Tuesday 13 December 2016

mh9 NEWS

दत्त अवतार जन्मकथा

आज दत्त जयंती त्या निमित्ताने हा दत्त जन्म कथेचा खास लेख

 त्रेतायुगात अत्रीऋषींची पत्‍नी अनसूया ही पतीव्रता  होती. पातीव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु व महेश यांकडे जाऊन म्हणाले, ``अनुसयेच्या सामर्थ्यामुळे तिला देवपण मिळेल ,तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल ; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.'' हे ऐकून त्रिमूर्तीनि तिची  सत्व परीक्षा पाहण्याचे ठरवले   

        एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले व अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ``ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.'' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ``ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता', असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.'' मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले व जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ``तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.'' 
त्यावर `अतिथीला विन्मुख पाठविणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ``मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.'' 

मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, `अतिथी माझी मुले आहेत' व विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे ! 
त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करविले व बाळांचे रडणे थांबले.

             इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ``स्वामिन् देवेन दत्तं ।'' याचा अर्थ असा आहे - `हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).' यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण `दत्त' असे केले. त्यानंतर अत्रीऋषींनी अंतर्ज्ञानाने बाळांचे खरे रूप ओळखून त्यांना नमस्कार केला. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु व महेश त्यांच्यासमोर उभे राहिले व प्रसन्न होऊन `वर मागा', असे म्हणाले. अत्री व अनसूयेने `बालके आमच्या घरी रहावी', असा वर मागितला. तो वर देऊन देव आपापल्या लोकात गेले. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त व शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र व दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी परवानगी घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी व तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. हेच गुरूंचे मूळपीठ.



mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :