कोल्हापूर प्रतिनिधि { संदीप पोवार }
31 डिसेंबरला हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाणार असाल तर सावधान कदाचित मटनामध्ये वासरे , बैल , म्हैस , गाय यांच्या मांसाची भेसळ असु शकते , याचेच एक उदाहरण काल पहायला मिळाले
काल सायंकाळी पाच च्या सुमारास एक पांढर्या रंगाची मारुती ओम्नी गाडी रमनमळा ड्रीम वर्ल्ड ते कसबा बावडा मार्गावरून जात असता कार च्या डिकीतुन एक तोंड बांधलेल्या अवस्थेतील वासरू खाली पडले , मागून येणाऱ्या वाहन चालकांनी ओम्नीला थांबण्याचा प्रयत्न केला मात्र ओम्नी भरधाव वेगात पुढे निघून गेली.
याच दरम्यान ट्राफिक पोलीस विजय पाटील आपल्या दुचाकी वरून कसबा बावडा कडे जात होते त्यांना या प्रकारा बाबत संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून ओम्नी ला थाबवले. गाडी थांबताच चालकाच्या शेजारी बसलेल्या इसमाने कार मधून पळ काढला.पाटील यांनी चालकाला पकडून त्याची चौकशी केली असता त्याचे नाव शब्बीर बेपारी {वडगाव } असल्याचे समजले
तोपर्यंत जमा झालेल्या अन्य नागरिकांनी गाडीची झडती घेतली असता त्या मध्ये मागील बाजूस २२ वासरू आणि रेडकू अक्षरशः कोंबून भरलली आढळली .जनावरे ओरडू नयेत या साठी त्यांची तोंडे दोरी व सुतळीने बांधली होतीे. वासरे हालचाल करु नये म्हणुन त्याच्या अंगावर मोठा टायर ठेवला होता त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.या बाबत लोकांनी बेपारी कडे चौकशी केली असता त्यान हि जनावरे बालिंग्या हून पेठवडगाव ला कत्तली साठी नेत असल्याच सांगितल.पेठवडगाव मधून त्याचा हॉटेल व्यावसायिकाना पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती त्यान दिली.
हा प्रकार ऐकताच नागरिक आवक झाले यातील काहींनी आपली संतप्त भावना व्यक्त करत त्याची धुलाई केली.हि जनावरे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल कत्तली साठी नेत असल्याचा संशय आल्याने जमाव अधिकच संतप्त झाला.त्यांनी आक्रमक होत ओम्नीची तोडफोड केली.
दरम्यान या घटनेची माहिती शाहुपुरीन पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी शब्बीर बेपारी ला ओम्नीसह ताब्यात घेतलं.पोलीस ठाण्याच्या आवारात वासरू आणि रेडकांची सुटका केली.मरणासन्न अवस्थेत असलेल्या या जनावरांना पोलीसांनी पांजरपोळकडे सोपवले पण गुदमरल्याने २ ते ३ वासरे दगावली