Tuesday, 29 September 2020

गोकुळ कर्मचाऱ्यांना पाच लाखांचा मेडिक्लेम आणि वीस लाखांचा अपघाती विमा

हेरले / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळच्या ) पशुसंवर्धन व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांना ५ लाखाची मेडिक्लेम पॉलिसी देण्यात आली आहे . या पाॅलिसीचा  संपूर्ण रक्कमेचा धनादेश संघाचे चेअरमन रविंद्र आपटे यांच्या हस्ते कंपनीस देणेत आला. 
      गोकुळच्या पशुसंवर्धन व संकलन विभागातील  कर्मचाऱ्यांनी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत ५ लाखाची ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसी सोबतच २० लाख रुपये विमा संरक्षण असलेली अपघाती विमा पॉलिसीदेखील घेणेत आली आहे.  या पॉलिसीचा विमा हप्ता गोकुळ दूध संघामार्फत अॅडव्हान्स रूपाने गोकुळचे चेअरमन  रविंद्र आपटे  यांचे हस्ते एस.बी.आय. बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री चोपडे,  एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक  सागर हुंडेकरी यांच्याकडे सुपूर्द करणेत आला. त्याची कपात प्रत्येक कामगारांच्या पगारातून महिना १०३५ रुपये केला जाणार आहे.
     यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान जेष्ठ संचालक  रणजितसिंह पाटील,  माजी चेअरमन व जेष्ठ संचालक  अरुण डोंगळे ,  जिल्हा दुग्ध विकास अधिकारी अरुण  चौगले , शशिकांत पाटील (चुयेकर), कार्यकारी संचालक डी.व्ही.  घाणेकर ,  जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे, आस्थापना प्रमुख अशोक पुणेकर, डॉ. चोपडे, प्रशासन विभागाचे सहा. व्यवस्थापक रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम मगदूम यांनी केले तर डॉ. वाघ यांनी  आभार मानले.


          फोटो 
गोकूळ दूध संघ कर्मचारी पॉलिसीचा चेक प्रदान करतांना चेअरमन रविंद्र आपटे जेष्ठ संचालक अरूण डोंगळे रणजितसिंह पाटील कार्यकारी संचालक डी व्ही घाणेकर आदी मान्यवर

पुरग्रस्त भागातील गरीब व विधवा महिलांना रोजगाराचे साधन शेळी आणि म्हैशींचे वितरण

प्रतिनिधी सतिश लोहार

CEF कंपनीच्या अर्थ साहाय्याने सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटी यांच्या संयुक्त विद्यमाने CYDA संस्था  गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर जिल्हा मध्ये विविध उपक्रम  संस्थेचे मॅथुय मॅथम आणि सिंजीनी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे, त्यात पुरग्रस्त भागातील गरीब व विधवा महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे  या उपक्रम चा भाग म्हणून कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यातील बस्तवाड व हेरवाड या दोन गावामध्ये कार्यक्रम घेण्यात आला. 
,येथे संस्थेच्या माध्यमातुन उपजीविका च साधन म्हणून 15  लोकांना एकूण 13शेळी आणि 2म्हशींचे चे वितरण करण्यात आले तसेच 1 जणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या वितरण वेळी   गावचे सरपंच , तसेच ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन च्या प्रतिभा मॅडम , तसेच अश्विनी चौगुले ह्या उपस्थित होत्या  .हा वितरण सोहळा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी रसिका कदम यांनी परिश्रम घेतले.

संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी डॉ . विजयकुमार गोरड यांची निवड


हेरले ( वार्ताहर )

 हातकणंगले तालूका संजय गांधी निराधार योजना अनुदान समिती सदस्यपदी हातकणंगले तालूका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मौजे वडगावचे डॉ . विजयकुमार गोरड यांची निवड करण्यात आली .
       या निवडीसाठी त्यांना पालकमंत्री नाम. सतेज पाटील , आमदार राजूबाबा आवळे , माजी खासदार जयवंतरावजी आवळे , कॉग्रेसचे तालूका अध्यक्ष भगवानराव जाधव , या सर्वांचे सहकार्य लाभले .

नेशन बिल्डर अवॉर्डने दिपक शेटे सन्मानित

प्रतिनिधी सतिश लोहार


स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे या शाळेतील सहाय्यक शिक्षक दिपक मधुकर शेटे यांना रोटरी क्लब कोल्हापूर यांच्यावतीने नेशन बिल्डर अवॉर्ड 2020 डिस्ट्रिक्ट गवर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला .
दिपक शेटे हे गेली वीस वर्ष गणित अध्यापनाचे कार्य करत आहेत त्यांच्या शाळेचा दहावीचा गणित विषयाचा निकाल अत्यंत उत्कृष्टपणे दर वर्षी लागतो . त्यांनी गणिताची सात पुस्तके व दोन नाटके लिहिले आहेत . दिपक शेटे हे गणितात विविध उपक्रम राबवत असतात त्यांची उपक्रमशील शिक्षक म्हणून सुद्धा वेगळी ओळख आहे . सुमारे सतरा लाख रुपयाची स्वतःची गणित प्रयोग शाळा आहे त्याचा लाभ राज्यातील गणितप्रेमी घेत आहेत . त्यांनी राज्यस्तरावर तज्ञमार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे . शिक्षणातील तार्‍यांचा शोध घेण्याकरिता त्यांनी स्टार अकॅडमी नावाची संस्था स्थापन करून दरवर्षी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतात .गेली सात वर्षे हा सोहळा निरंतर सुरू आहे .कोरोना महामारी काळात सुद्धा त्यांनी स्टार कोरोना योद्धा पुरस्कार देऊन कोरोना योद्धांना सन्मानित करून प्रोत्साहित केलेले आहे . दहावीची गणित पुस्तक एका पानात  तयार करणारे तंत्रस्नेही दीपक शेटे यांनी कोरोना काळात त्यांनी मॅचस्टार व स्टार अकॅडमी न्यूज चैनल सुरु केले .याचा उपयोग शालेय विद्यार्थी करत आहेत.कोरोना काळातही त्यांनी कोरोना योद्धाची भूमिका आपल्या उपक्रमातून दाखवून दिली आहे .त्यांच्या या कार्याची दखल विविध दैनिके ,राष्ट्रीय न्यूज चैनल , रेडिओ इत्यादी माध्यमांनी घेतला आहे . गणिताचे सर्वात शास्त्र उपक्रम राबवणारे शिक्षक म्हणून महाराष्ट्र बुक रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे .त्यांना आजअखेर एक राष्ट्रीय व 17 इतर पुरस्कारांनी सन्मानित केले आहे .त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .त्यांना प्राचार्य डी एस घुगरे उपप्राचार्य एम ए परीट यांचे प्रोत्साहन व सहकारी शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले .यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष शिरगावे मॅडम ,डॉक्टर कुलकर्णी ,सौ मोहिते मॅडम ,सौ .उत्कर्ष।पाटील , सुधाकर निर्मळे आदी मान्यवर उपस्थित होते . त्यांचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे .

Monday, 28 September 2020

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात शैक्षणिक व्यासपीठाचे तीव्र निदर्शने १ ऑक्टोबंर रोजी


कोल्हापूर / प्रतिनिधी



    माध्यमिक शाळेतील इयत्ता पाचवीचे वर्ग जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील मुख्याध्यापकांनी तथा प्राचार्यांनी आपल्या शाळेची माहिती भरावी असा आदेश माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी दि. २५ सप्टेबंर रोजी काढला. ही माहिती न भरणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्य व लिपीक यांचे सप्टेबंरचे वेतन स्थगित करण्यात येईल असे या आदेशात म्हंटले आहे.
         या आदेशा विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या आदेशातील शिक्षणाधिकाऱ्यांचा धमकी वजा आदेशाचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी एस डी लाड होते.
       या बैठकीमध्ये १ ऑक्टोबंर रोजी दुपारी १ वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दि. १६ सप्टेबंरचा इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागाने रद्द करावा यासाठी दि. २ ऑक्टोबंर रोजी व्यासपीठाच्या वतीने पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे.
   या वेळी चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शिक्षण संस्थाचालक  संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख , सचिव प्रा. जयंत आसगावकर, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, पी. एस. हेरवाडे, शि. ना. माळकर, प्रा.एन. आर. भोसले, प्रा.सी.एम. गायकवाड ,के. के .पाटील, उदय पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.एम. पाटील, ए. ए. अन्सारी, मिलींद बारवडे, काकासाहेब भोकरे, शिवाजीराव कोरवी,रवी मोरे, बी.एस. खामकर,राजेश वरक, जितेंद्र म्हैशाळे, जगदिश शिर्के, गजानन काटकर, आर. डी. पाटील, पंडीत पवार, एम. व्ही. जाधव, अशोक हुबाळे ,एस. एस. चव्हाण, चंद्रकांत लाड,माजीद पटेल आदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
        फोटो 
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड शेजारी इतर मान्यवर.

शिक्षकांनी समाजाभिमुख कार्य करावे रोटरीचे संचालक संग्राम पाटील यांचे आवाहन



'रोटरी क्लब ऑफ गार्गीज' च्यावतीने  'नेशन बिल्डर' पुरस्कार १७ शिक्षकांना प्रदान
पेठ वडगाव / प्रतिनिधी
    मिलींद वारवडे

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी मुलांच्यामध्ये सकारात्मक बदल  घडविण्याबरोबरच समाजाभिमुख विधायक कार्य करावे असे  आवाहन  रोटरीचे प्रांतपाल  संग्राम पाटील यांनी केले.
        रोटरी क्लब ऑफ गार्गीज  कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित 'नेशन बिल्डर  पुरस्कार  २०२०-२१ ' वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत हा कार्यक्रम पार पडला. 
         कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक आर.आर. पाटील, मुख्याध्यापक संजय चौगुले, उपप्राचार्य प्रा. शामराव पाटील, अर्जुन पाटील, राजेंद्र कोरे, लक्ष्मी पाटील, नुतन सकट, दीपक शेटे, अँथनी डिसोजा, सतिश भोसले, प्रशांत भोरे ,फुलसिंग जाधव, मुख्याध्यापक बाबासाहेब कांबळे, मुख्याध्यापक दशरथ चौगुले, अमृता पाटील आदींना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. 
    यावेळी बोलताना रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल सुहास कुलकर्णी म्हणाले, शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल. रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या अध्यक्षा गौरी शिरगावकर यांनी प्रास्ताविकात क्लबच्या कार्याचा आढावा घेत २३२ देशात १२ लाख रोटेरीयन कार्यरत असून समाजातील मूलभूत  प्रश्नांच्यावरती  क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. उत्कर्षा पाटील यांनी समाजातील गरजू लोकांपर्यंत शिक्षकांनी पोहचण्याचे आवाहन यावेळी केले.वडगाव विद्यालयाचे प्राचार्य आर .आर .पाटील व प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मी पाटील यांची मनोगते झाली.
  या कार्यक्रमास विशाखा आपटे ,सुजाता लोहिया ,मीरा कुलकर्णी , स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे , जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सकट यांच्यासह  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अनघा पेंढारकर यांनी केले. आभार अंजली मोहिते यांनी मानले.

           फोटो

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ गार्गीज   यांच्यावतीने आयोजित 'नेशन बिल्डर  पुरस्कार  प्राप्त शिक्षकांच्या समवेत संग्राम पाटील,  सुहास कुलकर्णी, गौरी शिरगावकर ,उत्कर्षा पाटील व अंजली मोहिते आदी मान्यवर

Sunday, 27 September 2020

कवी लेखक प्रा. सचिन कांबळे यांना पुरस्कार जाहिर.


हेरले / प्रतिनिधी
दि.28/9/20
   दिल्ली नवोदित साहित्यकार मंच दिल्ली व सोसाइटी फॉर यूथ डेवलपमेंट (रजि.) २०१९ यांच्या मार्फत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी व त्याना यथोचित मान देण्यासाठी त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी गावचे सुपुत्र कवी व लेखक प्रा. सचिन कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
     सध्या ते संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे मध्ये रसायनशास्त्र विभागात अधिव्याख्याता, युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटकचे कोल्हापूर जिल्हा संघटक आणि साहित्यानंद प्रतिष्ठान, कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संजय घोडावत विद्यापीठ चे अध्यक्ष  संजयजी घोडावत,  विश्वस्त  विनायक भोसले  प्राचार्य विराट गिरी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

लॉक डाऊन काळातील छंदातून उद्योग निर्मिती...कळंब्याच्या अर्चना सुर्यवंशी बनल्या केक उद्योजीका

..
कंदलगाव - प्रकाश पाटील 
    लॉक डाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,अनेकांचे व्यवसाय नाहीसे झालेत आशावेळी महिलांनी घर सांभाळण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ओळखून कळंब्याच्या अर्चना सुर्यवंशी यांनी आपल्या छंदाच्या उपयोगातून उद्योग निर्मीती करून लॉक डाऊनचा पुरेपूर फायदा घेतला.
    अनेक महिलांना घरकाम झाल्यावर काय करायचे याचे उत्तर मिळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.आशा वेळी मनात आलेल्या युक्तींना चालना देणे गरजेचे असते. घरामध्ये छोटे केक बनवून ते घरच्यांना खायाला घालणे सर्वानांच जमते पण असे केक बनवून समाजात आपली उद्योजीका म्हणून ओळख व्हावी या संकल्पनेतून अर्चना सुर्यवंशी यांनी अर्धा किलोपासून दहा किलो पर्यत केक बनवून समाजात आपली ओळख निर्माण केली आहे.
    कोल्हापूर मधिल एका हौशी मालकाने आपल्या म्हशीचा वाढदिवस करण्यासाठी सात किलोचा केक सुर्यवंशी यांचेकडून घेतला आणि तेंव्हापासून सुर्यवंशी यांची ओळख समाजात उद्योजिका म्हणून झाली.
     लॉक डाऊन काळात सुमारे दोनशेच्या वर पोस्ट्री,रसमलई, फोटोफेम,डॉल केक, स्वीस रोल, चॉकलेट असे अनेक प्रकारचे केक बनविले आहेत.


लॉक डाऊन काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने महिलांनी मनोधैर्य न खचता आपल्या घंदातून उद्योजीका बनावे. या हेतूने मी संकल्प करून आपल्या छंदातून उद्योजिका बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
अर्चना सुर्यवंशी, केक उद्योजिका .


फोटो . लॉक डाऊन काळात छंदाचा उपयोग करून केक बनविताना अर्चना सुर्यवंशी .

Saturday, 26 September 2020

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थे मार्फत मास्क व सॅनी टायझर वाटप शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद महापौर निलोफर आजरेकर

*

कोल्हापूर दिनांक 26 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.हे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार महापौर सौ निलोफर आजरेकर यांनी काढले .
प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गेली सहा महिने सातत्याने कोरोना च्या वेगवेगळ्या कामात कार्यरत आहेत.या सर्वांना तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पतसंस्थेच्या वतीने मास्क  व सॅनिटायझर वाटप करण्यात आले .
यावेळी स्थायी सभापती सचिन पाटील,मुख्य शहरअभियंता नेत्रदीप सरनोबत पतसंस्थेचे चेअरमन संजय पाटील,खजानिस उमेश देसाई संचालक प्रकाश पाटील,उत्तम गुरव,सुभाष धादवड,वसंत आडके,शिवराज नलवडे राजेंद्र गेंजगे,विजय माळी शकील भेंडवडे,विजय जाधव,दिलीप माने,सुनील पाटील,फारुक डबीर,संतोष कदम,अनिल बचाटे,योगेश व्हटकर,मंगेश चव्हाण,राजाराम शिंदेआदी कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत सचिव सुधाकर सावंत यांनी केले आभार चेअरमन संजय पाटील यांनी मानले. 

