Tuesday, 31 July 2018

पन्हाळा -गजापूर -विशाळगड 'परिसराच्या पहिल्या  शोधमोहिमेची पावडाई खिंडीमध्ये सांगता



पन्हाळा: 

पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ ,पन्हाळा यांच्या वतीने ऐतिहासिक पन्हाळा- गजापूर - विशाळगड परिसराचा अभ्यास करण्यासाठी दि .28 व 29 रोजी शोधमोहिमेचे आयोजन केले होते .

         ऐतिहासिक पन्हाळा -गजापूर-विशाळगड मार्गाने हजारो शिवप्रेमी चालत जातात . कासारी नदीचे उगमस्थान पावनखिंड मानली जाते .प्रस्थापित पावनखिंडीबाबत अभ्यासकांच्या मध्ये मत - मतांतर आहेत . अशा प्रकारच्या पाच - सहा खिंडी गजापूर परिसरात आहेत . असे मत पन्हाळ्याचे इतिहास अभ्यासक मु.गो.गुळवणी यांनी मांडले होते .ऐतिहासिक साधनातून गजापूरच्या घाटी मध्ये युद्ध झाले असे दिसून येते . प्राथमिक साधनांच्या आधारे या संपूर्ण परिसराचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते .

               या शोधमोहिमेमध्ये कुंवारखिंड , पावडाईखिंडीचा अभ्यास करण्यात आला . पन्हाळा ते पावडाई खिंडी दरम्यान असणाऱ्या गावांचा तसेच पाटेवाडी आदी ठिकाणच्या समाध्यांच्या नोंदी करण्यात आल्या .तीन दरवाजातून सुरुवात होऊन बांदीवडे मार्गे पावडाईखिंड मध्ये या शोधमोहिमेची सांगता झाली . पावडाई ते विशाळगड परिसराचा अभ्यास करण्यासाठी लवकरच दुसऱ्या शोधमोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी सांगितले .या शोधमोहिमेला मार्गदर्शन विनय चोपदार (इतिहास अभ्यासक , कोल्हापूर)यांनी केले .

        

     या शोधमोहिमेमध्ये पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे , संपर्कप्रमुख सुदर्शन पांढरे , एव्हरेस्टवीर अंकुश तेलंगे , मृणाल शेटे आदी अभ्यासक सहभागी झाले होते.

Sunday, 29 July 2018

खा. राजू शेट्टी आपली सहानुभूती नको कृती हवी. प्रथम राजीनामा दया मग बोला - संतप्त सकल मराठा समाजाचा सवाल



हेरले / प्रतिनिधी दि.२९ / ७/२०१७


हातकणंगले येथे गेली पाच दिवसापासून सूरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले तहसिलदार कार्यालयासमोरील सखल मराठा समाजाच्या आंदोलकांनी शंख ध्वनी करत प्रथम आपण आपल्या पदाचा राजीनामा दया व मगच बोला असे म्हणत आपल्या संतप्त भावना व्यक्त करून त्यांना परतून लावले.

      आज पाचव्या दीवशी तहसीलदार कार्यालयासमोर आरक्षणासाठी ठीया आंदोलनास भेट देण्यासाठी खासदार राजू शेटी अले असता आंदोलकांनी त्यांना दहा वर्ष या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहात.तरी आपण मराठा आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमीका घेतली नाही. असा सवाल करत  तुम्हाला या आंदोलनासंदर्भात काही बोलण्याचा अधिकार नसून आपण अपल्या पदाचा प्रथम राजीनामा द्यावा व मगच अंदोलनाविषयी भाष करा असे संतप्त प्रतिक्रीया या वेळी मराठा आंदोलकांनी खासदारांना दिल्या .तसेच चले जाव चले जाव राजू शेट्टी चले जाव या घोषना दिला या वेळी अंदोलकांचा प्रवित्रा पाहुन खासदारांनी आपला काढता पाय घेत निघून गेले.

यावेळी आंदोलकांनी आमदार खासदार यांनी वेळ काढू भूमिका घेत असून मराठा समाजाचा अंत पाहीलाआहे. आगामी निवडणुकांनमध्ये यांना त्यांची मराठा समाज जागा दाखवेल तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहील असे जिल्हा संघटक प्रा. रविंद्र पाटील यांनी सांगितले.

      फोटो 

मराठा कार्यकत्यांचा निरोप घेताना राजू शेट्टी -


Saturday, 28 July 2018

महावितरणच्या अन्यायी वीजदरवाढीला विरोध करण्याचे आ. सतेज पाटील यांचे नागरिकांना आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी.दि. 29 जुलै 2018 

महावितरण कंपनीने 2017-18 आर्थिक वर्षासाठी कृषी, घरगुती वीज व लघु औद्योगिक वीज वापर करणाऱ्या सर्व सामान्य ग्राहकांवर अन्याय करीत वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. यामुळे घरगुती वीज वापरणारे ग्राहक, शेतकरी आणि उद्योजक यांचे कंबरडे मोडणार आहे. प्रस्तावित दरवाढीमध्ये घरगुती वीज ग्राहकांसाठी 17 टक्के तर शेती पंपांसाठी 76 टक्के एवढी दरवाढ प्रस्तावित केली आहे. महावितरण आयोगाने निश्चित केलेला औद्योगिक वीज दर शेजारील राज्यांच्या तुलनेने 25 ते 35 टक्के एवढा ज्यादा आहे.

महाराष्ट्रातील घरगुती व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांसाठीचा वीज दर देशातील सर्वाधिक वीज दर पातळीचे जवळपास पोचला आहे प्रत्यक्षात वीजगळती, वीजचोरी आणि महावितरणची अकार्यक्षमता तसेच महसुली तोटा भरून काढण्यासाठी ही वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीची माहिती सोबत अपलोड केलेल्या इमेज मधील तक्त्यामध्ये उपलब्ध आहे


त्यामुळे एक दक्ष ग्राहक म्हणून या वीज दरवाढीला आपण सर्वांनी विरोध करणे गरजेचे आहे.  आपणा सर्वांची संघटित ताकद नक्कीच ही वीज दरवाढ रोखण्यासाठी आवश्यक आहे. असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील यांनी केले आहे 

यासाठी आपली प्रस्तावित वीज दर वाढ विरोधी हरकत mercindia@merc.gov.in आणि satejpatiloffice@gmail.com या E-mail वर पाठवावा.. हा E-mail पाठविण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१८ आहे.

                        

स्व. मोहम्मद रफींच्या स्मृती दिनानिमित्त मोफत स्वर मैफिलीचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील. 

दि. 28 जुलै 2018 

कोल्हापूर ही जशी कलानगरी आहे तशीच चाहत्यांचीही नगरी आहे. इथे एखाद्या कलाकाराला डोक्यावर घेतले तर आयुष्यभर त्याच्या स्मृती जागवल्या जातात. 

स्व. मोहम्मद रफी आपल्यातून जाऊन 38 वर्षे झाली तरीही त्यांच्या जादुई आवाजातून ते आजही आपल्यात असल्याचे जाणवते. त्यांच्या अडतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार  दिनांक  31 जुलै  2018 रोजी  सायंकाळी साडेपाच वाजता  

             - - - आदमी मुसाफिर है - - - 

या सुरमई मैफिलीचे आयोजन अक्कमहादेवी मंडप [ सांस्कृतिक हॉल ] या ठिकाणी करण्यात आले आहे. 

रफी  यांच्या  चाहत्यांसाठी रफींच्या आठवणींना जागविणेसाठी  त्यांनी  गायलेल्या  हजारो अनमोल गीतांमधून  निवडक  गाण्यांवर  आधारीत आदरांजली  कार्यक्रमाचे आयोजन स्वरविलास मंचाचे श्री विलास पोवार यांनी केले आहे. या कार्यक्रमाला श्री मोहन सालपे नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

खास  जेष्ठ नागरिकांना सोयीसाठी  कोल्हापूर मध्यवर्ती  ठिकाणी  व जीने चढायला  न लागणारे  ठिकाणी  विनामूल्य  अशा आदरांजली मैफिलीचा लाभ सर्वांनी घ्यायला हवा. 

