश्री कुरणे,ग्रामपंचायत सदस्य बथुवेल कदम,उर्मिला कुरणे,ग्रामपंचायत सदस्य आरती कुरणे, संदीप चौगुले,बाजीराव कटकोळे ,संदीप कोले,अशफाक देसाई,रुपाली खाबडे  हे उपस्थित होते. स्वागत बाजीराव कटकोळे यांनी केले.  आभार विशाल परमाज यांनी मानले.
     फोटो 
हेरले : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रा. प्रभूदास खाबडे  यांच्या शुभ हस्ते मूर्ती पूजन करून झाली.

घोडावत विद्यापीठाच्या निवेदनाची शासनाकडून दखलरस्ते सुस्थितीत करण्याबद्दल विद्यापीठ विद्यार्थी परिषद प्रशासनाला दिले पत्र



हेरले प्रतिनिधी

संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने दि. ८ एप्रिल रोजी  हातकणंगले बसस्थानकासमोर झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्था व तसेच त्याच्या दुरुस्ती संदर्भात शासनाला निवेदन दिले होते व २० एप्रिल पर्यंत सर्व कामे पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याचीच दखल घेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री.व्ही.डी. पंदरकर यांनी ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे पत्र विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद प्रशासनाला दिले.
शिरोली ते अंकली रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी व इतर अनुषंगिक कामासाठी निविदाद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मौजे हातकणंगले येथील रस्त्याच्या झालेल्या दुरुस्ती बाबतचे काम आय आर सी च्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरु करून संबंधित ठेकेदारास रस्ते सुस्थितीत ठेवण्यासंदर्भात आवश्यक सूचना कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत असे श्री. पंदरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावरच अतिग्रे याठिकाणी संजय घोडावत विद्यापीठाचा कॅम्पस आहे. या विद्यापीठात जवळपास १६ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मार्गावर सतत या शिक्षण संकुलात शिकणारी मुले, शिक्षक व इतर स्टाफ त्यांच्या वाहनाने ये-जा करत असतात. हातकणंगले बस स्थानकासमोरील या राज्य महामार्गाची सध्या दुरावस्था झाल्यामुळे जयसिंगपूर व सांगली परिसरातून येणाऱ्या विद्यार्थी व स्टाफ ना तसेच परिसरातील नागरिकांनादेखील दररोज नाहक त्रास होत आहे. तसेच हातकणंगले येथे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे की दुचाकी चालविणाऱ्याना दररोज अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या सर्व होणाऱ्या त्रासामुळे विद्यार्थ्यांनी या संदर्भात निवेदन दिले होते. २०१४ साली अंकली टोल नाक्यावर हाच मार्ग सुस्थितीत करण्यासाठी शिक्षण संकुलाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी आंदोलन केले होते.
प्रशासनाने घेतलेली दखल लक्षात घेता विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने २० तारखेनंतर होणारे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु १ मे पर्यंत जर रस्ते दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण होऊन रस्ता सुस्थितीत झाला नाही तर मात्र विद्यापीठाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व विद्यापीठ व्यवस्थापन यांनी हातकणंगले येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

Monday, 18 April 2022

हेरलेत आशा वर्कर्सना छत्री, पर्स व स्टेशनअरी साहित्याचे वाटप


हेरले / प्रतिनिधी

हेरले ( ता. हातकणंगले) येथे हेरले आशेचे व्दार प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने  गावातील आशा वर्कर्स यांना छत्री, पर्स व स्टेशनअरी साहित्याचे वाटप करण्यात आले. 
     आशेचे व्दार प्रतिष्ठान ही सेवाभावी महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यातील गोरगरीब कुटूंबियांना अत्यावश्यक वस्तूसह इतर मदतही  करते. संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात अशाच पध्दतीचा सामाजिक उपक्रम हेरले गावात संपन्न झाला.

   या कार्यक्रम प्रसंगी  सरपंच अश्विनी चौगुले,  संदिप चौगुले यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कोल्हापूर जिल्हाचे सुपरवापार निलेश काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन जोसेफ पवार, जितेंद्र लोंढे, प्रशांत खावड्डिया, सचिन जाधव व प्रदिप लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वयंमसेवक अभिजीत चोपडे, राजू माने, रोहित कदम, प्रशांत गायकवाड, गजानन डोंगरे यांचे योगदान लाभले. या प्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन  अभिजीत चोपडे यांनी केले .