Friday, 25 September 2020

शेतकऱी विरोधी विधेयक मागे घ्यावे - स्वा. शेतकरी संघटनेचे निवेदन

हातकणंगले / प्रतिनिधी
      

केंद्र सरकारने राज्यसभेत व लोकसभेत शेतकरी विरोधी विधेयक मंजूर केले आहे. ते ताबडतोब मागे घ्यावे अशा आशयाचे लेखी निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हातकगंले तालुक्याच्या वतीने हातकणंगले तहसिलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले.
      लेखी निवेदनातील आशय केंद्र सरकारने राज्यसभेत व लोकसभेत बहुमताच्या बळावर लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून शेतकरी विरोधी विधेयक मंजूर करून घेतले आहे. सदर विधेयकामुळे शेतकऱ्याला हमीभाव पासून वंचित राहवे लागणार आहे.तसेच शेतकऱ्याला भारतीय राज्यघटनेप्रमाणे दिलेल्या मुलभूत हक्कावर गदा येणार आहे. मुळात केंद्र सरकारने शेतकऱ्याला कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला या विधेयकाने बांधलेले आहे. विधेयाका बाबत शेतकऱ्याचे कोणतेही हित जोपासले गेले नाही. उलट शेतकऱ्यांची कायदेशीर लूट करता यावी अशी यंत्रणा कायदयाने तयार झाली आहे.केंद्र सरकारने ताबोडतोब सदर शेतकरी विरोधी विधेयक मागे घ्यावे अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील. या लेखी निवेदनावर तालुका सरचिटणीस मुनिर जमादार , पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा, महेश पांडव , अॅड. सुरेश पाटील, अमित पाटील , महावीर चौगले आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून हे पदाधिकारी लेखी निवेदन हातकणंगले तहसिलदारांना देतांना उपस्थित होते.
       फोटो 
हातकणंगले तहसिलदार प्रदीप उबाळे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लेखी निवेदन देतांना सरचिटणिस मुनिर जमादार व अन्य पदाधिकारी

Thursday, 24 September 2020

हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या आरोग्य मोहिमे अंतर्गत सहा गावामध्ये ६५० कुटुंबामधील २९६६३ लोकसंख्येचा सर्वे

हातकणंगले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर


      हातकणंगले तालुक्यातील हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या आरोग्य मोहिमे अंतर्गत सहा गावामध्ये ६५० कुटुंबामधील २९६६३ लोकसंख्येचा सर्वे झालाआहे. यामध्ये ६२ संशयित रुग्णांचा स्वॅब तपासला त्यापैकी तीन कोरानाचे रूग्ण सापडल्याने त्यांच्यावर  उपचार सुरू आहेत. १ ऑक्टोबंरपासून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शन्वये 'विशेष आरोग्य मोहिम' सुरू होईल. या मोहिमेतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी केली जाणार असल्याची  माहिती प्रसिद्धीस वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी दिली.
          कोराना महामारीचा समुह संसर्गचा प्रादूर्भाव  हेरले, रूकडी, माले ,मुडशिंगी ,चोकाक, अतिग्रे आदी सहा गावांमध्ये होऊन आजपर्यंत ३९९ कोरोना रुग्ण आढळले त्यापैकी ३१७ रुग्णांवर उपचार होऊन डिस्चार्ज मिळाला,१७ जणांचा मृत्यू झाला आहे . उपचार घेत असलेले ६५ रूग्ण पैकी ४१घोडावत कोवीड सेंटर , सीपीआरमध्ये चार, खाजगी दवाखाण्यात ९ तर घरी  ११उपचार घेत आहेत.
        हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कोरोना समुह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य मोहिम सुरू आहे. १५ सप्टेबंरपासून आशा - स्वयंमसेविका ,अंगणवाडी सेविका , स्वंयमसेवक या तीन जणांच्या गटाकडून दररोज ५० घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. आज पर्यंत सहा गावांमध्ये ६५० कुटुंबामधील २९६६३ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ६२ संशयितांचे स्वॅब घेतले गेले त्यापैकी ३ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
        आरोग्य मोहिमे अंतर्गत सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबाचे सर्दी ,ताप ,खोकला, किडणी विकार, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब आदी शारिरीक त्रासाबद्दल विचारपुस केली जाते.गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले व साठ वर्षावरील व्यक्तीं आदीसह कुटुंबांतील सर्व सदस्यांचे ऑक्सिजन प्रमाण व तापमान नोंद करून' माझे कुटुंब माझी जबाबदारी ' या अॅपमध्ये माहिती भरली जात आहे. या सर्वेतील संशयित रुग्णांची यादी त्या गावातील तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिली जात आहे. ते त्यांना स्वॅब तपासणीसाठी कोवीड सेंटरमध्ये पाठवत आहेत.
        प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र ताप उपचार केंद्र विभाग सुरू केला असून दररोज जास्त ताप असणाऱ्यांची  तपासणी केली जात आहे. तसेच नॉन कोवीडमध्ये दमा, संडास उल्टी, अशक्तपणा, मधुमेह, सांधेदुखी, रक्तदाब, अंगदुखी आदींनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची वैद्यकिय तपासणी करून उपचार सुरू आहेत. या आरोग्य मोहिमेमध्ये आरोग्य सहाय्यक व्ही.बी. वर्णे ,उदय कांबळे, आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंमसेविका, अंगणवाडी सेविका आदी कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. 
  या मोहिमेस महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, माजी उपसरपंच विजय भोसले ,संदिप चौगुले, मुनीर जमादार तलाठी एस. ए. बरगाले आदींसह पाच गावातील सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कोराना सनियत्रंण समितीचे सहकार्य लाभले आहे. 
    आरोग्य मोहिमेतंर्गत सर्वेसाठी आपल्या प्रत्येकाच्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी कुटुंबांतील सर्व व्यक्तींच्या आरोग्याची योग्य आणि खरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.

Wednesday, 23 September 2020

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन जिल्ह्याच्या आपत्ती निवारण निधीस द्यावे : पालकमंत्री नाम.पाटील यांची आवाहन


पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.23/9/20

       कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोल्हापुरात कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण निधीस द्यावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सतेज डी.पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने आयोजित बैठकीत केले. अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड यांनी केले. यावेळी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
      यावेळी बोलताना नाम.पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या वतीने कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्यास ते राज्य नव्हे देशाच्या दृष्टीने पथदर्शी ठरेल. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी हातभार लागणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास सर्व संघटनांनी प्रतिसाद दिला. याबाबत नियोजनासाठी शुक्रवारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्याचेही ठरले. 
       यावेळी शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, संस्थाचालक संघाचे सचिव प्रा.जयंत आसगावकर, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष दादा लाड, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, प्रभाकर हेरवाडे, मुख्याध्यापक महामंडळाचे व्ही.जी.पोवार, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, मिलिंद पांगिरेकर, प्रा.सुभाष जाधव, प्रा.सी.एम.गायकवाड, राजेश वरक, शिवाजी माळकर, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, के.एस.कारंडे, गजानन काटकर, उदय पाटील, के.के.पाटील, मनोहर जाधव, प्रशांत पोवार, मोहन भोसले, पंडीत पवार, इरफान अन्सारी, सूर्यकांत चव्हाण यांच्यासह संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

Tuesday, 22 September 2020

शासनाने शिक्षण क्षेत्रातील समन्वय समिती नेमून शिक्षण क्षेत्रातील निर्णय घ्यावेत- राज्यस्तरीय वेबिनार मध्ये प्रा.जयंत आसगावकर यांची मागणी




पेठवडगांव / प्रतिनिधी 
दि.२२/९/२०
मिलींद बारवडे


महाराष्ट्र शासनाने शिक्षणक्षेत्रातील कोणतेही निर्णय घेत असताना शिक्षणक्षेत्रातील समन्वय समिती नेमून त्यानंतरच याबाबतीत निर्णय घ्यावेत असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा.जयंत आसगावकर यांनी केले.
           महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, कोल्हापूर विभाग यांच्यावतीने आणि कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा.आसगावकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षण संस्था महामंडळाच्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
           प्रा. आसगावकर यांनी यापुढील काळात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आणि त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही याबाबत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील शिक्षण संस्था महामंडळाला विश्‍वासात घ्यावे असे सांगितले.
           या वेबिनारमध्ये गोपाळ सामंत यांनी सर्वोच्च न्यायालयामधील खटल्याची माहिती दिली. यावेळी वेबिनारमध्ये इयत्ता  ५ वीचा वर्ग ४ थीला जोडणे, प्रस्तावित नवीन संच मान्यता निकषाबाबत हरकती, चालू वर्षाचे वेतनेतर अनुदान, पवित्र पोर्टल नोकर भरती या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेबिनरला महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील ,उपाध्यक्ष वसंत पूईखेडकर, उपाध्यक्ष अशोक थोरात, कायदेशीर सल्लागार रवींद्र फडणवीस, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, प्रा.सी एम गायकवाड उपस्थित होते. या वेबिनारमध्ये शिक्षण चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थासमोरील अडचणी मांडून काही सूचना केल्या. आभार विभागाचे अध्यक्ष शिवाजी माळकर यांनी मानले.

Sunday, 20 September 2020

कुंजवन - कोल्हापूरचं आदर्श कोविड सेंटर

प्रतिनिधी सतिश लोहार
**
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या उदगाव या ठिकाणी असलेलं जैन तिर्थक्षेत्र कुंजवन या ठिकाणी 2 मोठी मंगल कार्यालयं  अन राहण्यासाठी भरपूर खोल्या  आहेत. कोरोनाची साथ सुरु झाली अन परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसताच कुंजवनच्या ट्रस्टी लोकांनी हा परिसर शासनाच्या कोविड सेंटरसाठी दिला. सध्या इथे 80 रुग्ण कोरोना वर उपचार घेत आहेत.
 
या सेंटरचं खास वैशिष्ट म्हणजे इथला निसर्गरम्य परिसर भरपूर झाडी, मोठी अन स्वच्छ जागा, मंदीर, स्वतंत्र किचनची सोय अशा गोष्टींमुळे इथले पेशंटस "आपण इथे उपचार घेण्यासाठी आलोय" हेही विसरून जातात. इथे जेवण बनवणारे शुभम नावाचे आचारी अन त्यांच्या स्टाफचं तर विशेष कौतुक  सर्वांना स्वादिष्ट नाश्ता, चहा,बिस्किटं, दोन वेळचं रुचकर जेवण,  जेवणासोबत एखादं फळ   अशा गोष्टींमुळे पेशंटसना अगदी घरच्यासारखं जेवण मिळतं.  स्वच्छता तर नावाजण्यासारखी आहे जेवणाची पंगतही बाहेर कट्ट्यावर अगदी हवेशीर जागेत बसते. हे सगळं अतिशय खेळीमेळीत चाललेलं असतं. बाहेर दोन तीन लाख भरुन एडमिट केलेल्या पेशंटना ही असं जेवण मिळत नाही. हे मी स्वत: डोळ्यांनी पाहिल माझी आणि नेजे सर यांची दिनांक 4 /8/2020 ते 20 /8 /2020 पेशंट रिपोरटिंग साठी नेमणूक झाली आणि आम्हीही समाज भान जपून लगेच कामाला सुरुवात केली रोज सकाळी 9.00  वाजता 11 व 2 आणि 4 वाजता कुंजवणं आणि जे जे हॉस्पिटल जयसिंगपूर या दोन्ही केंद्रावरील रिपोर्ट कार्ड तयार करून ते पोर्टल वरती अपलोड करण्याचे काम आम्ही गेली पंधरा दिवस निरंतर रेपोर्टिंग करीत आहोत किती पेशंटdischarge refral झाले नवीन किती दाखल झाले जेणेकरून सर्वाना समजेल की शिरोळ तालुक्यात कोणत्या कोविडं केअर सेन्टर वरती किती oxygen बेड आहेत किती सिलेंडर शिल्लक आहेत हे समजत आगर कोविडं केअर सेन्टर वरती सतीश कोळी सर आणि मोदी कोविडं केअर सेन्टर वरती हाके सर असे आम्ही चारजण  निरंतर काम करीत आहोत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे या ठिकाणी मला नमूद काराव अस वाटत श्री नेजे सर आणि मी अनिल सुतार आम्हीं दोघांनी जेजे हॉस्पिटल आणि उदगाव कुंजवणं या दोन सेंटर चे रेपोर्टिंग अचूक करीत आहोत जेणे करून योगेश पाटील विशीतला तरुण नर्सिंग   कोर्स पूर्ण केलेला ज्याने कमी वेळेत तालुक्यातील सर्व सेंटर स्वतः सेटअप नियोजन पूर्वक लावण्यात यश मिळवले त्यामुळेच तालुक्यात आदर्श सेन्टर यशस्वीपणे कार्यरत आहेत हेरवाड मधील एक तरुण जो कोविडं positive होता  त्याने संपर्क करून उदगाव येथे दाखल झाला आणि तो आज येथील उपचार घेऊन समाधान व्यक्त करत कृतज्ञता पूर्वक भाव त्याच्या डोळ्यात सर्वप्रति दिसत होताआता सर्वात महत्वाचा मुद्दा इथले उपचार या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून ड्यूटीवर असणारे डॉ. कंदले सर अन त्यांच्या संपूर्ण स्टाफला पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो. या लोकांनी इथे खरोखर इतकं आदर्शवत काम केलंय, की काही विचारुच नका. इथून बाहेर  पडणारा प्रत्येक पेशंट इथल्या संपूर्ण टीमचं मनापासून गुणगान गातोय. अगदी ऑक्सीजन लेवल 75 ला आलेल्या अन HRCT स्कोअर 18 असलेल्या पेशंटसवर या टीमने इथे उपचार करुन खडखडीत बरे करुन घरी पाठवलंय. 15 वर्षांपासून 85 वर्षे वय असलेले पेशंटस इथे रिकव्हर झालेत. सीरियस पेशंटसना आपल्या केबीनच्या शेजारच्या रूम्समधे ठेवून त्यांच्यावर जातीने लक्ष ठेवलं जातं. ठिक झालेल्या पेशंटसना वरच्या खोल्यांमधे शिफ्ट करतात. इथे पेशंटला आपण हॉस्पिटलमधे आहे, किंवा कोरोनावर उपचार घेतोय हे आठवतही नाही. सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांशी गप्पा मारत यांचे 8- 10 दिवस मजेत निघून जातात. या 8 दिवसात  इथल्या रुग्णांमधे इतका जिव्हाळा निर्माण होतो, की एखादा डिस्चार्ज होऊन  बाहेर पडत असताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू असतात. हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. बर्याच पेशंटचे नातेवाईक सर्वांना पुरतील इतकी बिस्किटं, फळं वगैरे आणून देतात. ते आचार्यांमार्फत सर्वांना वाटलं जातं. खरोखर इथला आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे , अतिशय प्रामाणिकपणे अन नि:स्वार्थीपणे आपलं कर्तव्य पार पाडत असलेल्या डॉ. कंदले अन योगेश पाटील सर त्यांच्या संपूर्ण टीमचा शासनाकडून यथोचित सन्मान हा झालाच पाहिजे असे मत पत्रकार सतिश लोहार यांचे समोर तेथे कोरोना  ड्युटीवर असणारे, 2O17 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे शिक्षक अनिल सुतार सर ( विद्या मंदिर, शिवनाकवाडी ) यांनी व्यक्त केले .

स्टार अॅकॅडमीच्या वतीने नऊ मान्यवर कोरोना योध्दयांना 'कोरोना योद्धा' पुरस्कार सन्मान

हेरले / प्रतिनिधी
दि.२०/९/२०
स्टार अॅकॅडमीच्या वतीने नऊ मान्यवर कोरोना योध्दयांना 'कोरोना योद्धा' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अशी माहिती प्रसिध्दीस अध्यक्ष दीपक शेटे व उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली.
    स्टार अकॅडमी शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे . गेली सात वर्षे शिक्षण क्षेत्रात  विविध स्पर्धांचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असते तसेच संस्थाचालकां पासून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पर्यंत पुरस्कार देणारी ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे .कोणताही प्रस्ताव न घेता गुणवत्तेच्या आधारे हा पुरस्कार सोहळा दरवर्षी अत्यंत दिमाखात संपन्न होत असतो .
     आपला संपूर्ण भारत एकजूटीने कोरोना महामारी विरुद्ध लढत आहे.  या  बिकट महामारीच्या परिस्थितीत समाजासाठी आपण करत असलेले सेवाभावी कार्य फार महत्वाचे आहे आपण करत असलेली सेवा मानवतेची एक नवी मशाल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे .आपल्या हया ध्येयवेड्या कार्यास स्टार अँकॅडमी मानाचा मुजरा करत कोरोना योद्धाना सम्मानपत्र प्रदान करून सम्मानित केलेआहे.
         स्टार कोरोना योद्धाचे मानकरी  म.न पा. कोल्हापूरचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  ,  शिक्षण व अर्थ जि. प . कोल्हापूरचे सभापती प्रवीण यादव,  नगर परिषद वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी ,माध्यमिक जि . प . कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार , शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे अध्यक्ष एस डी लाड , जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे, शिक्षक अरुण मुजुमदार ,डॉ. वर्षा पाटील  , शिक्षक युवराज मोहिते आदी
 स्टार कोरोना योद्ध्यांना स्टार अॅकॅडमी चे अध्यक्ष दीपक शेटे उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सन्मानपत्र पुस्तक व गुलाबपुष्प देऊन  सन्मानित केले. समाजात या स्टार कोरोना योद्ध्याचे विविध माध्यमातून अभिनंदन होत आहे .

         फोटो 
स्टार अॅकॅडमीच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना सन्मानीत करतांना अध्यक्ष दीपक शेटे व उपाध्यक्ष शिवाजी पाटील.

Saturday, 19 September 2020

निलेवाडी मध्ये समाज उपयोगी उपक्रम संपन्न

प्रतिनिधी सतिश लोहार
*निलेवाडी मध्ये समाज उपयोगी उपक्रम पार पडला*
पक्के लायसन्स टेस्ट देण्याच्या प्रसंगी  आरटीओ इन्स्पेक्टर प्रदीप शिंगारे, आरटीओ इन्स्पेक्टर बालाजी धनवे , असिस्टंट इन्स्पेक्टर उगले, असिस्टंट इन्स्पेक्टर मस्के, सरपंच ,उपसरपंच, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, आणि आवर्जून पक्के लायसन्स काढायला आलेले बंधू-भगिनी आणि निलेवाडी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .अनेक भगिनींना व बांधवांना वाहन चालवण्याचा पक्का परवाना मिळतो ,याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोचण्याचा मार्ग मिळतोय परंतु, या मार्गावर मार्गक्रमण करत असताना, वेगावर नियंत्रण ठेवणं, अत्यंत गरजेचे आहे. वेगावर जरी नियंत्रण ठेवणं आवश्यक असलं तरी, सकारात्मक विचार पाहता, पॉझिटिव्हिटी ,माणसातील चांगुलपणा , अभियान  माणुसकी वर प्रेम करणे, एकमेकाला मदत करणे ,या गोष्टीवर नियंत्रण ठेवायची गरज नाही ,  चांगल्या गोष्टीचा प्रत्येकाने हात पकडला पाहिजे,हाच विचार समोर ठेवून चांगुलपणाची चळवळ वसुमन साई महिला व बालकल्याण संस्था, समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. महात्मा फुले म्हणायचे एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती मोठी होते परंतु ,एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब मोठं होतं हाच विचार माझी आई  स्वर्गीय सुमन साई  यांनी आम्हा तिनी भावंडांना दिला,
 आज मला खूप आनंद होतोय निलेवाडी तील मध्ये सुद्धा माझ्या 10:20 भगिनींनी उपक्रमाच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळते माझ्या बाजूने निश्चितपणे ही जी काही संधी मिळाली, त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचे, जीवन गतिशील बनवतील, संधीच सोन बनवतील,
एखाद्या संधीचा संधीसाधूपणा दुरुपयोग किंवा संधीच सोनं करणे यात फरक आहे.संधीसाधूपणा एका व्यक्ती पुरता मर्यादित राहतो .वैयक्तिक स्वार्थ पेक्षा, संधीचं सोनं करून, समाजाचा केव्हाही चांगलं करण हे महत्वाचे
डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे  यांच्या प्रेरणेने होत असलेल्या या कार्यक्रमात ,आरटीओ खात्याने जे सहकार्य केले,क्लेरिकल स्टाफ ,मी प्रतिभा शिंगारे सौ सुमन साई महिला व बालकल्याण संस्था यांच्यामार्फत आभार मानते . निलेवाडी तील  ग्रामस्थांचा सहकार्यामुळेच अनेक उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते  ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भविष्यातही अनेक उपक्रम राबवण्याचा मनोदय आहे.सहकार्य कराल ही अपेक्षा करते ,आणि या सर्व कार्यसिद्धीसाठी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले  प्रदीप शिंगारे , डॉ .ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचे शतशः आभार प्रतिभा शिंगारे अध्यक्ष सुमन साई महिला व बाल कल्याण संस्था महिला व बालकल्याण संस्था यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या .

दानम्मा देवी श्री वीरभद्र मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी सतिश लोहार
*दानम्मा देवी श्री वीरभद्र मंदिराच्या जागेवरती वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न* 
रोटरी क्लब सेंट्रल इचलकरंजी च्या वतीने खोतवाडी येथील गौरी शंकर नगर मध्ये श्री दानम्मा देवी श्री वीरभद्र मंदिराच्या जागेवरती वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास रोटरी क्लब सेंटरचे अध्यक्ष श्री संजय गायकवाड व रोटरी प्रोबेस क्लब चे अध्यक्ष श्री बाळासाहेब देवनाळ तसेच खोतवाडी चे सरपंच श्री संजय चोपडे व डेप्युटी सरपंच,  कोल्हापूर जिल्हा कामगार संघटनेचे उपाध्यक्ष परशराम कत्ती तसेच मंडळाचे उपाध्यक्ष श्री शिवकुमार मुरतले व सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली ग्रामसेवक अनिल माने पत्रकार आप्पासो भोसले व मंदिराचे पुजारी हिरेमठ इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मुरतले सर यांनी केले.

Friday, 18 September 2020

ह्रदया कॅन्सर सेंटरमध्ये कोवीड सेंटरचे उद्घाटन

हेरले / प्रतिनिधी
दि.18/9/20

हेरले ( ता. हातकणंगले) येथील ह्रदया कॅन्सर सेंटरमध्ये  कोवीड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले .या सेंटरचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  दौलत देसाई व महिला व बालकल्याण सभापती  पद्माराणी राजेश पाटील  यांच्या हस्ते व डॉ. संतोष चौगुले यांच्या उपस्थित संपन्न झाले.
                                                       या  कार्यक्रम प्रसंगी प्रांतअधिकारी डॉ. विकास खरात,तहसीलदार  प्रदिप उबाळे , हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ. कोरे, उपसरपंच राहुल शेटे,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, दवाखान्यातील डॉक्टर्स , प्रशासन अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

       फोटो 
हेरले येथील डॉ. संतोष चौगुले यांच्या ह्रदया हॉस्पीटलमध्ये कोवीड सेंटरचे उद्घाटन करतांना जिल्हा अधिकारी दौलत देसाई ,महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील व इतर मान्यवर.

इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेस जोडण्याच्या शासनाच्या धोरणास शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध.

पेठ वडगांव/ प्रतिनिधी
  मिलींद बारवडे
दि.18/9/20
१६ सप्टेबंर २०२० रोजी शासनाने घेतलेल्या माध्यमिक शाळेचा पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्याच्या धोरणास शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र विरोध करून तो रद्द करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठातंर्गत सर्व संघटनांची बैठक मुख्याध्यापक संघांच्या विद्याभवनामध्ये आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी एस. डी.लाड होते.

      महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. १३ जुलै २०२० रोजी प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदासाठी संच मान्यतेचे सुधारित निकष जाहिर केले. त्यामध्ये १) प्राथमिक शाळातील प्राथमिक ( इ.१ली ते ५वी ) व उच्च प्राथमिक ( इ.६वी ते ८वी) या गटातील पदांसाठी दि. २९ ऑगस्ट२००९मधील राजपत्रातील परिशिष्ठांमध्ये नमूद केल्यानुसार पदे देण्यासाठी सदर निकष विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आले.२ ) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतूदी विचारात घेऊन ज्या माध्यमिक शाळा इ.पाचवी वर्गापासून आहेत,त्या शाळातील इयत्ता पाचवीचा वर्ग नजिकच्या एक किमी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेच्या प्राथमिक शाळेस सन २०२० / २१ -२२ पासून जोडण्या बाबत प्रस्तावित करण्यात येत होते असे म्हटंले होते.तथापि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. १६ सप्टेबर २०२० रोजी झ्यत्ता पाचवीचा वर्ग या वर्षीच( २o२०-२१) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळेस अगर खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेस जोडण्याचा निर्णय अतिशय घाई गडबडीत व सर्व संस्था मुख्याध्यापक व शिक्षक कोरोना साथीच्या निवारण्यामध्ये गुंतलेले असतांना घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विसंगत असून चालू शैक्षणिक वर्षाच्या मध्यावरच घेतला आहे. तो माध्यमिक शाळा व तेथिल शिक्षकांच्यावर अन्यायकारक आहे. या धोरणामुळे माध्यमिक शाळांनी त्या वर्गासाठी निर्माण केलेल्या भौतिक  सुविधा व खोल्या यांचे करायचे काय?तेथिल शिक्षकांचा समायोजनाचा प्रश्न मोठा जटिल बनणार आहे. 
  शिक्षकांचे समायोजन करतांना बिंदू नामावली रेषो कसा राखणार ?पालकांना आपल्या मुलांना माध्यमिक शाळेतच पाठवायचे असेल तर त्यांच्यावर बंधन का व कश्यासाठी राज्यात हजारो प्राथमिक शाळा अशा आहेत की ज्यांच्याकडे चार पेक्षा अधिक खोल्या नाहीत. मुख्याध्या- पकांसाठी वेगळे कार्यालय नाही. शिक्षकांसाठी स्टाफरूम नाही. असे असतांना शासनाचा हा अट्टाहास कश्यासाठी?शाळांना पटसंख्येंची नविन अट घातल्याने अनेक शाळा बंद पडणार आहेत. कायम विनाअनुदानित तत्वावरील शाळा गेल्या वीस वर्षापासून अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना मिळालेल्या वीस टक्क्याच्या पुढील टप्पा  गेल्या चार वर्षापासून मिळालेला नाही. त्यांच्या अनुदानासाठी शासनाने नेमलेली समिती ही त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. या शाळांना शासनाने ताबोडतोब शंभर टक्के अनुदान दयावे.
      ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांवर अन्याय करणाऱ्या विद्यार्थी पालक व शाळांना वेठीस धरणाऱ्या तसेच शिक्षकांच्या समायोजनाचा जठिल प्रश्न निर्माण करणाऱ्या या धोरणास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध असून तो ताबोडतोब रद्द करावा या मागणीसाठी मंगळवार दि. २२ सप्टेबंर २०२० रोजी दुपारी १ वाजता कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
        या प्रसंगी चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शिक्षण संस्था संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव प्रा. जयंत आसगावकर, भरत रसाळे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे, जॉईंट सेक्रेटरी इरफान अन्सारी, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, एस एस चव्हाण, अजित रणदिवे , काकासाहेब भोकरे, श्रीकांत पाटील, एम. जे. पाटील , राजेश वरक, रत्नाकर माळी , विरेंद्र वडेर,संजये ओमासे ,आदीसह  संघटानेचे  पदाधिकारी उपस्थित होते.
          फोटो 
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड शेजारी वसंतराव देशमुख प्रा. जयंत आसगावकर, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, बाबासाहेब पाटील ,भरत रसाळे ,संतोष आयरे आदी मान्यवर.

Thursday, 17 September 2020

राजर्षी शाहूमध्ये पालक व शिक्षक ऑनलाइन मिटींग संपन्न

** 

कसबा बावडा प्रतिनिधी 

को.म.न.पा.राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा,मध्ये शैक्षणिक वर्ष 2020 -- 2021 ची पालक -- शिक्षक मिटिंग झूम च्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात आली. मिटिंगमध्ये शैक्षणिक वर्ष शाळा व विद्यार्थी यांचे संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी श्री एस के यादव, केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, विजय माळी, बाळासाहेब कांबळे, उत्तम कुंभार,अपंग समवेशीत शिक्षण तज्ञ राजेंद्र अप्पूगडे,जिल्हा समनव्यक शकीला मुजावर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, यांनी चर्चेत सहभाग घेतला व मार्गदर्शन केले.
पालक सभेस प्रमुख मार्गदर्शक मा प्रशासनाधिकरी एस के यादव  यांनी पालक व विद्यार्थी यांना प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर च्या मार्फत व्हर्च्युअल क्लास व्हिडिओ पहावे व त्यासंदर्भात काही शंका असलेस विषय शिक्षक यांना शाळेच्या वेळेत फोन करून विचारू शकता. शैक्षणिक धोरण 2020 च्या नुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही  सर्व चांगल्या प्रकारे शैक्षणिक नियोजन केले आहे. शाळेतील टेक्नॉसिव्ही शिक्षक यांच्या मदतीने आम्ही 100 टक्के विद्यार्थ्यांना प्रवाहात आणत आहोत व शिक्षकांनी स्वतः तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ विद्यार्थ्यांच्या घर घरात मोबाईल च्या माध्यमातून पोहोचत आहेत. सर्व शिक्षक व्हिडीओ निर्मिती छान छान करत असलेबद्दल अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 
शैक्षणिक पर्यवेक्षक  बाळासाहेब कांबळे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना सोशल डिस्टन्सचा वापर करावा.बाहेर जाताना मास्क चा  वापर करा, सॅनिटायझर वापर करा तसेच अभ्यास करत असताना वेळेचं नियोजन करावे म्हणजे म्हणजे घरातील ताण तणाव वाढणार नाहीत असे सांगितले.,
शिक्षण तज्ञ मा इलाई मुजावर यांनी मोबाईल व रेडिओ, टी व्ही वरील शैक्षणिक कार्यक्रम खरोखरच चांगले दर्जेदार आहेत त्यांचा वापर पालकांनी आपल्या मुलांना वेळेचे नियोजन करून घरी पहावे. व त्या संदर्भात दररोज कोणता व्हिडिओ पहिला त्याचा अभ्यास घरी सोडवून शिक्षकानी केलेल्या हॉटसअप ग्रुपवर चर्चा करावी.दररोज अभ्यास आपला मुलगा करतो की नाही हे सुद्धा पहावे असे प्रतिपादन केले.
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी अभ्यासाबरोबर दिवसाची दिनचर्या कशी असावी व कोणत्या वेळी कोणता अभ्यास करावा याचे नियोजन सांगितले. कोरोनाकाळींन समस्या असतांना आपण आपल्या आरोग्यासाठी सकाळचा एक तास योगासने, योगसाधना , सूर्यनमस्कार, ध्यानधारणा, ओंकार , प्राणायाम यासारखे कोणताही जमेल तो व्यायाम करणे काळाची गरज आहे.सुंदर मनात , सुंदर विचार येतात. तसेच शुद्ध हवा, अन्न ,पाणी हे आरोग्याची गुरुकिल्ली आहे.रोजच्या आहारात पालेभाज्या, लिंबू,मोड आलेली कडधान्ये यांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आहाराबद्दल मार्गदर्शन केले.
उत्तम कुंभार यांनी आभार व्यक्त करताना इंग्रजी विषयाबद्दल सोपे सोपे वाचन, शुद्ध लेखन व स्पेलिंग पाठ कसे करावेत याचे मार्गदर्शन केले.
पालक सभा चर्चेत अजय बिरणगे ,प्रशांत सराटे ,मा शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पल्लवी पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्या दिपाली संतोष चौगले, निखिल सुतार,वेदांतिका पाटील, कल्पना पाटील इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली.
शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक शिवशंभू गाटे, सुशिल जाधव, तमेजा मुजावर यांनी झूम च्या माध्यमातून यशस्वी कार्य केले.

Saturday, 12 September 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही आरोग्य मोहिम १५ सप्टेबंर ते २५ ऑक्टोबंर या दरम्यान राबवून घरोघरी सर्वे करून रुग्णांचा शोध घेऊन सहा गावे कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील : वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख.

