कोल्हापुरच्या वाट्याला रेलवेच्या बाबतीत कायमच निराशा आली आहे , मुळात छ़ शाहू महाराजांनी स्वत:ची जागा देऊन त्याकाळी दूरदृष्टीकोनातुन रेलवे कोल्हापुरपर्यंत आणली , आज सर्व लोकप्रतिनिधी रेलवेचा अग्रहक्काने मोफत प्रवास करतात ,पण कोल्हापुर रेलवेमार्ग विकासासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत ही शोकांतिका आहे
रस्तामार्गे कोल्हापुर ते मुंबई हे अंतर कारने अवघ्या ६ तासात पार होते ,
तर रेलवेला यासाठी १२ तास किमान व १४ तास कमाल लागतात ही कोल्हापुरवासियांसाठी शरमेची बाब आहे ,
साखर व गुळाची सर्वाधिक वाहतुक रेलवेमार्गेच होते ,
या मार्गावर दुपदरीकरण , विद्युतिकरण यांचा अभाव आहे , नविन कोणत्याही गाड्या कित्येक वर्षांपासुन सुरु झाल्या नाहीत
आता मा सुरेश प्रभु हे एक मराठी नेतृत्व रेलवेमंत्री पदी विराजमान आहेत , किमान त्यांच्याकडुन तरी कोल्हापुरच्या रेलवे विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त करूया
प्रभुसाहेब ट्विटरवरुन लोकांचे प्रश्न सोडवतात असे ऐकले आहे , यासाठी त्यांचा ट्विटर आयडी तुम्हाला येथे देत आहोत ,
@sureshpprabhu
या बातमीची लिंक त्याच्यापर्यंत व आपआपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जरुर पोहचवा हा तुम्हाला संविधानाने दिलेला हक्क आहे त्याचा जरुर वापर करा