हेरले ( प्रतिनिधी )
मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील नागरीकांच्या साठी राज्यातील शिधापत्रिका धारकांना फक्त १०० रुपयांत 'आनंदाचा शिधा' देण्याची घोषणा शिंदे - फडणवीस सरकारने केली होती.
या योजनेचा लाभ आंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील शिधापत्रिका धारकांना मिळणार असून यामध्ये १०० रुपयांत शिधापत्रिका धारकांना १ किलो रवा , १ किलो हरभरा डाळ, १ किलो साखर, तसेच १ लिटर पामतेल , या ४ वस्तूंच्या किटचे वाटप मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेच्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये उपसरपंच सुनिल खारेपाटणे व ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे यांच्या हस्ते व संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या किटचे वाटप करुण शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अँड . विजयकुमार चौगुले, व्हा.चेअरमन महालिंग जंगम, विलास सावंत, मधुकर आकिवाटे , शिवाजी जाधव, सेल्समन अमोल झांबरे यांच्यासह शिधापत्रिका लाभार्थी उपस्थित होते.
फोटो
आनंदाचा शिधावाटप शुभारंभ प्रसंगी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रां . पं . सदस्य सुरेश कांबरे, सेल्समन अमोल झांबरे व लाभार्थी