Friday, 27 July 2018

राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

**


कसबा बावडा,दि.२७:

प्राथमिक  शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील  उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  २७ जूलै २०१८ हा दिवस 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा करण्यात आला. शाळेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून साजरी केली.तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांना भेटकार्ड ,गुलाबपुष्प,पेन आदी वस्तू भेट व प्रेमळ शुभेच्छा देऊन आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतले.


मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले

" विद्यार्थ्यांनी गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगून आपल्या आयुष्याचे सोने करावे ."


सदर गुरुपौर्णिमेनिम्मित शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.त्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात राजवर्धन अडनाईक,मृणाली दाभाडे,रसिका माळी, बापू गाढवे,पृथ्वीराज लाखे,शार्दूल सुतार,सिद्धार्थ मोरे,वेदांतीका पाटील,निशिका शिंदे,चिन्मय पोवार,आशिषा गायकवाड,पियुष सरगर,राहुल बंडगर,अनुष्का साठे आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून आपल्या गुरू कृतज्ञता व्यक्त केली.


सदर कार्यक्रमाला उत्तम कुंभार,सुशील जाधव सुजाता आवटी,जयश्री सपाटे,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे आदी उपस्थित होते.शाळेमध्ये गुरुपौर्णिमा अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करणेत आली.

Thursday, 26 July 2018

इफेक्ट बातमीचा - खो-खो पटू सुरेश सावंतला मिळाली आर्थिक मदत

वाळवा- अजय अहीर 


1 सप्टेंबर पासून  इंग्लड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय  खो-खो स्पर्धेसाठी सुरेश सावंतला आर्थिक मदत मिळाली आहे.

 MH9 LIVE NEWS च्या माध्यमातून खो खो पटू सुरेश सावंतला इंग्लंड स्पर्धेसाठी हवा आहे आर्थिक मदतीचा हात !  अशी बातमी दि 22 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध झाली होती. 

      याला प्रतिसाद मिळाला आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष-संग्राम देशमुख, सी.ई.ओ. अभिजित राऊत, शिक्षण अधिकारी-निशादेवी वाघमोडे, प्राचार्य डॉ-सुषमा नायकवडी सभापती महिला व बालकल्याण समिती यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली जिल्हा परिषदेमार्फत ,चाळीस हजार रुपयेची मदत मिळाली आहे. सुरेश सावंत हा  स्व. अरुण  (भैय्या)नायकवडी क्लबचा खेळाडू आहे.


यावेळी  चाळीस हजार रु. धनादेश देताना प्रा.डॉ.सुषमा नायकवडी सभापती महिला व बालकल्याण समिती,क्रीडा शिक्षक-अशोक कदम,अजित घोरपडे,मानाजी सापकर,ओंकार आचरे, उपस्थित होते.

Wednesday, 25 July 2018

पन्हाळा -गजापूर -विशाळगड शोध मोहिमेचे आयोजन


पन्हाळा : पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा  यांच्या वतीने ऐतिहासिक पन्हाळा - गजापूर - विशाळगड परिसराचा अभ्यास करण्यासाठी दि . 28 व 29 रोजी शोध मोहिमेचे आयोजन केले आहे .


    जुलै महिन्यात हजारो शिवप्रेमी पन्हाळा ते पावनखिंडीपर्यंत चालत जातात . कासारी नदीचे उगमस्थान पावनखिंड मानली जाते .प्रस्थापित पावनखिंडीबाबत अभ्यासकांच्या मध्ये मत - मतांतर आहेत . अशा प्रकारच्या पाच - सहा खिंडी गजापूर परिसरात आहेत . असे मत पन्हाळ्याचे इतिहास अभ्यासक मु.गो.गुळवणी यांनी मांडले होते .ऐतिहासिक साधनातून गजापूरच्या घाटी मध्ये युद्ध झाले असे दिसून येते .प्राथमिक साधनांच्या आधारे या संपूर्ण परिसराचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले असल्याचे पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व शोधमोहिमेचे समन्वयक शिवप्रसाद शेवाळे यांनी पत्रकाद्वारे सांगितले .

         

     या मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी पन्हाळा येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मा.असिफ मोकाशी (माजी नगराध्यक्ष)यांच्या हस्ते पुष्पहार घालून मोहिमेची सुरुवात होईल.शाहीर प्रा. भिकाजी लाड पोवाडा सादर करतील व एव्हरेस्टवीर अंकुश तेलंगे 'सह्याद्रीची भटकंती  ' या विषयावर मार्गदर्शन करतील.

        दुसऱ्या  दिवशी या मोहिमेमध्ये गजापूर परिसरातील खिंडीचा अभ्यास भौगोलिक व ऐतिहासिक साधनांच्या आधारे केला जाईल. यावेळी श्री. विनय चोपदार (इतिहास अभ्यासक ,कोल्हापूर)हे मार्गदर्शन करतील.या शोधमोहिमेची सांगता किल्ले विशाळगडावर होईल.

                              ही शोधमोहिम शिवप्रसाद शेवाळे ,सुदर्शन पांढरे यांच्या नेतृत्वाखाली होत असून धीरज कठारे , स्वप्नील पाटील, मृणाल शेटे , रणजित शिंदे , दक्षता तेलंगे , संदीप मोरे आदी पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ,पन्हाळा , वुई केअर सोशल फौंडेशन ,कोल्हापूर , ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन , कोल्हापूर चे अभ्यासक , विद्यार्थी , इतिहासप्रेमी सहभागी होणार आहेत .

Monday, 23 July 2018

विद्यार्थिनी आत्महत्याप्रकरणी मौ. वडगांव येथे मुकमोर्चा

शिरोली/ प्रतिनिधी दि. २३/७/१८

    अवधूत मुसळे


   हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील  कु. निलोफर मुबारक बारगीर या विद्यार्थीनीने लातूर येथे महाविद्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.  तिच्यावर झालेल्या  अन्यायाच्या निषेधार्थ गावामध्ये समस्त मुस्लिम समाज व सर्वपक्षीयांच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला.

     मौजे वडगाव येथील विद्यार्थीनी कु . निलोफर बारगीर हि लातूर येथील श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकत होती. तेथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी केलेला मानसिक त्रासामुळे दि १७ जुलै रोजी या विद्यार्थीनीने महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली .आत्महत्येस जबाबदार संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मृत निलोफर बारगीर हिच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा या मागणीसाठी मौजे वडगावमध्ये समस्त मुस्लीम समाज व सर्व पक्षीयांच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढून कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यकत करण्यात आला.

       यावेळी शब्बीर हजारी, डॉ .आमिर हजारी, रांझा पटेल, आमिर हमजा हजारी, अलिम हजारी, बाळासो बारगीर हिंमत बारगीर, सरपंच काशीनाथ कांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे, निवास शेंडगे, डॉ . विजय गोरड, प्रकाश कांबरे 'नितिन घोरपडे , आदी सह मुस्लीम समाजातील महिला, मुले, पुरुष, विविध पक्षांचे पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झाले होते .

             फोटो

   मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील मुस्लीम समाज व . सर्वपक्षीयांच्या वतीने गावातून मुकमोर्चा काढला .

२००५पूर्वीच्या नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीचे   (जी.पी.एफ. ) खाते सुरू करण्याची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी दि. २३/७/१८


मिलींद बारवडे


    १ नोव्हेबंर २००५पूर्वीच्या नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीचे   (जी.पी.एफ. ) खाते सुरू करावे या बाबत स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सेवाभावी संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांना निवेदन देण्यात आले.

     निवेदनाचा आशय असा की, कोल्हापूर जिल्ह्यातील १ नोव्हेबंर २००५ पूर्वीच्या नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र त्यांचे अजूनही भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या सहावा वेतन आयोगाच्या पाच हाप्त्यांची रक्कम अधांतरीच आहे. राज्यातील नागपूर ,औरंगाबाद, नाशीक या विभागात उच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशनुसार संबधित कर्मचाऱ्यांची खाती उघडली आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची खाती न उघडल्याने भविषाच्या आर्थिक तरतूदी बद्दल वंचित आहेत.

     

 या निवेदनाचा शिक्षण विभागाने हितकारक विचार करून तात्काळ संबधित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडावेत असे लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक किरण लोहार व भविष्य निर्वाह निधी  व वेतनपथक विभाग अधिक्षक शंकराव मोरे यांना स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले. 

     यावे वेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे ,जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, जिल्हा उपाध्यक्ष मुख्याध्यापक डी. ए.जाधव, के.के. पाटील, उदय पाटील, आर.डी. पाटील,संदिप पाटील, राकेश चव्हाण, संजय कांबळे, मुख्याध्यापक सी.बी. कुंभार, बी.के. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

           फोटो 

शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांना स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे निवेदन देतांना शेजारी जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. जाधव व अन्य शिक्षक नेते

Sunday, 22 July 2018

माले येथे कृषिकन्यांमार्फत ऊसलागवड प्रात्यक्षिक


हेरले / प्रतिनिधी दि. २३/७/१८

                  मौजे माले (ता. हातकणंगले) येथे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषिमहाविद्यालय ,कोल्हापूर (महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहूरी)येथील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ऊसलागवड प्रात्यक्षिक घेतले.यामध्ये ४ फूट सरीवर एक डोळा ऊस बियाणे,रासायनिक प्रक्रिया,जैविक प्रक्रिया व दाब पद्धतीने ऊस लावन यांचा समावेश होता. यावेळी कृषिकन्या अनुराधा गावडे,विशाखा मुसळे,अक्शता नाळे,पुजा नन्ना,सुस्मिता पाटील व प्रगतशील शेतकरी शामराव पाटील आणि इतर शेतकरी उपस्थित होते.

      फोटो 

मौजे माले येथे कृषिकन्या शेतकऱ्यांना एक डोळा ऊस बियणे लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवितांना.

हेरलेत कृषिकन्यांनी दिले फळांच्या मूल्यवर्धित उत्पादनाचे प्रात्यक्षिक


हेरले / प्रतिनिधी

       दि. २२/७/१८


    हेरले ( ता. हातकणंगले) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अंतर्गत कृषी विद्यापीठ कोल्हापूर, यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत टोमॅटो केचपचे प्रात्यक्षिक दिले. 

      यावेळी कृषिकन्यांनी फळांचे मानवी आरोग्यास होणारे फायदे गावकऱ्यास पटवून सांगितले. सामान्य तापमानात जास्त काळ फळे टिकवणे अशक्य असल्याने त्यापासून विविध पदार्थ तयार करता येतात हे सांगितले. हा कार्यक्रम कृषीकन्या दामिनी हांगे, प्रियांका  हाबगोंडे, अमृता गोडगे, अदिती घार्गे, संध्या गवळी, यांच्या सहभागाने आणि महिलांच्या उल्लेखनीय उपस्थितीत पार पडला.

यावेळी  पोलिस पाटील नयन पाटिल,अरुणा बेडेकर,प्रभा मोहिते,संगीता चौगुले,अंजना मुंडे उपस्थित होते.

मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मुकमोर्चा 

हेरले / प्रतिनिधी दि. २२/७/१८



      हातकणंगले तालूक्यातील हेरले येथे भादोले येथील झालेल्या बलात्कारच्या घटनेच्या आणि मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मुकमोर्चा काढण्यात आला.

       २६ जून  रोजी भादोले येथील रंगुबाई कुरणे या विधवा महिलेचा बलात्कार करूण खुन करणेत आला. त्याचप्रमाणे लातुर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथील मातंग समाजातील नवरदेव हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांच्यासह कुटूंबाला मारहाण करण्यात आली  व संपुर्ण मांतग समाज्यावर बहिष्कार टाकण्यात आला. या इतर प्रश्नाच्या निषेधार्थ गावामध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून महिला पुरुषांनी मुक मोर्चा काढला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मज्जिद लोखंडे,राहुल लोखंडे,गणेश धुळे,आंनदा लोंखडे,धीरज लोखंडे,करण लोखंडे,अनुसाया लोखंडे,कमळाबाई लोखंडे,उषा लोखंडे,बाळाबाई लोखंडे,छाया लोखंडे,शिला लोखंडे,मंगल धुळे, सुमन माने, जयश्री लोखंडे, आदीसह मातंग समाजातील महिला पुरुष,मुले उपस्थित होते.

        फोटो 

हेरले ( ता. हातकणंगले) येथील मातंग समाजाने गावातून मुक मोर्चा काढला.

खो खो पटू सुरेश सावंतला इंग्लंड स्पर्धेसाठी हवा आहे आर्थिक मदतीचा हात !

वाळवा-अजय अहीर 

दि. 22 जुलै 2018 


      राष्ट्रीय खेळाडू सुरेश शामराव सावंत यांची इंग्लड व भारत यांच्यात होणाऱ्या आतंरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.ही स्पर्धा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर ला इंग्लड येथे होणार आहे.अशी माहिती सुरेश सावंत यांनी दिली.

         सलग तीन वेळा भारताच्या संघातुन  खेळणारा सुरेश सावंत हा महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू ठरला आहे. सुरेशने सलग तीन वेळा हॅट्ट्रिक मारली आहे .सुरेश सावंत हा धरणग्रस्त कुटुंबातला आहे.


सुरेशचा भाऊ, नरेश सावंत यांनेसुद्धा  2015-16 कालखंडातील खो-खो खेळाचा शिवछत्रती पुरस्कार मिळवला व आतंरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धा खेळलेली आहे.वाळवा गावामध्ये सुरेशचे  कौतुक होत आहे.प्रा.अशोक कदम यांचे मार्गदर्शक  लाभत  आहे.

=सुरेशने खेळलेल्या स्पर्धा=

* *दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा*


 *दहा राष्ट्रीय स्पर्धा*  


 * *पंचवीस वेळा राज्यस्तरीय स्पर्धा* 


मात्र यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यासाठी खर्च एक लाख वीस हजार रुपये इतका असून, राज्य खो-खो असोसिएशने साठ हजार रुपयेची जबाबदारी घेतली आहे.

राहिलेली रक्कम कशी उभा करायची असा गहन प्रश्न सुरेशला पडलेला आहे  ?

तरी सुरेशला व्यक्ती व संस्था यांच्या कडून आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. 

Friday, 20 July 2018

कोल्हापूर कि खड्डेपूर ?


कोल्हापूर प्रतिनिधी - रुपाली कागलकर 

दि. 20 जुलै 2018 

रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हे कोडे अद्याप कोल्हापूरकरांना समजू शकलेले नसून खड्डे हे कोल्हापूरकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत. खड्डय़ांमुळे लोकांची हाडे खिळखिळी होत असताना महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना याचे काहीच सोयरसुतक नाही.

 असाच प्रकार पहायला मिळतो. जवाहर नगर शाहु सैना चौक ते  के .एम .टी  वर्कशॉपकडे जाणारा रस्ता गेली दोन वर्षापासुन खड्यांनीच भरला आहे.या  रस्त्याची दूरुस्ती रखडल्याचा फटका  नागरिकांना बसत अाहे .खड्डे  चुकवताना वाहनचालकांचे अनेक छोटे  मोठे  अपघात  दैनंदिन घड़त  अाहे .

