कसबा बावडा-
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध शालेय उपक्रम व सहशालेय उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ मध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्मिती फिल्मचे निर्माते,प्रकाशक मा अनिल म्हमाणे, केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,प्राथमिक शिक्षण समिती कडील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी,उषा सरदेसाई, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,तज्ञ संचालक व माजी अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ मनोहर सरगर, पुरोगामी शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास पिंगळे, शिक्षक समिती अध्यक्ष संजय पाटील, सचिन पांडव क्रिडा निरीक्षक प्राथमिक शिक्षण समिती मनपा कोल्हापूर,उत्तम कुंभार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,अनुराधा गायकवाड इत्यादी विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.
सन 2022_2023 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जे विविध शालेय, सह शालेय उपक्रम आयोजित करण्यात आले होते त्या उपक्रमामध्ये क्रमांक मिळणार्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्तिपत्र वितरण सोहळा संपन्न झाला.. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्षा अनुताई दाभाडे व सदस्य तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ श्री अजितकुमार पाटील यांनी केले.
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे शाहू ग्रंथालयात प्रत्येक मित्रांनी एक पुस्तक भेट देण्यासाठी आणावे या आवाहन म्हणून प्रमुख पाहुणे अनिल म्हमाने यांनी 51 पुस्तके शाहू ग्रंथालयात भेट दिली तसेच प्राथमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी 11 पुस्तके व मनोहर सरगर यांनी 11 पुस्तके भेट दिलीत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी कल्पना मैलारी व जान्हवी ताटे, यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सर, मीनाज मुल्ला मॅडम, उत्तम पाटील सर, सुशील जाधव सर, आसमा तांबोळी मॅडम, तमेजा मुजावर मॅडम, विद्या पाटील मॅडम,बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील मॅडम, सावित्री काळे मॅडम तसेच सेवक हेमंतकुमार पाटोळे,यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार अदिती बिरणगे यांनी मानले.