'

हेरले / प्रतिनिधी
दि.11/9/20

   हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सहा गावांमध्ये कोरोनाचा समुह संसर्ग झपाटयाने वाढल्याने राज्य शासनाची 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या आरोग्य अभियांनार्गत  समुह कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना अभियान म्हणून १५ सप्टेबंर ते २५ ऑक्टोबंर पर्यत लोकसंख्या निहाय्य दोन वेळा सर्वे करून  रूग्ण शोधमोहिम सुरू करून त्यांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून सहा गावे कोरोना मुक्त करणार  असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
         कोरोना संसर्ग मार्च ते ऑगस्ट पर्यंत वाढत आहे. सद्या समुह संसर्ग वाढल्याने हेरले, अतिग्रे, मुडशिंगी, माले, अतिग्रे,रूकडी या गावांमध्ये रूग्ण संख्या गंभीर बनली असून २८७ झाली आहे. जिल्हा अधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शन्वये माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य अभियान्वये १५ सप्टेबंर ते २५ ऑक्टोबर रूग्ण शोध मोहिम सुरू करणार आहोत.      

  या अभियानामध्ये आरोग्य शिक्षण, आरोग्य संदेश देऊन,  ह्रदयविकार ,  लठ्ठपणा, मधुमेह रूग्ण, किडणी आजार, संशयित कोविड रुग्ण आदींचा शोध घेऊन तपासणी केली जाणार आहे व त्यांना उपचाराखाली आणले जाणार आहे .गावतील व्यापारी, भाजी विक्रेते, दुकानदार यांना आवाहन करून त्यांचे स्वॅब तपासणी केली जाणार आहे.सर्व मेडिकल शॉप व खाजगी डॉक्टरकडून रुग्णांची माहिती घेऊन त्यांना उपचाराखाली आणले जाणार आहे. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांवर आरोग्य केंद्रात तात्काळ उपचार केले जाणार आहेत.
        या मोहिमेमध्ये एक वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस आशा स्वयंमसेविका, बेचाळीस अंगणवाडी सेविका चार, आरोग्य सेविका, तीन आरोग्य सेवक, सहा आरोग्य सहाय्यक कार्यरत असणार आहेत.पंचेचाळीस स्वयंमसेवकांची आवश्यकता आहे. या सेवकातून तीन जणांचा गट करून दररोज ५० घरांची तपासणी केली जाणार आहे. या सर्वे मोहिमेतून रुग्णांना शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जाणार असून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे.
       आज पर्यंतच्या आरोग्य मोहिमा यशस्वी करण्यासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या        महेरनिगा जमादार, पोलिस पाटील नयन पाटील,सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहूल शेटे,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण,माजी उपसरपंच विजय भोसले, माजी उपसरपंच संदिप चौगुले, मुनिर जमादार आदींची मदत व सहकार्य लाभलेले आहे. पुढील आरोग्य मोहिम यशस्वी करण्यासाठी सहा गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोरोना सनियंत्रण समिती सदस्य व स्वयंमसेवकांनी मदत करून कोरोना मुक्त गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.

हेरलेसह रूकडी जि.प. मतदार संघात दहा हजार इम्युनिटी बुस्टरचे वाटप सुरू: महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांचा उपक्रम.


हेरले / प्रतिनिधी
दि.13/9/20
श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या आशिर्वादाने
रुकडी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये
 महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्यामार्फत  पंचायत समिती सदस्या  मेहरनिगा जमादार, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली रुकडी, हेरले, हालोंडी , माले , चोकाक , मुडशिंगी, अतिग्रे आदी सात गावच्या ग्रामपंचायतीच्या सौजन्याने रोगप्रतिकारक इम्युनिटी बुस्टर १० हजार  बॉटलसचे मोफत घरपोच  वाटप मोहिम  हेरले  ग्रामपंचायती पासून सुरवात करण्यात आली.
     तरी सर्वानी मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सेवन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रसंगी पोलीस पाटील नयन पाटील , सरपंच अश्विनी चौगुले ,उपसरपंच राहुल शेटे, माजी उपसरपंच विजय भोसले, संदिप चौगुले माजी उपसभापती अशोक मुंडे आदीसह ग्राम पंचायत सदस्य व महिला मंडळ उपस्थित होते.

         फोटो 
हेरले येथे महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील इम्युनिटी बुस्टर बॉटलचे वाटप करतांना इतर मान्यवर व नागरिक.

व्हायरस शटआऊट कार्डचा गोरखधंदा - कोरोनाच्या महामारीत लोकांची फसवणूक


कोल्हापूर प्रतिनिधी  - 

मरता क्या न करता ?  ही अक्षरशः खरी होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. लोक उपचाराअभावी मरत आहेत. यामुळे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे पण याला धाब्यावर बसवून चक्क एक गळ्यात अडकवायचं कार्ड आता बर्‍याच लोकांच्या गळ्यात दिसू लागले आहे. व्हायरस शट आऊट कार्ड असं नाव असणारे आणि मेड इन जपान असं लिहिलेलं कार्ड घालून लोक मुर्खासारख फिरत आहेत. हे कार्ड गळ्यात घातलं तर एक मीटरच्या परिसरातील हवा शुद्ध होते व कोरोना विषाणूचा खात्मा होतो अशा भूलथापा मारुन होलसेल मध्ये केवळ पंधरा ते वीस रुपयांना मिळणारी चायनीज बोगस टाकाऊ वस्तू शंभर दीडशे रुपयांना लोकांच्या गळ्यात मारली जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता या कार्ड मध्ये क्लोरीन अॉक्साईड ची पावडर आढळून आली. क्लोरीन अॉक्साईड म्हणजे ब्लिचिंग पावडर जी पाणी शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. जर ब्लिचिंग पावडर गळ्यात बांधून फिरल्यावर कोरोना संसर्ग टाळता येत असेल किंवा कोरोना होत नसेल तर आजच्या घटकेला संपूर्ण देशात आणि राज्यात हा महामारीचा प्रसंग ओढवला असता का ? 
आशियासह संपूर्ण जगात बंदी असलेले हे बोगस प्रॉडक्ट कोरोना महामारीच्या काळात कोल्हापूरात मात्र धडाक्यात विकले जात आहे. आणि लोकसुद्धा आता हे व्हायरस शट आऊट कार्ड घातलं आहे मला काही होणार नाही, आता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची काय गरज अशा अविर्भावात वावरु लागले आहेत. 

व्हायरस शट आऊट कार्ड हे 
आंतरराष्ट्रीय घोटाळ्याचा हा भाग असल्याशिवाय दुसरं काही नाही. जगातील अनेक देशांनी बंदी घातली असताना भारतीय बाजारपेठेत ही बनावट कार्ड विक्री करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत हे विशेष.
तेव्हा आता लोकांनीच स्वतः याची माहिती आणि खात्री करून अशा बोगस वस्तू पासुन स्वतःला आणि समाजाला आर्थिक आणि आरोग्य दृष्ट्या वाचवणे अत्यंत गरजेचे आहे.

इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज" चा पदग्रहण सोहळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी - 
"इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज" चा पदग्रहण सोहळा दि.५ सप्टेंबर रोजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून करण्यात आला.  सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काम करणे आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून सर्वांनी एकत्रित काम करणे असा या संस्थेचा उद्देश आहे. दि ५ सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन आहे आणि हे औचित्य साधून कलब तर्फे या दिवशी कोल्हापूर शहरातील स्वयम् विशेष मुलांची शाळा आणि ज्ञानप्रबोधिनी भवन संचलित अंध मुलांची शाळा येथील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अशा विशेष मुलांना घडवताना इतर मुलांपेक्षा जास्त लक्षपूर्वक काम करावे लागते याची जाणीव ठेवून या शिक्षकांच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या पदग्रहण समारंभ प्रसंगी क्लब च्या अध्यक्षा म्हणून सौ. रितू वायचळ आणि सचिव म्हणून सौ. गीतांजली ठोमके यांनी सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमाला ईनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या डिस्ट्रिक्ट आय. एस.ओ. सौ.  उत्कर्षा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.  सूत्रसंचालन सौ अमृता पारेख यांनी केले