   

  य़ा रस्त्यावरून दररोज अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या अॅम्बुलन्स ,के .एम .टी  अाणि स्कुल  बस  अशी हजारो वाहने ये जा करतात तरी प्रशासनाला काहीही फिकिर नाही. 

      दोन  वर्षापूर्वी  या  रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली  होती . पण या  दोन  वर्षात  पाऊस  आणि  वाहतुकीने या  रस्त्यावर जागोजागी  खड्डे  पडले  आहेत .पावसाळ्यात तर वाहनचालकांना या  रस्त्यावरून प्रवास नकोसा वाटतो.

 रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करुन खड्डे भरावे व लोकांना दिलासा मिळावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. 

शासनाच्या शिक्षक भरती पवित्र पोर्टल विरोधात  संस्थाचालकांचा एल्गार ! १० ऑगस्टपासून राज्यातील सर्व शाळा  बेमुदत बंद करण्याचा निर्णय.

सुधाकर निर्मळे / भाऊसाहेब सकट   /

 मिलींद बारवडे  

कोल्हापूर / प्रतिनिधी


                                                         


            शिक्षक भरती पवित्र पोर्टलची होळी


लोकप्रतिनिधी,पालक शिक्षक समाज प्रबोधन, ४ ऑगस्ट बालेवाडी पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारणी सभेत आंदोलनाची पुढील दिशा, १० ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शाळा बेमुदत  बंद आंदोलन, कायदेशीर मार्गाने पवित्र पोर्टल विरोधात लढाई  महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी  संस्थाचालकांच्या  महामेळाव्यात आंदोलनाचे पाच टप्पे जाहीर करून आंदोलनाचे रणशिंग फुकले. प्रमुख उपस्थिती जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांची होती.

       श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसमध्ये कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सभा झाली. या सभेत शासनाचे पवित्र पोर्टल संस्थाचालकांच्या हक्काच्या मुळावर कसे आहे. या बद्दल सविस्तर चर्चा झाली.

    

  संस्थाचालकांना चोर, लुटारू ,समजून सर्व संस्थाचालकांना एकाच नजरेने पाहण्याच्या  शासनाच्या दृष्टिकोनामुळे शिक्षणमंत्री सातत्याने शिक्षण क्षेत्रावर अन्यायकारक निर्णय लादत आहेत. संस्थाचालकांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासाठी त्यांनी या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरु केली आहे . संस्थांनी सुरू केलेल्या प्राथमिक ,माध्यमिक, शाळांतील शिक्षण हे  संस्थाचालक व शिक्षक यांच्यातील  चांगल्या समन्वयामुळेच महाराष्ट्र राज्यात खरी शैक्षणिक प्रगती झाली आहे. स्वातंत्र्यानंतर खासगी शिक्षण संस्थांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळांची स्थापना करून शहरातच नव्हे तर ग्रामीण व दुर्गम भागात बहुजन समाजातील मुला मुलींसाठी शिक्षणाचे जाळे निर्माण केले आहे . इ.१०  व  १२  बोर्ड परीक्षांच्या निकालावरून हे स्पष्ट दिसते.

     २ मे २०१२ नंतर नियुक्त करण्यात आलेले पूर्णवेळ, अर्धवेळ शिक्षक यांच्या मान्यतेचे प्रश्न प्रलंबित असून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्यास अशा शिक्षकांच्या मान्यतेवर गडांतर येणार असल्याने अनेक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत .संस्थेच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. असे असतानाही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण खात्याने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टल विरुद्ध नागपूर खंडपीठात केस दाखल करण्यात आली आहे .संस्थाचालकांचे अधिकार अबाधित राहावेत व पूर्वीप्रमाणेच त्यांना शिक्षक भरतीचे अधिकार असले पाहिजेत.

      संस्थाचालकांचे  शासनाकडे यापूर्वीचे अनेक प्रश्न प्रलंबित असतानाच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती राबवली जाणार आहे. या प्रणालीमध्ये अनेक जाचक अटी आहेत , तसेच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण विभागाकडून केली जाणारी भरती प्रक्रिया संस्थाचालकांच्या अधिकारावर  गदा आणणारी आहे. शिक्षण संस्थाचालकांचे शिक्षक भरतीचे अधिकार पूर्णपणे काढून घेतले जाणार आहेत . त्यामुळे याला संस्थाचालक व शैक्षणिक व्यासपिठाचा तीव्र विरोध आहे .स्वागत व प्रास्ताविक शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांनी केले.

    

 यावेळी माजी आमदार राजीव आवळे, वीरेंद्र मंडलिक ,जयकुमार कोल्हे ,आर. व्ही. देसाई, शिक्षण सभापती अमरिशसिंह घाटगे, डॉ.युवराज भोसले, जी.एन. सामंत, के.वाय.कोळेकर, एम.के. पाटील, व. ज. देशमुख, जयंत आसगावकर , मानसिंग बोंद्रे, राजेंद्र माने, जे.के. माळी, दत्तात्रय गाडवे, अशोक पाटील ( (तात्या ) दादासाहे लाड, ,रणजित पाटील, डी.एस. घुगरे, डॉ. विरेंद्र वडेर, के.के. पाटील, उदय पाटील, संदिप पाटील, समिर घोरपडे,रंगराव तोरस्कर, एन.आर. भोसले, प्रभाकर हेरवाडे, नंदकुमार इनामदार, महेश कळेकर, बाबासाहेब पाटील, मारूती पाटील, सतिश घाळी, सुरेश पाटील, मिलींद पांगीरेकर, सुंदरराव देसाई, पंडीत पोवार, शिवाजी कोरवी, बी.जी. बोराडे, राजाराम वरूटे, पी.एस. हेरवाडे, बी.जी. काटे, साताप्पा कांबळे, अे.आर. पाटील, विष्णू पाटील, प्रताप देशमुख, पी.डी. शिंदे,  बाबा पाटील, आर. वाय पाटील,आदी प्रमुख मान्यवरांसह पाच जिल्हयातील संस्थाचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सी.एम. गायकवाड यांनी केले. आभार व्ही.जी. पोवार यांनी मानले.

Wednesday, 18 July 2018

कसबा बावडा शिये रस्त्यावर पुराच्या पाण्यात कार अडकली - अग्नीशामक दलाच्या तत्परतेने सुटका

कोल्हापूर प्रतिनिधी.दि. 18 जुलै 2018

 कोल्हापूर ते शिये हा रस्ता टोल नाक्याजवळ पाणी आल्याने बंद आहे. पोलिसांनी बॅरिकेटस लावून रस्ता बंद केला आहे तरीही काही वाहनचालक अवास्तव धाडस करत पाण्यात वाहन घालतात. अशीच घटना आज सायंकाळी घडली. इटिओस कार क्र MH12 GZ 3906 या वाहन चालकाने गाडी पाण्यात दामटत रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. आणि मध्यंतरी गेल्यावर कारमध्ये पाणी शिरल्याने कार बंद पडली. 


चालकासहित प्रवाशांना धोका निर्माण झाला. नेमके याच वेळेस काही युवक पुर पाहण्यासाठी व गाडी धुण्यासाठी गेले होते त्यांनी प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाला फोन केला. 


कसबा बावडा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने धाव घेतली आणि इटिओस कार मधील चालक व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले व कार ढकलत पाण्याबाहेर काढली. 


वाहनचालकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की अवास्तव धाडस करून पुराच्या पाण्यात वाहन घालून जीवित धोक्यात घालू नये. 


कसबा बावडा भगवा चौक येथे चार चाकी वाहनांस रस्ता पाण्यामुळे बंद आहे असा फलक लावणे गरजेचे आहे. 


