हेरले (ता. हातकणंगले) येथील
नदीकडील गडकरी व बारगीर पाणंद रस्ता व सवळ पाणंद रस्ता या रस्त्यांच्या मुरुमीकरणासाठी १० लाख रुपये विकास निधी माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले असून पाणंद रस्त्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी सरपंच राहुल शेटे, उपसरंपच
महंमदबख्तीयार जमादार ,श्री छत्रपती सोसायटीचे व्हा. चेअरमन कपिल भोसले,संचालक कृष्णात खांबे,चंद्रपभा सोसायटीचे संचालक जयसिंग गडकरी ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील,राजू देसाई,अल्ताफ बारगिर,सरदार सय्यद,अशोक कोळेकर,सुनील मोहिते, बशीर बारगिर,ठेकेदार अमोल कळमकर व शेतकरी सभासद उपस्थित होते.
फोटो
हेरले येथे पाणंद रस्त्यांच्या कामाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करतांना शेतकरी सरदार सय्यद सरपंच राहुल शेटे कपिल भोसले आदीमान्यवरासह शेतकरी