      फोटो 
हेरले गांवात आशा वर्कर्सना छत्री, पर्स व स्टेशनअरी साहित्याचे वाटप करतांना आशेचे व्दार प्रतिष्ठान पुणे संस्था

झंवर उद्योग समूहाच्या वतीने जोतिबा यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत बससेवा

हेरले / प्रतिनिधी


शिरोली औद्योगिक वसाहतीमधील झंवर उद्योग समूहाच्या वतीने जोतिबा यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत बससेवा, चिक्की व सरबत वाटप असा उपक्रम राबविण्यात आला. मोफत बससेवेचे उद्घाटन झंवर उद्योग समूहाचे संचालक निरज झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. 
झंवर उद्योग समूहाच्या वतीने कंपनीच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीब्लिटी योजनेतून प्रती वर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. जोतिबा यात्रेनिमित्त कर्नाटक व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. वाहतूकीअभावी त्यांची गैरसोय होवू नये म्हणून कंपनीच्या वतीने पाच खासगी प्रवासी बसची दिवसभर मोफत सेवा सुरू होती. बसमधून प्रवास करणाऱ्या भाविकांना चिक्की व सरबत वाटप करण्यात आले.  कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत संपूर्ण दिवस सरबत वाटप करण्यात आले. 
यावेळी झंवर उद्योग समूहाचे संचालक निरज झंवर,  रोहन झंवर,  सौ. जिया झंवर, सौ. अंकिता झंवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आदी उपस्थित होते. 
..............................
फोटो
पुलाची शिरोली, कोल्हापूर येथे मोफत बससेवेचे उद्घाटन करताना झंवर उद्योग समूहाचे संचालक निरज झंवर, रोहन झंवर, सौ.जिया झंवर, सौ. अंकिता झंवर आदी.
............................................................................................

अंबपच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोडोली स्पोर्ट्स प्रथम

हेरले / प्रतिनिधी

सह्याद्री शिक्षण समूहाचे संस्थापक छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज पेडगावचे प्राचार्य व अंबप गावचे माजी उपसरपंच राजेंद्र माने यांचा वाढदिवस विविध  उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. 
   चार दिवसाच्या कालावधीमध्ये  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कोडोली स्पोर्ट्सचा प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक रेटरे धरण स्पोर्ट्स विजेत्या संघांना रोख रक्कम व  शील्ड देण्यात आले. 
  १५एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये  १२२ लोकांनी रक्तदान केले. विवेक वाचानालय अंबप यांना आवश्यक असणारे फॅन भेट देण्यात आले. शिये येथील करुणा अनाथ आश्रमात  मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .त्याच बरोबर कोल्हापूर येथील एकटी अनाथालयातील  महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले अशा विविध उपक्रमाद्वारे राजेंद्र माने  यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या सर्व उपक्रमांमध्ये अंबप व अंबप पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
     विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातील  मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. जि.प.सदस्य दलितमित्र अशोकराव माने  अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने होते.  खालील मान्यवर प्रमुख उपस्थित होते जि.प.सदस्या मनिषाताई माने. माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने, पंचायत समिती सदस्य व माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील, वारणा साखर कारखान्याचे संचालक प्रा. प्रदीप तोडकर,अंबप गावचे लोकनियुक्त सरपंच बी एस अंबपकर,  उपसरपंच कृष्णात गायकवाड, ग्रा.प. सदस्य डॉ . मिलींद पाटील, बंडा हिरवे, माजी सरपंच विश्वनाथ पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष माजी सरपंच संतोष उंडे, माजी सरपंच संपतराव कांबळे, अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ . एन बी चौगले  , राजेंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप पाटील , पाडळी गावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, अंबपवाडीचे माजी सरपंच पांडुरंग खोत,डेसरपंच पिंटू खोत,  मनपाडळे गावचे सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे अंबप गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड , भाजप सरचिटणीस दिपक ढाले, डि.के.माने,दिनकर सूर्यवंशी , महेश माने बबन चिबडे, म्हाकूजी हिरवे, सर्जेराव वाघमोडे, अजित माने,रोहीत चिबडे, प्रथमेश माने,विनायक चिबडे ,रणजीत चिबडे, सतीश मोरे ,राजू काळे ,कुमार वाघमोडे, आदर्श रिक्षा युनियनचे अध्यक्ष रमेश निलजे, काकासो जगताप राजेंद्र युवा मंचचे सर्व कार्यकर्ते विविध तरुण मंडळाचे सदस्य बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते तसेच सह्याद्री शिक्षण संस्था पूर्ण पूर्ण सेवकवर्ग उपस्थित होता.