वाळवा परिसरात पावसाची संततधार

वाळवा- अजय अहीर 


 गेली चार दिवस वाळवा आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे , वाळवा गावांमध्ये  पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच खुश झाले आहेत.


 शेतकऱ्यांनी भुईमूग,सोयाबीन लागण,इ पिके घेऊन 80% टोकून पूर्ण झालीआहेत. मात्र या झालेल्या  पाऊसामुळे कृष्णा नदीत पाण्याची 60% अंदाज वाढ झाले असून, नदीचे पाणी दूषित झाले आहे. साथीचे आजार व रोगराई टाळण्यासाठी सरपंच डॉ. शुभांगी माळी यांनी  पाणी उकळून प्या असे  आव्हान वाळवा जनतेला केले आहे.

Tuesday, 17 July 2018

कोल्हापूर सांगली मार्गावर केएमटी व ह्युंडाई कार अपघात - कारचे मोठे नुकसान

हेरले / प्रतिनिधी दि. १७/७/१८

        

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर चोकाक- माले ( ता. हातकणंगले ) दरम्यान केएमटी व हुडांई मोटरकार यांच्यात अपघात होऊन कारचे मोठे नुकसान झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान झाला.सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

       घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, उत्तम आमुरसकर हुंडाई मोटारकार (क्र. एम.एच.०९ डी.ए. ४९५९) घेऊन  कोल्हापूरहून सांगलीकडे जात होते. ते चोकाक मालेच्या दरम्यान आले असता अचानक  स्टेअरिंग लॉक झाल्याने कार दुभाजकावरून पलीकडे जाऊन कोल्हापूरकडे जाणारी केएमटी बस ( क्र. एम.एच. ०९बी.सी. २१६७) ला धडक दिली. दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत  वाहनांची धडक चुकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोटारकार रस्त्याच्या बाजूला जाऊन शेतवडीत गेली, तर केएमटी बस चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी घेतली. या अपघातामध्ये मोटारकारचे पुढील व मागील बाजूचे नुकसान मोठया प्रमाणात झाले. तर केएमटीचे चालकाकडील बाजूचे नुकसान झाले. दोन्ही चालकानी प्रसंगावधान राखल्याने कोणी जखमी झाले नाही. अपघाताची माहिती  हातकणंगले पोलीसाना मिळताच अपघात स्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

        फोटो 

चोकाक - माले दरम्यान हुडांई मोटरकारचा अपघात होऊन शेतवडीत घुसली

Monday, 16 July 2018

गडकोट संवर्धन मोहिमे अंतर्गत किल्ले पावनगडावर वृक्षारोपण



पन्हाळा : 15 जुलै 2018

  1.       

   पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा , वुई केअर सोशल फाऊंडेशन , कोल्हापूर , ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडकोट संवर्धन मोहीम राबिवली जाते .आज या मोहिमे अंतर्गत शिवनिर्मित किल्ले पावनगडावर चिंच , जांभूळ , करंज , वड ,जारुळ आदी भारतीय वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले .भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे जवान मा .श्री .संदीप मोरे आणि रोहित जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

            यावेळी दुर्गभ्रमंतीचे ही आयोजन केले होते .पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी पावनगडाच्या अपरिचित इतिहासावर मार्गदर्शन केले . आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असताना अशा प्रकारच्या अभियानातून समाजाचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन वुई केअर सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सुदर्शन पांढरे यांनी केले .गडकोट संवर्धन मोहिमेअंतर्गत केलेल्या कामांचा आढावा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे जिल्हा उपाध्यक्ष धिरज कठारे यांनी घेतला .

             यावेळी अक्षय सावंत , रणजित शिंदे , शिवतेज तालुगडे , तानाजी साबळे , अनिकेत पाटील , किशोर पाटील , अक्षय जगदाळे , शुभम तोडकर , किशोर दराडे ,राहुल पाटील , स्वप्नील शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते .सूत्र संचालन स्वप्नील पाटील यांनी केले तर आभार राजू शेख यांनी मांडले ...

सक्तीच्या व ऐच्छिक विषयांच्या मान्यते बाबत शाळांच्यामध्ये संभ्रमवस्था - शिक्षण सचिवांना निवेदन

हेरले / प्रतिनिधी दि. १५/७/१८


    इयता दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नवीन विषयांना मान्यता घेण्यासंबंधी निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने  कोल्हापूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव टी. एल.मोळे यांची भेट घेऊन माध्यमिक शाळांच्या समस्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.

      सन २०१८-१९ पासून इयता दहावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सक्तीच्या व ऐच्छिक विषयांच्या मान्यते बाबत शाळांच्यामध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली असून याबाबत माध्यमिक शाळांच्या कडून प्रस्ताव न मागवता हे विषय शासनानेच मान्य केले असल्याने केवळ शाळांच्या विनंती नुसार या विषयांना मान्यता द्यावी.अशी मागणी व्यासपीठाच्या वतीने करण्यात आली. 

    याबाबत बोलताना सचिव टी. एल.मोळे  यांनी सदरचा विषय आम्ही राज्य मंडळाकडे लेखी स्वरूपात कळविलेला आहे.मंडळाने कोणतेही पत्र याबाबत काढलेले नाही.सोशल मिडीयात फिरणारे पत्र अनाधिकृत आहे.राज्यमंडळाच्या अध्यक्षांनी या  विषयावर संबंधीतांची बैठक बोलावली असून त्याचा निर्णय शाळाना लवकर कळवण्यात येईल.त्यानुसार शाळांनी कार्यवाही करावी.

    राज्य मंडळाच्या शाळा सकेंतांक नूतनीकरणा बाबत २००५ नंतरच्या शाळाना मंडळाचा कायमस्वरूपी संकेतांक देण्यासंबंधी हे परिपत्रक असून अपुऱ्या मनुष्यबलामुळे काही वर्षे अनेक शाळांच्या वार्षिक तपासण्या झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.या प्रस्तावा सोबत शाळेची ज्या वर्षी शेवटची वार्षिक तपासणी झालेली असेल तो अहवाल जोडावा असे सांगितले.

    कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिस्टमंडळामध्ये अध्यक्ष एस.डी.लाड, सदस्य बी.जी.बोराडे, के.के.पाटील,उदय पाटील,संदीप पाटील, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉ.ए.एम.पाटील,संचालक बी.बी.पाटील,राज्य महामंडळ सदस्य डी.एस घूघरे,सि. एम. गायकवाड,  सुधाकर निर्मळे आदी उपस्थित होते.

         फोटो 

कोल्हापूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव टी. एल. मोळे यांना निवेदन देताना अध्यक्ष एस.डी. लाड व इतर मान्यवर

हेरले येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून एक ठार तर तीन जखमी

हेरले / प्रतिनिधी दि.१६/७/१८

   

 हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील रिक्षाचालक रविंद्र बापू काटकर यांच्या घराच्या भिंती कोसळून पत्नी अनिता काटकर मयत झाल्या. तर त्यांच्यासह दोन मुले असे तीनजण गंभीर जखमी झाले. सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी पहाटे चार वाजता घडली.

        रविंद्र बापू काटकर ( वय ४६) हे रिक्षाचालक हनुमाननगर सुतार गल्ली माळभाग हेरलेमध्ये दोन खोल्यांचे घरामध्ये पत्नी दोन मुले यांच्यासह राहतात. रविवारी रात्री पत्नी अनिता रविंद्र काटकर ( वय ३७), मुलगा अनिकेत रविंद्र काटकर ( वय२० ), मुलगी शिवानी रविंद्र काटकर ( वय १७) हे चौघेजण झोपी गेले होते. पहाटे चारच्या दरम्यान अचानक दोन्ही खोल्यांच्या भिंती त्यांच्या अंगावर कोसळल्या यामध्ये दगड विटा यांचा मार मोठया प्रमाणात या चौघांनाही बसला.पत्नीच्या डोक्यास व पोटास मार बसला त्यामध्ये त्या अंत्यत गंभीर जखमी झाल्या. रविंद्र काटकर व त्यांच्या दोन्ही मुलांना पायांला हाताला मोठी दुखापत होऊन गंभीर जखमी झाले.

