भारतातल्या बहुतेक सगळ्या बँकांनी UPI apps चालू केले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही समोरच्याच्या बँक अकाउंट मध्ये direct पैसे transfer करू शकता.
आता तुम्ही म्हणाल यात काय एवढा ते तर मी IMPS किंवा NEFT वापरू देखील करू शकतो पण याला एक दिवस वेळ लागतो ,
UPI apps साठी तुम्हाला payee register वगैरे करायच्या भानगडीतच पडायच नाहीये तर फक्त एक unique ID generate करून लगेच पैसे transfer होतात.
आता instant पैसे transfer करायचा अजून एक खूप छान option तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे आणि transfer केलेले पैसे कोणत्याही wallet मध्ये न जाता थेट जातील बँक अकाउंट मध्ये !
या नवीन सेवेचं नाव आहे Unified Payment Interface !
RBI चे आधीचे गव्हर्नर रघुराम राजन ह्यांनी chashless economy ला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच एप्रिल मध्ये ह्या सिस्टिमचं उद्घाटन केलं होतं.पण बँक अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना याची माहिती होऊ दिली नाही
पंतप्रधान मोदीजींनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंदिनंतर बरीचशी मंडळी cashless economy कडे वळत आहेत. बऱ्याचश्या व्यापाऱ्यांनी आता paytm ,freecharge सारख्या wallet सेवेमधून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.पण याला चार्जेस बसतात , व हि सगळी खासगी ऍप्स आहेत तर UPI हे सरकारी अँप असून कोणतेही चार्जेस नाहीत
UPI अँप वापरायचंय कसं
– आपल्या बँकेचं UPI app स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करा.
– त्या App शी आपलं बँक अकाउंट link करा.आपला ATM कार्ड नंबर लिंक करा
– App एक unique ID बनवेल ज्याला VPI म्हणतात उदाहरणार्थ sharad99 @axisbank ,
बस्स फक्त हा ID त्याच्याशी share करा ज्याच्याकडून तुम्हाला पैसे घायचे आहेत.
– तो त्याच्या UPI App मध्ये VPI ID टाकून पैसे transfer करेल आणि पैसे तुमच्या अकाउंट मध्ये लगेच जमा होतील.
भारतात खालील banks आहेत ज्या UPI payment support करतात.
•HDFC Bank (Payzapp)
•State Bank of India (SBI Pay)
•Axis Bank (Axis Pay)
•ICICI Bank (IMobile and Pockets App)
•Andhra Bank
•Bank of Maharashtra
•Canara Bank
•Catholic Syrian Bank
•DCB Bank
•Karnataka Bank
•Union Bank of India
•United Bank of India
•Vijaya Bank
•Punjab National Bank
•Oriental Bank of Commerce
•TJSB
•Federal Bank
•UCO Bank
•South Indian Bank
•Standard Chartered Bank India