हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील लघू पाटबंधारे अंतर्गत पाझर तलावातून पाण्याचा एक थेंबही इतर गावांना देणार नसल्याचा ठराव ग्रामसभेत केला असून त्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने पचगंगा पाटबंधारे उपविभाग, कोल्हापूर येथील सहाय्यक अभियंता संदिप दावणे यांना देण्यात आले.
ग्रमसभेच्या ठरावातील मजकूर असा की, मोजे वडगाव येथील लघूपाटबंधारे अंतर्गत स्थापित असलेला पाझर तलाव हा मौजे वडगाव साठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामधून पिण्याचे पाणी गावासाठी व शेतीसाठी वापर करण्यात येत आहे. सदरचा तलाव १९७२ मध्ये पूर्ण झाला असून त्यासाठी लागणारी जमीन गावातील शेतकऱ्यांनी दिली आहे. तेव्हां पासून त्यामधील पाणी फक्त मौजे वडगाव मधील क्षेत्रांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येत आहे. भविष्यात लोकसंख्या वाढीमुळे पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे सदरच्या तलावामधील पाणी इतर कोणत्याही गांवाने मागणी केल्यास मंजूरी देण्यात येऊ नये त्याचे संपूर्ण अधिकार ग्रामपंचायत मौजे वडगाव यांच्याकडेच राहावेत आशा आशयाचे निवेदन पंचगंगा पाटबंधारे उपविभाग कोल्हापूर येथे दिले असून शिष्टमंडळात उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी उपसरंपच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, , माजी ग्रां . पं. सदस्य अविनाश पाटील , स्वप्नील चौगुले,रघूनाथ गोरड 'सामाजिक कार्यकर्ते अमोल झांबरे , अमर थोरवत , यांचा समावेश आहे.
फोटो
पंचगंगा पाटबंधारे उपविभाग, कोल्हापूर यांना निवेदन देतांना ग्रामपंचायत सदस्यांचे शिष्टमंडळ