    

   भिंती कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील अमिर पेंढारी, गुंडू परमाज, रफिक पेंढारी, पोपट सुतार यांनी प्रसंगावधान राखत या ठिकाणी थाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. चौघांच्या अंगावरील दगड, माती , वीटांचा थर बाजूला करीत ढिगाऱ्यातून चौघांना बाहेर काढले.तात्काळ खाजगी वाहनातून उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला पाठविण्यात आले. चौघांवर उपचार करीत असतांना अनिता रविंद्र काटकर यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असतांना मयत घोषित करण्यात आले. तर तिघांना पायाला हाताला गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.

       सलग चार दिवस पावसाची रिपरिप सुरू असल्याने परिसरात घराच्या  भिंतीची पडझड होत आहेत. रविंद्र काटकर रिक्षाचालकाचे काम करतात. त्यांचा मुलगा अनिकेत दुचाकी मिस्त्री काम शिकत आहे तर मुलगी शिवानी उच्च माध्यमिकचे शिक्षण घेत आहे. या गरीब कटुंबाचा चरित्राचा गाडा रविंद्र चालवत आहेत. मात्र निसर्गाच्या कोपाने हे गरीब कुटूंब उघडयावर आले आहे.पत्नी अनिताही खाजगी कंपनीत नोकरी करीत  संसारास हातभार लावत होती. मात्र त्यांच्यावर काळाने झडप घालून दोन्ही मुलांचे मातृछत्र हिरावून घेऊन त्यांना निराधार केले.

             चौकट

    रविंद्र काटकर यांच्या गरीब कुटुंबास शासनाने तात्काळ घराची बांधणी करून निवाऱ्याची सोय करीत मोठी आर्थिक मदत देत त्यांच्या संसारास हातभार लावावा. पत्नी मृत व स्वतःसह तिघे जखमी असल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक संकट निर्माण झाले आहे तरी त्यांच्यावर मोफत उपचार करून तंदरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

        फोटो

हेरले येथील रविंद्र काटकर यांच्या घराची दोन्ही भिंती पडलेल्या व साहित्य अस्ताव्यस्त झालेले.

Sunday, 15 July 2018

भरपावसात पोहाळे लेणी परिसरात देशी वृक्षांचे रोपण - पर्यावरण प्रेमींनी जपला वसा


कोल्हापूर प्रतिनिधी - दि. 15 जुलै 2018


धो- धो पावसाच्या सरी... बोचरा वारा...

त्यात रविवार!

अशावेळी कोणीही घरात राहून आराम करत मस्त चहाचा गरम-गरम घोट घेणेच पसंद करेल.

परंतु, कोल्हापूर येथील पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या 'Only Environment' या ग्रुप सदस्यांनी मात्र रविवार दि.१६.०७.२०१८ रोजी सकाळी-सकाळी थेट गाठला 'पोहाळे' गावचा डोंगर.


एका हातात स्वतः बियापासून तयार केलेली देशी वृक्षांची रोपे तर दुसऱ्या हातात खड्डे खणण्यासाठी हत्यारे.

वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा व पायाखालून वाहणारे छोटे -छोटे धबधबे अशातच डोंगर उतारावरील  निसरड्या वाटा, चोहीकडे हिरवाई ने नटलेल्या  अशा या ऐतिहासिक लेणी परिसरात वृक्षांची संख्या तशी खूपच कमी आहे. नेमकं हेच ओळखून पर्यावरणप्रेमींच्या या ग्रुप ने एकत्र येत या परिसरात वृक्षारोपण केले. यामध्ये पळस, जांभूळ, चिंच या देशी वृक्षांचा समावेश आहे.


या ग्रुप चे संघटक व पर्यावरणशास्त्र विषयाचे शिक्षक प्रा.अनिल धस व प्रा. सुनिल शिंदे यांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले.

'यापूर्वी गेल्या महिन्यात याच परिसरात एक हजार देशी वृक्षांच्या बियांचे रोपण आम्ही केले आहे या सोबत या रोपांचे  संवर्धन यापुढे वर्षभर आम्ही करणार आहोत' असे प्रा. अनिल धस यांनी यावेळी 'MH09 Live News' शी बोलताना सांगितले.


या यावेळी प्रज्योत साळोखे, कु.भाग्येश शिंदे, पोहाळे गावचे क्रियाशील सरपंच श्री. दादासाहेब तावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. पोवार , सदस्य श्री. बोरचाटे, कु. रोहित पाटील,पंचगंगा बँकेचे अध्यक्ष श्री. टिपूगडे साहेब व पंचगंगा बँकेचे सर्व स्टाफ यांनीही यावेळी  उस्फूर्तपणे सहभागी होऊन वृक्षरोपण केले.

दिव्यांग मुलांना ठळक लिपी पुस्तक संच वाटप


माजगांव प्रतिनिधी:—

पंचायत समिती पन्हाळा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत समावेशीत शिक्षण योजनेतून दृष्टीदोष असलेल्या मुलांना ठळक लिपी पुस्तकाच्या संचाचे वाटप कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर  या शाळेमध्ये वितरीत करण्यात आला.

      पन्हाळा पंचायत समितीकडे प्राप्त झालेले २८ ठळक लिपी संच तालुक्यातील दिव्यांग मुलांपैकी दृष्टीदोष असलेल्या मुलांपर्यंत पोहचवणार असलेचे सांगीतले.शासनाची प्रत्येक योजना गरजू विद्यार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी कटीबद्ध असलेचे मत अंजली सुभाष लोकरे मॅडम(विषयतज्ञ् समावेशित शिक्षण,पंचायत समिती पन्हाळा)यांनी व्यक्त केले.

   यावेळी मांडवकर सर,पोवार सर,नामदेव पोवार सर, जाधव सर, लोखंडे मॅडम, बाजीराव कदम सर, कोरे सर उपस्थित होते.

Saturday, 14 July 2018

माले येथे कृषी दिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन



हेरले / प्रतिनिधी दि. १४/७/१८

    मौजे माले (ता हातकणंगले) कृषी दिनानिमित्त कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्राध्यापकांनी शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात विविध विषयावर मार्गदर्शन केले.

     ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषीकन्या मार्फत हुमणी किड नियंत्रणावर चर्चासत्र आयोजित करत आले.यावेळी  अस्लम वालंडकर यांनी हुमणी किड नियंत्रण या विषयावर शेतकऱ्याशी चर्चा केली यामध्ये हुमणी किडीचा जीवनक्रम, संवेदनशील कीड व्यवस्था , प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके व त्यांचा योग्य वापर इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता.याप्रसंगी  राहुल पाटील (कृषी सहाय्यक हातकणंगले) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सरपंच उमेश पाटील, उपसरपंच  सुनील कांबळे  , पोलीस पाटील संदीप साजनकर , माजी उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील सेवानिवृत्त पदाधिकारी आदींनी मनोगते व्यक्त केली.

    याप्रसंगी प्रा.उत्तम कदम यांनी ऊस लागवड व्यवस्थापन खरीप पिके याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. यामध्ये ऊस पीक हंगाम लागवड ऊस पिकातील आंतरपिके व पाणी व्यवस्थापन या मुद्द्यांचा समावेश होता .यावेळी कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील डॉ. जी.जी. खोत, डॉ. विजय तरडे, डॉ.के .व्ही. गुरव, डॉ. विलास करडे ,श्री बजरंग चव्हाण आदी उपस्थित होते.पं.स. सदस्या मेहरनिगा जमादार या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याबरोबरच  गावचे  प्रमुख ग्रामस्थ मंडळी व शेतकरी बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे कृषीकन्या सुस्मिता पाटील ,पूजा नन्ना, अक्षता नाळे,विशाखा मूसळे व अनुराधा गावडे आदींनी संयोजन केले.

         फोटो 

माले येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना अस्लम वालंडकर शेजारी मान्यवर

हेरले व अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचा थ

हेरले / प्रतिनिधी दि. १४ / ७/१८


हेरले व अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचा चावा घेऊन जखमी केले.

       हेरलेमध्ये शनिवारी सकाळी भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने  अशोक तुकाराम भोसले ( वय ५०),पारीसा शंकर चौगुले ( वय ७४), सुरेश कृष्णा वडर ( वय ४३ )छबूताई यमण्णाप्पा आठवले ( वय ८०), श्रीपाल् दादू खोत ( वय ५५) आण्णाप्पा जिनगोंडा पाटील ( वय ७o) आदी सहा जणांना गावात विविध ठिकाणी चावा घेऊन जखमी केले.  प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. चेतन शिखरे यांनी जखमिंना रेबिजची लस देऊन उपचार  केले. यानंतर तीन रेबिजचे डोस काही दिवसाच्या अंतराने जखमिंना घ्यावे लागणार आहेत. छबूताई आठवले, श्रीपाल खोत, आण्णाप्पा पाटील यांच्या पायावर कुत्र्याच्या दाताच्या चाव्याच्या खोलवर जखमा झालेने पुढील उपचार  (एआरएस) डोससाठी त्यांना सीपीआर दवाखान्यामध्ये पाठविले आहे.

     अतिग्रे गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने अरविंद कृष्णा कांबळे ( वय५० ) महेश अरविंद कांबळे ( वय २१) यांना चावा घेऊन जखमी केले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबिजची लस देऊन उपचार करण्यात आला. हेरले गावांमध्ये भटक्या कुत्र्याचे प्रमाण वाढले असून त्यांचे निर्बिजीकरण करून तसेच या कुत्र्यांना पकडून अन्यत्र सोडणे गरजेचे बनले आहे.या घटनेने गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.

Friday, 13 July 2018

शासनाच्या पवित्र पोर्टल विरोधात तीव्र आंदोलन - एस डी लाड

कोल्हापूर/ प्रतिनिधी 

      मिलींद बारवडे

    कोल्हापूर जिल्हयातील शिक्षण संस्थाचालक शासनाच्या पवित्र पोर्टल विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांनी दिला. संस्थाचालकांची पोर्टल विरोधात सभा शुक्रवार दि.२० जुलै रोजी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस कोल्हापूर येथे होणार असून जिल्हयातील ३५० संस्थाचालकांनी या सभेस दुपारी २ वाजता उपस्थित राहावे असेही आवाहन संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व सचिव प्रा. जयंत आसगावकर यांनी केले आहे.

         प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस मध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची सभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी एस.डी. लाड होते. सभेमध्ये अन्यायीकारी पवित्र पोर्टल या शिक्षक भरती आदेशाची जाहीरपणे होळी केली जाणार आहे. पवित्र पोर्टल नुसार भरती केल्यास टीईटी पात्र शिक्षकांची कमतरता असेल, कोणत्याही प्रकारची मुलाखत न घेता संस्थावर शिक्षक लादले जाणार आहेत या आदेशापूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा तसेच समायोजनेचा प्रश्न अदयापी शासनाने सोडविला नसल्याने या पवित्र पोर्टलमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

          शिक्षण संस्थाचालकांचे अधिकार या आदेशामुळे काढून घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी नेमलेल्या शिक्षकांचे प्रश्न प्रलंबीत असतांना शासन असा विचित्र आदेश कसा काय काढू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या आदेशाला तीव्र विरोध करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली पवित्र पोर्टलची होळी २oजुलैच्या सभेत केली जाणार आहे. संपूर्ण राज्यात या पवित्र पोर्टल विरूद्ध आंदोलन शिक्षण संस्थाचालक महामंडळ करणार आहे.

    या सभेस वसंतराव देशमुख, प्रा. जयंत आसगावकर, सी.एम. गायकवाड, बी.जी. बोराडे, व्ही.जी. पोवर, डॉ.ए.एम. पाटील, डी.एस. घुुगरे, बी.जी. काटे, के.बी. पोवार, सुधाकर निर्मळे, अशोक पाटील, सुरेश पाटील, बी.बी. पाटील, उदय पाटील, के.के. पाटील, प्रभाकर आरडे, पी.के. पाटील, भरत रसाळे, के.एच. भोकरे, पी.एस.हेरवाडे, सुंदरराव देसाई, डॉ.विरेंद्र वडेर, संदीप पाटील, मिलींद बारवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार उदय पाटील यांनी मानले.

    फोटो कॅप्शन

शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड बोलतांना

मौजे माले (ता हातकणंगले) येथे कृषी दिनानिमित्त कृषिकन्या मार्फत जनजागृती

हेरले / प्रतिनिधी दि. १३/७/ १८


मौजे माले (ता हातकणंगले) येथे कृषी दिनानिमित्त कृषिकन्या मार्फत जिल्हा परिषद केंद्र शाळा  गावामधून प्रभात फेरी काढून वृक्ष लागवडी बद्दल जनजागृती आली.

    या प्रभात फेरी मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी घोषवाक्य द्वारे जनजागृती केली यामध्ये विविध प्रकाशनपोस्टर्स, ढोल ताशे ,यांचा उपयोग करून वृक्षाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कृषी महाविद्यालय कोल्हापूर मधील कृषी कन्या मार्फत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  कृषिकन्या अनुराधा गावडे ,विशाखा मुसळे ,अक्षता नाळे,पूजा नन्ना ,सुस्मिता पाटील, तसेच विद्यार्थी व शिक्षक वर्ग ग्रामस्थांचा समावेश होता. या प्रभात फेरी मधून झाडे लावा झाडे जगवा ,पर्यावरण जगवा भविष्य घडवा ,यासारखे संदेश देण्यात आले. तसेच जय जवान जय किसान  या सारख्या घोषवाक्य तून जनजागृती करण्यात आली.

         फोटो 

माले येथे कृषीकन्या व प्राथमिक शाळेतील शिक्षक,विदयार्थी वृक्ष लागवडीचे जनजागृती करतांना.

Thursday, 12 July 2018

शाहू हायस्कूलमध्ये फ्लाइट लेप्टनंट अक्षय तळप यांचा सत्कार

कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. १२/७/१८

    मिलींद बारवडे


    विदयार्थी दशेतच करिअर निश्चीत करुन  यशासाठी अभ्यासाचे कठोर परिश्रम घ्या. निश्चीतच यश प्राप्त होते. मला शाहू हायस्कूलने व माझ्या आईने घडविले. सर्वांना कळस दिसत असतो मात्र पाया घट्ट होण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते अपरिचीत असतात. त्यांचेच कार्य अतुलनीय असते,त्यांचा मीे सदैव कृतज्ञ आहे !असे प्रतिपादन फ्लाइट लेफ्टनंट अक्षय विलास तळप यांनी केले.

     श्री शाहू हायस्कूल कागलमध्ये ते फ्लाइट लेप्टनंट झाल्या बद्दल सत्कार समारंभ आयोजीत केला होता. त्या प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.बी. रुग्गे होते.

      आपला परिचय करून देतांना म्हणाले की, मी शाहू हायगस्कूलचा विद्यार्थी आहे .  दहावी पर्यंतचे शिक्षण शाहू हायस्कूलमधून ९५.०९ मार्क्स मिळवून पूर्ण झाले . बारावी सायन्सचे शिक्षण विवेकानंद कॉलेज कोल्हापूर मधून घेतले मी १२  वी सायन्स  ८९.५० टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालो. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये प्रवेश घेतला. तिथेही  सातत्याने चार वर्षे प्रथम १० विद्यार्थ्यांमध्ये राहिले . इंजिनीअरिंगचे शिक्षण मी ८३ टक्के  मार्क फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवून पूर्ण केले .आरआयटी इस्लामपूर कॉलेजच्या कॉलेज कॅम्पस प्लेसमेंटमधून त्यांची भारत फोर्ज इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये सिलेक्शन झाले . एक महिना कंपनीमध्ये काम केले त्यावेळी  स्पर्धा परीक्षेमधून इंडियन एअर कोर्समध्ये क्लास १  गॅझेटेड ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले. २  जुलै २०१६  ते फ्लाइंग ऑफिसर म्हणून जॉईन झाले .

       सहा महिने एअरफोर्स अॅकेडमी हैदराबादमधून बेसीक ट्रेनिंग पूर्ण केले. नंतर एक वर्ष एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बेंगळुरूमधून टेक्निकल ट्रेनिंग संपादन केले. त्यानंतर त्यांची इंडियन एअरफोर्सच्या जागावर डीप पेनिट्रेशन स्ट्राइक बॉम्बर एअरक्रॉफ्टचा स्क्वॉर्डन मध्ये निवड झाली . सहा महिने फ्लाइंग ऑफिसर म्हणून एअरफोर्स स्टेशन गोरखपूर उत्तर प्रदेश  येथे कामकाज पाहिले आणि नुकतीच  फ्लाइंग ऑफिसर वरुन फ्लाइट लेफ्टनंट पदावर प्रमोशन झाले आहे. आणि ते सध्या टेक्निकल ऑफिसर म्हणून एअरफोर्स स्टेशन जामनगर गुजरातमध्ये कार्यरत आहेत.

      स्वागत महेश शेडबाळे यांनी केले. प्रास्ताविक सुभाष भोसले यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका एस.ए. कुलकर्णी, जगन्नाथ भोसले, श्रीमती तळप, संजय पोतदार, एस.वाय. बेलेकर, शंकर खाडे,काका भोकरे, महादेव घोरपडे,कादर जमादार, रमजान कराडे,आदीसह शिक्षकवृंद, विदयार्थी उपस्थित होते. आभार उपमुख्याध्यापक आर.जी. देशमाने यांनी मानले.

        फोटो 

श्री शाहू हायस्कूलमध्ये फ्लाइट लेप्टनंट अक्षय तळप यांचा सत्कार करतांना प्राचार्य एम.बी. रुग्गे व इतर मान्यवर

Wednesday, 11 July 2018

चोकाक येथे शिवशाही आणि एसटी बसचा अपघात

कोल्हापूर प्रतिनिधी...

दि. 12 जुलै 2018


आज सकाळी आठ वाजता शिवशाही बसला कोल्हापूर सांगली मार्गावरील चोकाक ता. हातकणंगले येथे अपघात झाला. शिवशाही बस जालनाहून कोल्हापूरला येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून बस डिव्हायडर तोडून पलिकडे गेली. ती समोरुन येणार्या एसटी बसला धडकली.  समोरुन येणार्या कोल्हापूर माजलगाव या एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखून एसटी बस डावीकडे वळवली व मोठा अपघात टळला. तरीही एसटी बसचे किरकोळ नुकसान झाले व कंडक्टरला दुखापत झाली. पण शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले.


शिवशाही बसला अपघात होण्याची साखळी सुरूच आहे. अननुभवी चालक, अनियंत्रित वेग यामुळेच नवीन गाडय़ा असुनही वारंवार अपघात होतात.

सदर अपघातात कोणीही गंभीर जखमी नसले तरी किरकोळ दुखापती झाल्या आहेत पण यानिमित्ताने प्रवासी मात्र शिवशाही बसला घाबरत आहेत. 

Sunday, 8 July 2018

गणितातील योगदानाबद्दल दिपक शेटे सरांचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडून कौतुक

प्रतिनिधी सतिश लोहार    ........... 


नागाव ( ता. हातकणंगले ) गणितासारख्या अवघड विषयात विविध युक्त्या वापरून विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने गणिताची आवड निर्माण करणारे अवलिया म्हणूनच *दिपक शेटे* यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.  " गणित लॅब " स्वतः तयार करून अवघड अशा गणिताच्या संकल्पना सुलभ करून दाखवल्या आहेत.याचा लाभ सामान्य विद्यार्थ्यांच्या पासून कुशाग्र विध्यार्थ्यांना होत आहे.

गणितीय वस्तूंचा मोठा संग्रह त्यांनी आपल्या घरी केला आहे. यामध्ये गणिताशी निगडित विविध मोजमापे, दिडशे वर्षाचे पितळी कॅलेंडर, विविध नाणी, दिशादर्शके, द्रव - धातू यांची अती सुक्ष्म मोजमापे, सॅडो घड्याळ, घटिका, अभियांत्रिकी महाविद्यालय फार पुर्वी वापरली जाणारी विविध उपकरणे याचा मोठा साठा त्यांनी गोळा केला आहे. यासाठी अनेक ठिकाणी भ्रमंती करून त्यांनी आपला अमूल्य वेळ आणि पैसा खर्च केला आहे. व्यक्तीला विविध छंद असतात. पण गणिताचा छंद जोपासणारे दुर्मिळ आहेत. 

नागाव  ( ता. हातकणंगले ) या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. संख्याशास्त्र या विषयात मास्टर ऑफ सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बी. एड. करुन आदर्श विध्यानिकेतन पेठ वडगाव येथे गणित आणि विज्ञानचे शिक्षक म्हणून गेली आठरा वर्षे कार्यरत आहेत. हे करत असताना त्यांचे शिक्षणही सुरू आहे. डिप्लोमा इन काॅम्प्यूटर प्रोग्रॅमिंग आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट करुन आता ते एम.ए. एज्युकेशन करत आहेत. 

गणिताशिवाय एकही दिवस जगणे हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी अशक्य आहे. असे असताना विद्यार्थ्यांना सर्वात अवघड असणारा विषय म्हणजे गणित. असे का ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिपक शेटे यांनी केला. विशेष म्हणजे याचे उत्तरही त्यांना गणितातच मिळाले. विद्यार्थ्यांना विविध गणितीय उपक्रमातून गणिताची गोडी लावली. यासाठी त्यांनी ' किल्ली भुमितीची ' आणि ' जीवनातील गणित ' या स्वलीखित नाटकांवर विद्यार्थ्यांना सादरीकरण करायला लावले. अंकवेल, गणितीय नियम व सूत्रे आणि गणित कोष ही त्यांची गणिता विषयी आवड निर्माण करणारी पुस्तके विद्यार्थ्यां प्रमाणे पालकांनाही आकर्षित केल्याशिवाय रहात नाहीत. त्यामुळेच दिपक शेटे हे गणित जगतात आणि जगवतात असे म्हटले जाते. गणिताची कोल्हापूर परीसरातील सर्वात मोठी लॅब करण्याचा त्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी ते विशेष परिश्रम घेत आहेत.*इ.१० वी गणित चे पाठयपुस्तक क्यू आर कोड द्वारे दोन पानात बसवले आहे*   त्यामूळे गणित विषय तंत्रज्ञानाद्वारे समजण्यास सोपा झाला आहे . *श्री दिपक शेटे यांनी महाराष्ट्रात प्रथमच निर्माण केलेले डिजीटल स्मार्ट बुक बद्दल कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक श्री किरण लोहार  यांनी कौतुक व त्यांचा सत्कार केला, सतत गणितातील नव नवीन कल्पना , लेखन याबद्दल  शिक्षण मंत्री मा . विनोद तावडे  यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांच्या कामाची दखल घेतली ..,,