Sunday, 17 April 2022

हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसाचे आरोग्य शिबीर संपन्न.


हेरले / प्रतिनिधी


  हेरले  (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य वरधिनी केंद्राचा  चौथा  वर्धापन दिवस दोन दिवस विविध आरोग्य तपासणी शिबीराच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला.
    केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य वरधिनी केंद्र रूपांतर करण्यात आले. याला १४ एप्रिल२०२२ रोजी  ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दि.१६ व १७ रोजी विविध प्रकारच्या आरोग्य विषयक कार्यक्रमाचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजन करण्यात आले आले होते. 
  यामध्ये " इ संजीवनी च्या माध्यमातून आरोग्य वरधिनी केंद्राच्या ठिकाणी टेलीकनसलटेशन सेवा "  या माध्यमातून  बी.पी., शुगर, कॅन्सर या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना तपासणी करून सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सेवा दि. १६ एप्रिल रोजी रुकडी, अतिग्रे, चौकाक, माले व हेरले येथील  ६ उपकेंद्रवर तसेच  पीएचसी  मार्फत देण्यात आले. यामध्ये ३५  टेलीकनसलटेशन, १६६ हेल्थ आय. डी., याखेरीज ३० वर्षावरील २४७ लाभार्थीची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच  १७ एप्रिल रोजी उपकेंद्र  व  पीएचसी पातळीवर योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजन वैद्यकिय अधिकारी  डॉ. राहुल देशमुख  यांचे मार्गदर्शनाखाली व, उपकेंद्र कडील सर्व सीएचओ, आरोग्य सेवक, सेविका यांनी परिश्रम घेतले.
            फोटो 
हेरले: प्राथमिक आरोग्य केंद्र  येथे  आरोग्य वरधिनी केंद्राचा  चौथ्या  वर्धापना  निमित्त आरोग्य तपासणी करतांना वैद्यकिय अधिकारी डॉ.राहूल देशमुख सीएचओ आरोग्य सेवक सेविका व रुग्ण.

भान ठेवून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी बेभान होऊन कार्यरत रहा - - इंद्रजीत देशमुख


कोल्हापूर / प्रतिनिधी

भान ठेवून वाचन संस्कृती वाढविण्याचे ध्येय ठेवा आणि बेभानपणे ते पूर्ण करा. वाचन संस्कृती ग्रंथप्रसार हा शिक्षण व्यवस्थेचा गाभा आहे. शिक्षकांनी वाचते व्हावे, आणि विद्यार्थ्यांनी वाचन करावे असे आवाहन प्रसिध्द विचारवंत व व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी केले.
   ते कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उत्कृष्ट शालेय समृध्द ग्रंथालय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ हे होते.
    प्रारंभी संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संघाच्या वाटचालीचा धावता आढावा घेवून वाचन संस्कृती आणि प्रसार समृध्द करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. संघाचे कार्यकारी मंडळाचे संचालक व स्पर्धेचे संयोजक प्राचार्य जीवन साळोखे यांनी या पुरस्कार प्राप्त शाळांना आज सातशेहून अधिक पुस्तके त्यांच्या ग्रंथदान उपक्रमातून भेटीदाखल देत अकरा हजार पुस्तक (ग्रंथ) देण्याचा टप्पा पूर्ण केला. याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
     यावेळी बोलताना इंद्रजीत देशमुख यांनी अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे दाखले देत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. माणसांचे आयुष्य ख-या अर्थाने श्रीमंत करावयाचे असेल तर वाचनाला पर्याय नाही. वाचनामुळे माणसाच्या आयुष्याला अर्थ आणि आशय प्राप्त होतो. पंचदानासारखा उपक्रमातून राबविला गेला पाहिजे. विद्यार्थी शिक्षक वाचते झाले तरच उज्ज्वल भविष्य आहे.
  यावेळी संघाचे व्हा. चेअरमन मिलिद पांगिरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य जीवन साळोखे यांनी स्पर्धेमागील भूमिका विशद करून वाचन संस्कृती समृध्दीचे आणि ग्रंथदान उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन संचालक रविंद्र मोरे यांनी केले तर आभार संघाचे व्हा. चेअरमन बी. आर. बुगडे यांनी मानले.

यावेळी महाराष्ट्र राज्य शाला कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, संघाचे जॉ. सेक्रटरी अजित रणदिवे, ट्रेझरर नंदकुमार गाडेकर, लोकल ऑडिटर इरफान अन्सारी, संचालक सुरेश उगारे, सखाराम चौकेकर, श्रीकांत पाटील, जितेंद्र म्हैशाळे, गुलाब पाटील, संजय देवेकर, एस.एस. चव्हाण ,माजिद पटेल, एन. एस. घोलप, संजय भांगरे, शिवाजी संचालिका अनिता नवाळे माजी संचालिका सुनंदा भागवत व आदी मान्यवरांसह पारितोषिक पात्र शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
      फोटो 
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट शालेय सम्रुध्द ग्रंथालय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ग्रंथ भेट, सन्मान चिन्ह आणि प्रतिमा देताना ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख, चेअरमन सुरेश संकपाळ, स्पर्धा संयोजक व ग्रंथदाते प्राचार्य जीवन साळोखे,सचिव दत्ता पाटील व इतर मान्यवर.

हेरले ( ता. हातकणंगले) येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी थाटामाटात व भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी

हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथे  हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी  थाटामाटात व भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी हनुमान भक्तांची मंदिर परिसरात गर्दी झाली होती.
  शुक्रवारी रात्री श्री भजनी मंडळ यांच्या वतीने गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शनिवारी पहाटे पाच वाजता           राजू गुरव व बंडू गुरव यांनी पूजा,         मंत्रपठन, पुष्पाजंली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न  केला. सकाळी हनुमान जन्मोत्सोव सोहळा संपन्न झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये हनुमतांची मुर्ती व गदेची पूजा करून श्री हनुमान मंदिररास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. 'श्री रामभक्त हनुमान की जय' या जयघोषात  पालखी सोहळा संपन्न झाला. दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी हनुमान भक्तांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. रांगेन जाऊन भक्तांनी दर्शन घेतले.
       या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संयोजन नंदकुमार माने, शरद माने, सुनील कारंडे, विजय कारंडे, अमोल कारंडे, भूपाल रुईकर, संतोष भोसले, धनंजय कारंडे,संदीप कागले, अर्जुन पाटील, जगदीश गडकरी,बाजीराव हवालदार, आप्पासो कागले, पांडुरंग शिंदे, सयाजी गायकवाडआदींनी केले.
     फोटो 
हेरले : हनुमान जन्मोत्सोव सोहळा.

Saturday, 16 April 2022

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध - - आम. राजूबाबा आवळे

    हातकणंगले प्रतिनिधी

  हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा हातकणंगले यांचे त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षक मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम. राजूबाबा आवळे  या प्रसंगी बोलताना म्हणाले, शिक्षकांचे जे विविध प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. 
   या वेळी हातकणंगले तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नूतन अध्यक्ष शशिकांत पाटील, सरचिटणीस अधिकराव पाटील, कार्याध्यक्ष सुरेश भानुसे, कोषाध्यक्ष विजय चौधरी, तालुका संपर्कप्रमुख इंद्रजीत कदम,महिला अध्यक्ष  सोनाली परीट,कार्याध्यक्ष फरजाना शिकलगार,सरचिटणीस वर्षा कवडे, कोषाध्यक्षा सुजाता गुरव आदींची कार्यकारणी निवडण्यात आली.  
   या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  एन. वाय. पाटील होते. शिक्षकांची जुनी पेन्शन योजना इतर राज्या प्रमाणे निर्णय घेण्यास सरकार बरोबर योग्य वेळी चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले. या दरम्यान सुखदेव पाटील या शिक्षकांनी मैदानी खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
   या कार्यक्रमास राज्य महिला आघाडी प्रमुख स्वाती शिंदे ,राज्य संपर्कप्रमुख एस. पी. पाटील ,राज्य उपाध्यक्ष आनंदराव जाधव,बाळासो निंबाळकर, रघुनाथ खोत, जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील, सरचिटणीस सुनिल पाटील,सुरेश कांबळे ,रावसाहेब देसाई, सुनील एडके ,रावसाहेब मोहिते,जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. सुत्रसंचालन महेश घोटणे यांनी केले.  आभार अरुण चाळके यांनी मानले.
       फोटो 
अतिग्रे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षक मेळावा प्रसंगी बोलतांना आमदार राजूबाबा आवळे शेजारी राष्ट्रीय अध्यक्ष  एन. वाय. पाटील,राज्य महिला आघाडी प्रमुख स्वाती शिंदे ,राज्य संपर्कप्रमुख एस. पी. पाटील ,राज्य उपाध्यक्ष आनंदराव जाधव,बाळासो निंबाळकर, रघुनाथ खोत, जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील आदी मान्यवर.

