Wednesday, 7 December 2016

mh9 NEWS

बँक अकाऊंट नंबरवरुन पेटीएमच्या माध्यमातून 32,433 रुपयांची चोरी

मोबाईल रिचार्ज, टॅक्सी-रिक्षा पेमेंट, मेट्रो कार्ड रिचार्ज, सिनेमा तिकीटपासून अगदी चहा आणि भाज्यांच्या खरेदीसाठी लोक पेटीएमला पसंती देत आहेत.

 मात्र पेटीएमची वाढती मागणी लक्षात घेत, त्याच्या माध्यमातूनही अनेकांना फसवलं जात आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज येथे राहणारा राजकुमार सोनी या कडीया काम करणाऱ्या व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर चोरी करुन अज्ञाताने पेटीएम खातं उघडलं. या अकाऊंटच्या माध्यमातून राजकुमार सोनी यांच्या बँक खात्यातून 32,433 रुपयांची रक्कम एका दिवसात काढली. सुरुवातीला, 5000, नंतर 16,999 आणि शेवटी 10,434 एवढी रक्कम काढण्यात आली.

 त्यांनी हा प्रकार लक्षात आल्यावर  वेळीच अकाऊंटचं ट्रान्झॅक्शन थांबवलं. नाहीतर आणखी रक्कम गेली असती. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नोटाबंदीनंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनकडे नागरिकांचा कल वाढला. पण काहींच्या अज्ञानाचा फायदा घेत चोरांनी इथेही आपली कर्तबगारी दाखवत पैशांवर डल्ला मारला.

यासाठी सावधानता बाळगताना आपला मोबाईल कोणालाहि वापरण्यास देऊ नका कारण OTP च्या माध्यमातून तूमच्या मोबाईलवरील मेसेज हॅक करून कोणीही तुमचे बनावट खाते उघडून त्याद्वारे व्यवहार करू शकतो , तसेच आपला बँक अकाउंट नंबर , ATM कार्ड नंबर ,.सर्व पासवर्ड गोपनीय ठेवा ते कोणालाही सांगू नका 

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :