केंद्रीय शाळा हेरले (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत येणारी विस्तारीत समाधान योजना राबविणेत आली. या कार्यक्रमाकरीता शासनाच्या महसूल, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, शिक्षण, परिवहन, सामाजिक वनीकरण, सहकार व पशुसंवर्धन इत्यादी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हेरले गावचे सरपंच राहूल शेटे, हातकणंगले तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार दिगंबर सानप व उपसरपंच बख्तियार जमादार यांचे हस्ते करणेत आले.
या कार्यक्रमांतर्गत उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविणेत येणाऱ्या लोकापयोगी योजनांची माहिती देणेत आली तसेच खालीलप्रमाणे सेवा पुरविणेत आल्या.
महसूल विभाग :- 7 / 12 वाटप - 50, वारसा नोंद-5, ए. कु. पु. कमी- 1, लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत अर्ज स्विकारणेत आला. उत्पन्नाचे दाखले 10, विभक्त रेशनकार्ड-1, फेरफार उतारे-10
उपस्थित अधिकारी :- हेरले मंडळ अधिकारी श्रीमती बेळणेकर , तलाठी हेरले- एस्. ए. बरगाले, कोतवाल- महंमद जमादार व हेरले मंडळातील इतर तलाठी व गाव कोतवाल.
आरोग्य विभाग:- NCD कार्यक्रमांतर्गत 108 लाभार्थ्यांची बिपी व शुगर तपासणी केली. 14 लाभार्थी हायपरटेन्शन व 6 लाभार्थी शुगर संशयीत आढळून आले.
आयुषमान भारत हेल्थ आयडी कार्ड (ABHA) योजनेअंतर्गत 122 लाभार्थ्यांचे ABHA कार्ड तयार केले व 144 लाभार्थ्यांना NCD पोर्टलला कार्ड लिंक करुन वाटप केले.उपस्थित कर्मचारी :- श्रीमती जोसना वाडकर (CHO), आर. बी. पाटील (MPW), श्रीमती आर.एच. मुलाणी (ANM), श्रीमती एल. डी. जाधव (ANM)
पुरवठा विभाग : 1) नवीन, दुबार व नुतनीकरण केलेली रेशनकार्ड-16 , रेशनकार्डमध्ये नाव कमी /वाढविणे 21
उपस्थित अधिकारी:- पुरवठा अधिकारी एस्. एम्. पजारी
निवडणूक विभाग:- मतदार यादीत नवीन नाव नोंदणी – 9 मतदार यादीतील दुरुस्ती व मतदान ओळखपत्र नुतनीकरण-5 उपस्थित अधिकारी :- श्रीमती शोभा कोळी निवडणूक नायब तहसिलदार, श्रीमती सुवर्णा खाबडे बिएलओ, श्रीमती सुषमा भिमराव कुरणे बिएलओ, श्रीमती शमशाद हसन देसाई बिएलओ हेरले
आधार सेवा केंद्र :- आधार नोंदणी व दुरुस्ती-27
उपस्थित कर्मचारी:- सं. आ. मुंगळे
सामाजिक वनीकरण :- उपस्थित नागरिकांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध योजनांची माहिती दिली. तसेच सरपंच हेरले यांनी ग्रामपंचायत हेरले मार्फत केल्या जाणाऱ्या वृक्ष लागवडीकरीता सामाजिक वनीकरण विभागामार्फत सहकार्य मिळण्याबाबत मागणी केली. उपस्थित अधिकारी :- व्ही. एन. खाडे (स.व.सेवक)
परिवहन विभाग :- परिवहन विभागामार्फत ज्येष्ठ नागरीक, महिला व विद्यार्थी यांचेकरीता राबविणेत येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरीकांना देणेत आली. सरपंच हेरले यांनी हेरले, मौजे वडगांव ते पेठ वडगांव या मार्गावरती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता एस.टी.चालू करणेबाबत निवेदन दिले.उपस्थित अधिकारी :- संपत पाटील वाहतूक नियंत्रक
महावितरण विभाग :- उपस्थित नागरीकांना नविन विज जोडणी, नावात बदल तसेच वीज बिलाबाबत असणाऱ्या विविध समस्या याबाबत मार्गदर्शन केले.
उपस्थित अधिकारी :- संदीप खंडू कांबळे (कनिष्ठ अभियंता महावितरण)
कृषी विभाग :- कृषी विभागामार्फत ग्रीन हाऊस, विविध शेतकी अवजारे, ठीबक, शेततळे, खते तसेच बि-बियाणे व सेंद्रीय शेती याबाबतचे शासनाचे मिळणारे अनुदान व राबविणेत येणाऱ्या विविध प्रोत्साहनपर योजना याबाबत उपस्थित शेतकरी व नागरीक यांना माहिती देणेत आली.
उपस्थित अधिकारी :- राहुल पाटील कृषी सहायक हेरले, सचिन आलमान कृषी सहायक
ग्रामविकास विभाग :- शासनाच्या रमाई, पंतप्रधान निवास योजना, पाणंद रस्ता व सांडपाणी निचरा, रस्ते बांधणी, अपंग कल्याणाकरीता असणाऱ्या विविध योजनांची माहिती देणेत आली. उपसरपंच बख्तीयार जमादार यांनी हेरले येथील लाभार्थ्यांना रमाई व पंतप्रधान निवास योजनेचे अनुदान वेळेवर उपलब्ध होत नसलेबाबतची बाब उपस्थित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. अशी माहिती प्रसिध्दीस पत्रकाद्वारे तलाठी एस. ए. बरगाले यांनी दिली.
फोटो
हेरले :कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना सरपंच राहूल शेटे, हातकणंगले तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार दिगंबर सानप, उपसरपंच बख्तियार जमादार डॉ. राहुल देशमुख आदी मान्यवर