हेरले (ता. हातकणंगले) येथे श्री १००८ भगवान महावीर तीर्थंकर यांचा जन्मकल्याणक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा

हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथे
 श्री १००८ भगवान महावीर तीर्थंकर यांचा जन्मकल्याणक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  सकल दिगंबर जैन समाज  वीर सेवा दल यांच्या वतीने करण्यात आले होते.
  रथोत्सव भगवान महावीर जयंती निमित्त रथ, घोडे व वाद्यपथकांसह भव्य रथोत्सव मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जवाहर सहकार साखर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील, माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्य अशोक माने, रोहन पाटील, अमित पाटील, ए.बी. चौगुले, आदगोंड पाटील, प्रकाश चौगुले, डॉ. प्रविण चौगुले, उदय चौगुले, प्रकाश पाटील, ॲड. प्रशांत पाटील, सुनिल खोचगे, अमोल पाटील, पिंटू पाटील, भरतकुमार उंचगावे, अजित चौगुले आदी मान्यवरांसह श्रावक श्राविका मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
     रविवार दि. १० एप्रिल रोजी  रक्तदान शिबीर रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.सोमवार दि. ११ एप्रिल रोजी  लहान मुलांच्या विविध स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा दोरी उड्या स्पर्धा संपन्न झाल्या.मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी  सांस्कृतिक कार्यक्रम  सचिन चौगुले (उदगांव) यांचा भक्तिगीत, भावगीत व संगीत आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. बुधवार दि. १३ एप्रिल रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, कळस सजावट स्पर्धा, अष्टद्रव्य सजावट स्पर्धा संपन्न झाल्या.गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी श्री १००८ भगवान महावीर जयंती  पंचामृत अभिषेक पूजा भगवान महावीर जन्मकाळ सोहळा व भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
     शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी अहिंसा सदभावना रॅली व सायंकाळी मिरवणूक रथोत्सव भगवान महावीर जयंती निमित्त रथ, घोडे व वाद्यपथकांसह भव्य रथोत्सव मिरवणूक संपन्न झाली.
शनिवार दि. १६ एप्रिल रोजी  धर्म को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाल्या.
फोटो 
हेरले : रथोत्सव भगवान महावीर जयंती निमित्त रथ, घोडे व वाद्यपथकांसह भव्य रथोत्सव मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जवाहर सहकार साखर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील, माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्य अशोक माने, रोहन पाटील, अमित पाटील, ए.बी. चौगुले आदी मान्यवर

Thursday, 14 April 2022

हेरले येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती भव्य प्रमाणात साजरी

हेरले / प्रतिनिधी

कोरानाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हेरले (ता. हातकणंगले) येथे संयुक्त बौध्द समाज जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 'बोलो रे बोलो जय भीम बोलो ' असा जयघोष करत मंगलमय वातावरणात  भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अवघे गाव भीममय झाले होते.
  मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.प्रतिमा पूजन सरपंच अश्विनी चौगुले यांच्या हस्ते व ध्वजारोहण रंजित कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी  खासदार धैर्यशील माने, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील,माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी सभापती राजेश पाटील, रोहन पाटील,संदीप चौगुले, ग्राम पंचायत सदस्य बटूवेल कदम, आशा उलसार, आरती कुरणे, संजय खाबडे,प्रा. प्रभुदास खाबडे, जालिदंर उलसार , रवी चौगुले, रणजित खाबडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अशी माहिती संदीप चौगुले यांनी दिली.
      हेरले येथील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  व गौतम   बुद्धांच्या पुतळ्याचे पूजन केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाची गिते गायकांनी बँजोच्या माध्यमातून व बॅन्डच्या मधूर सुरातून सादर केली. लेसर शो, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर आंबेडकरी कार्यकर्ते बेभान होऊन नाचले. निळे झेंडे, पांढऱ्या साड्या, निळे फेटे परिधान केलेल्या महिला, पुरुषांसह अबाल वृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते.   
     फोटो 
          हेरले  येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांच्या सत्कार प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, रोहन पाटील व अन्य मान्यवर.

