नोटाबंदीनंतर अनेकांना सामान्य जनतेला रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसत असले तरी एलआयसीला मात्र अच्छे दिन आले आहेत. शहरात एका बड्या व्यापाराने एक दोन नव्हे तर तब्बल ५० कोटी प्रिमियम असलेली पॉलिसी घेतल्याचे वृत्त मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
एलआयसीच्या जीवन अक्षय निवृत्ती योजनेअंतर्गत मुंबईच्या एका रियल इस्टेट व्यावसायिकाने ही विक्रमी पॉलिसी घेतली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेकांनी हाय प्रिमियम पॉलिसी विकत घेतल्या आहेत. नोटाबंदीनंतर बॉलीवूडच्या एका बड्या स्टारने २ कोटीची पॉलिसी विकत घेतली. या पॉलिसीअंतर्गत या स्टारला वर्षाला १५ लाखाचा परतावा मिळणार आहे.
आपला कर वाचावा म्हणून या कलाकाराने पॉलिसी विकत घेतल्याचे वृत्त सोशल मिडियावर वणव्यासारखे पसरले. त्यामुळे, ही माहिती बाहेर कशी आली याबद्दल चौकशी व्हावी असे आदेश एलआयसीने दिले आहेत.