सध्याच्या आधुनिक काळात ऑनलाईन शॉपिंगने चांगलेच बाळसे धरले आहे , डिसकाऊन्टच्या ऑफर्सचे आमिष दाखवत नवनवीन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात चांगलेच यश आले आहे , पण या ऑनलाईन शॉपिंगने कित्येकांना गंडवले पण आहे
नुकतेच एकाने आपल्या बाळासाठी खेळणे ऑर्डर केले होते त्यासाठी १५० रु ऍडव्हान्स पेमेंट केले होते पण त्याला पार्सलमधून खेळण्याऐवजी रद्दी कागदाचा कचरा मिळाला , यापूर्वीही कोल्हापुरात एका व्यक्तीला स्मार्टफोनऐवजी त्याच वजनाची आणि मापाची काच पार्सलमधून देऊन फसवले होते
अश्या घटना टाळण्यासाठी खालील सूचना पाळा
१ ऑनलाईन शॉपिंग अधिकृत व मान्यताप्राप्त वेबसाइट्वरुनच करा
२ ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा
३ आलेले पार्सल डिलिव्हरी बॉय च्या समोरचा खोला व खराब किंवा तूट फूट असेल तर पार्सल व डिलिव्हरी बॉय चा फोटो काढा
४ कोणतीही तक्रार त्वरित नोंदवा
५ शॉपिंग करताना प्रत्येक वास्तूचे वर्णन बारकाईने अभ्यासा , ग्राहकाचे त्या वस्तूंबद्दलचे अभिप्राय वाचा
६ शक्यतो ब्रँडेड वस्तू खरेदी करा व त्याच्या गॅरंटी ची माहिती कस्टमर केअर ला विचारून घ्या
७ काही कंपन्या शिपिंग चार्जेस जादा लावतात ते अवश्य पहा