राजर्षि छत्रपती शाहु महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२ साजरे करणेबाबत विविध शैक्षणिक संघटनांची बैठक

हेरले / प्रतिनिधी

६ मे ते ११ मे  सहा दिवस लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२ साजरे करणेबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मंगळवार रोजी प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे  जिल्हा स्तरीय शिक्षक/ शिक्षकेत्तर सर्व संघटना यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस अध्यक्ष व उपाध्यक्ष व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.  
    या बैठकीमध्ये लोकराजा राजर्षि छत्रपती शाहु महाराज कृतज्ञता पर्वाचे आयोजन करणे संदर्भात नियोजन करण्यात आले. या पर्वामध्ये शाळा व महाविदयालय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच माध्यमिक शिक्षण विभागामार्फत चित्ररथाचे आयोजन करणेत आलेले आहे. चित्ररथाकरीता आर्थिक सहाय्य करणेकरीता विविध संस्थाकडून वर्गणी जमा करून  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करणेकरिता बैठकीमध्ये ठरलेप्रमाणे विविध संस्थाचे अध्यक्ष व सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेवून वर्गणीबाबत आवाहन करणेकामी सदर बैठकीमध्ये खालील समिती गठीत करण्यात आलेली आहे
अध्यक्ष एकनाथ आंबोकर,
उपाध्यक्ष एस.डी.लाड,सचिव आर.व्ही. कांबळे, सदस्य दादा लाड,दत्ता पाटील, इरफान अन्सारी, एस. एन. माळकर,बाबा पाटील ,राजेश वरक,उदय पाटील, व्ही. जी. पोवार,आर वाय पाटील,बाळ डेळेकर, खंडेराव जगदाळे,
संदिप पाटील आदींची निवड करून या प्रमाणे समिती गठीत करण्यात आली. या प्रसंगी  काकासाहेब भोकरे, सुधाकर निर्मळेसह विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.    
  समितीमार्फत निधी गोळा करणेकरीता समिती सदस्यानी शनिवार दिनांक १६/४/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता जि.प. कार्यालयामध्ये एकत्रीत येवून सांगरूळ एज्युकेशन सोसायटी,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग कोल्हापूर,स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी,दि न्यु एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर,प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर,विदयापिठ एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर,ताराराणी विदयापिठ कोल्हापूर,चाटे शिक्षण संस्था कोल्हापूर,
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर,
लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ साने गुरजी वसाहत कोल्हापूर,व. ज. देशमुख हायस्कूल कोल्हापूर, महाराणी शांतादेवी गायकवाड शिक्षण संस्था कोल्हापूर,
आंतरभारती शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर,कोल्हापूर चर्च कौन्सिल कोल्हापूर,मुस्लीम बोर्डींग ,सेंट झेवियर्स हायस्कूल, मुख्याध्यापक संघ,कोजिमाशी पतसंस्था ,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी बिंदूचौक,बहुजन माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था,डी.वाय. पाटील शिक्षण संस्था कोल्हापूर आदी संस्थाना भेटी देऊन निधी जमा करणेचे सर्वानुमते ठरविणेत आले.
     तसेच दिनांक ६ मे २०२२ रोजी  राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली म्हणून  ठीक १० वा १०० सेकंद एका जागी  स्तब्ध उभे राहणे यासाठी शाळेतील शिक्षक, मुले व पालकांना आवाहन करण्यास सांगितले. जागतिक विक्रम होईल असे शाळा स्तरावर नियोजन करावे असेही एकनाथ आंबोकर यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांना आवाहन केले.
      फोटो 
कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी  रोजी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये  जिल्हा स्तरीय शिक्षक/ शिक्षकेत्तर सर्व संघटना यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपस्थित अध्यक्ष व उपाध्यक्षसह संघटना प्रतिनिधी

Wednesday, 13 April 2022

मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील बालावधुत हायस्कूलमध्ये इयत्ता १० वी १९९६ च्या बॅचचा सस्नेह मेळावा आनंदात आणि उत्साहात संपन्न.

हेरले / प्रतिनिधी


    बालावधुत हायस्कूलमध्ये तब्बल २६ वर्षानंतर सस्नेह मेळावा आयोजित केला होता.सकाळ सत्रात शाळेतील सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तत्कालिम  संस्थेचे संस्थापक सचिव तथा माजी मुख्याध्यापक सदाशिव चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे विद्यमान सचिव  संजय चौगुले उपाध्यक्ष नारायण संकपाळ , शाळेचे मुख्याध्यापक सजीव चौगुले,माजी मुख्याध्यापक  एस.जी.पाटील, शिक्षक  के. एन. पाटील, आर. बी.पाटील, राजेंद्र स्वामी, अध्यापक झीरंगे, अध्यापिका  कारंडे,दत्तात्रय धोंगे ,क्लार्क श्रीरंग जाधव,शिपाई राजाराम चौगुले, सुनील सुतार, अनिल वडड यांचे सत्कार करण्यात आले, यावेळी तानाजी गोरड, प्रतिभा चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली. 

     शिक्षक राजेंद्र स्वामी यांनी ज्ञान ,विज्ञान आणि शिक्षण याच्याद्वारे मुलांचे कौतुक व्यक्त केले,मुख्याध्यापक  एस.ए.चौगुले यांनी  सर्व बॅचचे कौतुक केले आणि या असेच कार्यक्रम शाळेत आयोजित करावेत अशी इच्छा व्यक्त केली, संस्था सचिव संजीव चौगुले यांनी शाळेची आताची वाटचाल कशी आहे याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी मुख्याध्यापक सदाशिव चौगुले यांनी मुलांच्या अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण कांबरे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष सावंत यांनी केले आभार इंद्रजित भोसले यांनी  केले.
           सर्वानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर दुपार नंतर सर्व वर्गमित्रांनी आणि मैत्रिणींनी आपला एकमेकांचा संवाद साधला,यामध्ये सर्वच मुलांनी आपला आतापर्यंतच्या जीवनातील वाटचाल बद्दल मनोगत व्यक्त केली.
       फोटो 
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील बालावधुत हायस्कूलमध्ये इयत्ता १० वी १९९६ च्या बॅचचे विद्यार्थी सस्नेह मेळावा प्रसंगी तत्कालिन शिक्षकवृंद समवेत.

आदर्श गुरुकुल शिक्षण संकुलास समृद्ध ग्रंथालय पुरस्कार

*
हेरले / प्रतिनिधी
 
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामार्फत घेण्यात आलेल्या *कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट शालेय समृद्ध ग्रंथालय* स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज पेठ वडगाव या विद्यालयास शहरी विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 चा तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली होती. सन्मानचिन्ह व विविध पुस्तकांची ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार शिवम फाऊंडेशनचे संस्थापक मा. श्री. इंद्रजीत देशमुख साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार आदर्श शिक्षण संकुलाचे संस्थापक डॉ.डी.एस. घुगरे, सचिव सौ.एम.डी.घुगरे, ग्रंथपाल सौ. एस.बी.पाटील यांनी स्वीकारला.
      या पुरस्कार वितरण सोहळा करिता मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील व मुख्याध्यापक संघाचे सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित होते

शिक्षक संघाने घेतली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट.


हेरले / प्रतिनिधी

    हाॅटेल सयाजी कोल्हापूर येथे  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरी सहकारी बँकामधून सहकार चळवळीचे नेतृत्व करणार्‍या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला.

    *यावेळी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीचं कणखर नेतृत्व महिला जिल्हाध्यक्षा तसेच प्राथमिक शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालिका  लक्ष्मीताई पाटील  यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांना शिक्षकबँकेच्या अडचणी संदर्भात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सहकार क्षेत्रातील प्रश्नांविषयी चर्चा करून निवेदन दिले.
      विषय या प्रमाणे पगार तारण बँकेला वन टाइम सेटलमेंट योजना लागू करावी,  शिक्षक बँकेचा गतसालातील  प्रलंबित डिव्हीडंट  रिझर्व बँकेच्या  परवानगी शिवाय तो सभासदांना वाटता यावा,
शिक्षकांच्या कुटुंबातील  शेतीला शिक्षक बँके मार्फत कृषी योजनांचा लाभ मिळावा,
 शिक्षकांची मुले लघु उद्योगात वगैरे असतात त्यांना उद्योग विषयक सवलतीसह कर्ज मिळावे, शिक्षकांच्या मुलांना शैक्षणिक कर्जाची सुविधा मिळावी,ज्याशासकीय योजना शेडूल तसेच सरकारी बँकेमार्फत ज्या योजना व सवलती दिल्या जातात त्या शिक्षकांना शिक्षक बँकेमार्फत  मिळाव्यात.

शिक्षक पतसंस्था मध्ये ब वर्ग ठेवीदारांना ठेव ठेवणे मुभा असावी,रिजर्व्ह बँकेने लादलेले सोनेतारण कर्जावरील निर्बंध रद्द करावे.*

    *असे विविध मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. त्यावर जिल्हानेते रघुनाथ खोत, महिला आघाडी नेत्या  लक्ष्मीताई  पाटील , जिल्हाध्यक्ष  रविकुमार पाटील  व जिल्हा सरचिटणीस  सुनील पाटील ,अरुण चाळके ,बाळकृष्ण हाळदकर,दुंदेश खामकर,किरण शिंदे यांच्या सह्या आहेत.

     यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  नाम. सतेज उर्फ बंटी पाटील त्याच बरोबर बँक अध्यक्ष  निपुण कोरे , सामाजिक कार्यकर्ते  युवराज गवळी , केडीसीसी बँकेच्या संचालिका  स्मिता गवळी  यांचेसह सहकारातील अन्य जुनी जाणती मंडळी उपस्थित होती.

Tuesday, 12 April 2022

हेरलेतील विकासकामांचा शुभारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांचे हस्ते संपन्न.


हेरले / प्रतिनिधी
 हेरले ( ता. हातकणंगले) महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून हजारी कोपरा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - चर्मकार समाज व बौद्ध समाज या वसाहतीस जोडणारा रस्ता वीस लाख रुपये निधीच्या डांबरीकरणाचे उद्घाटन तसेच गावभाग मातंग समाज ( साई कॉलनी परिसर ) काँक्रीट रस्ता पाच लाख रुपये  निधीच्या कामाचे उद्घाटन व पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार  यांच्या फंडातून पाण्याच्या टँकरचे लोकार्पण सोहळा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाला.
 
 या कार्यक्रमा प्रसंगी जि.प. सदस्य अशोक माने,माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार , सरचिटणिस मुनिर जमादार, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच फरीद नायकवडी, गुरुनाथ नाईक, ॲड. प्रशांत पाटील, उदय चौगुले, माजी उपसभापती अशोक मुंडे,आबू जमादार, राहूल शेटेसह सर्व ग्रा पं सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
     फोटो
हेरले : जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांच्या फंडातून विकास कामाचा शुभारंभ करताना माजी खासदार राजू शेट्टी व अन्य मान्यवर.

Monday, 11 April 2022

मौजे वडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात


 हेरले /प्रतिनिधी
 हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे ग्रामदैवत हनुमान व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ४था वर्धापन दिन व अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रारंभ १० एप्रिल रोजी रामनवमी दिवशी होणार आहे. १०  ते १६  एप्रिल या  सात दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सोहळा समितीने केले आहे.
       सात  दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमास ह. भ. प. आबासो देसाई महाराज (कोल्हापूर), ह .भ. प. विनायक पाटील महाराज (गिरोली), ह. भ. प. हरिप्रसाद चांदेकर महाराज (चांदे) ,श्री सद्गुरु आदिनाथ महाराज श्री निरंजन आश्रम (मौजे वडगाव) ,ह. भ. प. विठ्ठल पाटील महाराज (शिरोली) ,ह. भ. प. पांडुरंग काळे महाराज (अतिग्रे) ,यांचे प्रवचन होणार आहे. तर संध्याकाळी ह. भ. प. युवा कीर्तनकार ओंकार सूर्यवंशी महाराज (तुरंबे), ह .भ. प. उत्तम गुरव महाराज (माधववाडी), ह. भ. प. वसंत शिंदे महाराज (पिशवी) ,ह .भ .प. वेदांताचार्य कृष्णानंद शास्त्री महाराज (कोल्हापूर) ,ह. भ. प. राजीवजी सुतार महाराज (सांगवडे ),ह. भ. प. हनुमंत पाटील महाराज (चिंचणी) ,यांचे कीर्तन होणार आहे दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ११ पर्यंत भव्य दिंडी सोहळा व ह .भ. प. भाऊसो पाटील महाराज (जांभळी) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे ३० वे वर्ष आहे. दररोज पहाटे काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, तर संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ होणार आहे. रात्री ७.३०  ते ९.३० वा. कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष  प्रकाश वाकरेकर, यांनी दिली.