सुंदर माझी बाग स्पधेचे पारितोषिक वितरण

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे :- 

उदगीर येथील महात्मा पब्लिक स्कुल येथे लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड ग्रीन आर्मी व  उदगीर अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ उदगीर यांच्या संयुक्तविद्यमानने घेण्यात आलेल्या लाहन मुलांच्या वृक्षारोपण स्पर्धेचे व सुंदर माझी बाग या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. 
यात सुंदर माझी बाग या स्पर्धेत 
प्रथम क्रमांक निलांबिका बडिहावेली,
 दुसरा क्रमांक डॉ प्रकाश येरमे, 
तिसरा क्रमांक श्रेया शिरशिरकर,
तर उत्तेजनार्थ नेहा जैन पल्लवी सोमा 
 लहान विद्यार्थी यांच्या मधुन 
प्रथम क्रमांक नमस्वी अवांडकर, 
दुसरा क्रमांक दर्शन चिंचोलकर,
तिसरा क्रमांक विरेन कोटलवार, 
उत्तेजनार्थ विर पाटील श्रावनी साबने
 यांना सन्मापत्र व रोख रक्कम बक्षिसाच्या स्वरूपात देण्यात आले. 
या कार्यक्रमाचे आयोजक मित्र मंडळ अध्यक्ष अभिजीत औटे,लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड अध्यक्षा सौ संगीता नेत्रगावे,सचिव सौ दिपाली औटे,ग्रीन आर्मी उदगीर क्रांती पाटील, चंद्रकांत उप्परबावडे,लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड उपाध्यक्ष मंजुषा कुलकर्णी.आदीसह सचिव अनिता शनेवार,राचम्मा मळभागे. व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Thursday, 10 September 2020

मुख्याध्यापक संघाच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न


       

पेठवडगांव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

     कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभपूर्वक करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते. 
     यावेळी सत्कार करण्यात आलेल्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची नावे अशी - जॉईंट सेक्रेटरीपदी इरफान अन्सारी (नँशनल हायस्कूल, इचलकरंजी), कार्यकारिणी सदस्यपदी सूर्यकांत श्रीरंग चव्हाण (सौ.स.म.लोहिया हायस्कूल, कोल्हापूर), एम.एस.मोरुस्कर (श्री.शाहू कुमार भवन, गारगोटी), सौ.सारिका संदीप यादव (सह्याद्री विद्यानिकेतन, माले ता.हातकणंगले) यांची स्वीकृत सदस्य पदी बी.सी.वस्त्रद (दादासो मगदूम हायस्कूल, कोल्हापूर), अशोक आदगोंडा पाटील (रत्नसागर हायस्कूल, निमशिरगाव) सल्लागार सदस्यपदी एस.बी.चौगुले (राष्ट्रसेवा हायस्कूल, पुलाची शिरोली), माजीद पटेल (ईशा अतुल ऊलुम उर्दू हायस्कूल, आलास ता.शिरोळ) यांची तर मुख्याध्यापक महामंडळाच्या कौन्सिल सदस्यपदी डॉ.एस.बी.शिंदे (कुमार भवन, शेणगाव) यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारप्राप्त के.ए.देसाई (भुदरगड) यांचा सत्कार करण्यात आला.     
      यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे खजिनदार नंदकुमार गाडेकर, संपर्कप्रमुख अशोक हुबळे, राज्य महामंडळाचे सदस्य एस.वाय.पाटील, एम.आर.पाटील, 
अजित रणदिवे, एस.एल.उगारे, पी.जी.पोवार, रवींद्र मोरे, एम.के.आळवेकर, एस.आर.पाटील, बी.बी.हावले, जे.के.पाटील, संपत कळके, जी.ए.पाटील, व्ही.जी. मालिकवाडे आदी उपस्थित होते.
     प्रारंभी स्वागत व सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे  लोकल ऑडिटर मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी मानले.

फोटो : कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश संकपाळ, बाबा पाटील, दत्ता पाटील, मिलिंद पांगिरेकर

हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत 223 रुग्णांना डिस्चार्ज - डॉ. राहूल देशमुख

हेरले / प्रतिनिधी
दि.10/9/20

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत  हेरले माले चोकाक अतिग्रे मुडशिंगी रुकडी या सहा गावातील बुधवार पर्यंतची एकूण कोरोना रूग्ण संख्या  २८७  होती. या संख्ये पैकी २२३रूग्णांचा डिस्चार्ज झाला आहे. मृत रुग्ण १५ असून  उपचार घेणारे रुग्ण संख्या ४९ आहे. अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
    हेरले गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या  - दैनिक -४, प्रगतीवर -११६पैकी , डिस्चार्ज -दैनिक ५ प्रगतीवर-८९, मृत्यू -४, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -११, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-३, घरी उपचार - ९, एकूण शिल्लक -२३, कॉन्टेनमेंट एकूण झोन -२० ,सुरू - ९ बंद -११
     माले गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या  दैनिक -०, प्रगतीवर -१५पैकी, डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-१४, मृत्यू -१, उपचार घेत आहेत - घोडावत कोविड सेंटर -०, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-०, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक -०, कॉन्टेनमेंट एकूण झोन -३ ,सुरू - ३ बंद -०
       चोकाक गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या  - दैनिक -०, प्रगतीवर -६पैकी डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-२, मृत्यू -१, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -१, सीपीआर -१, खाजगी हॉस्पीटल-१, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक ३, कॉन्टेनमेंट एकूण झोन -५ ,सुरू - ३, बंद -२
      मुडशिंगी गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या - दैनिक -०, प्रगतीवर -११पैकी डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-७, मृत्यू -०, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -४, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-०, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक ४, कॉन्टेनमेंट एकूण झोन -३ ,सुरू - ३ बंद -०
      अतिग्रे गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या - दैनिक -०, प्रगतीवर -२४ पैकी डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-२१, मृत्यू -२, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -०, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-०, घरी उपचार - १, एकूण शिल्लक १, कॉन्टेनमेंट एकूण झोन -७ ,सुरू - १ बंद -६
       रूकडी गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या  - दैनिक -१, प्रगतीवर -११५ पैकी डिस्चार्ज -दैनिक ५, प्रगतीवर-९०, मृत्यू -७, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -१७, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-१, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक १८, कॉन्टेनमेंट एकूण झोन -१७ ,सुरू -६, बंद -११ आदी संख्या असून हेरले परिसरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या लक्षणिय असली तरी मृत्यूच्या प्रमाणामुळे समस्या गंभीर बनली आहे. सामुहिक संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रभावी उपाय योजना कार्यान्वीत करून गावे  कोरोना मुक्त करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे बनले आहे.
          समुह संसर्ग झपाट्याने वाढल्याने पन्नास वर्षावरील नागरिकांनी घरीच राहावे, थंडी ताप सर्दी खोकला असणाऱ्या रूग्णांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार घ्यावा, वारंवार हात धुवावेत, लठ्ठपणा, मधुमेह , ह्रदयरोग, किडणी आजार आदी रूग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी, अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, सर्व नागरिकांनी कोरोना मुक्त गाव करणेसाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.

१४ ते २० सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिनानिमित्त सेवा सप्ताह साजरा करावा,असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

   *              

  *नंदुरबार  - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) - - - - -*                             जगात सर्वात शक्तीशाली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांचा वाढ दिवस तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय व महात्मा गांधी यांची जयंती दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या वाढ दिनानिमित्त सेवा सप्ताह साजरा करावा,असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी केले.
    तेली मंगलकार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आदिवासी सेलचे प्रदेशउपाध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जिल्हाउपाध्यक्ष मकरंदभाई पाटील उपस्थित होते.
    विजय चौधरी पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढ दिवस हारतुर्रे पोष्टरबाजी न करता सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा करावयाचा आहे. सत्तरव्या वाढ दिनाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात यावे,अशा पध्दतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी  आवाहन केले आहे.त्या पध्दतीनेच जिल्हयात सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. परिसरातीतल दिव्यांगांची माहिती घेऊन ७० दीव्यांगांना कृत्रिम अवयव व उपकरण प्रदान करावे,७० गरीब वस्त्यांमध्ये किंवा रूग्णालयात फळांचे वाटप  करावे,७० जणांना स्थानिक गरजेनुसार प्लाझ्मा दान करावा,युवा मोर्चाच्या माध्यमातून ७० रक्तदान शिबीरे  घेण्यात यावी, ७० वृक्षांची लागवड करण्यात यावी,७० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे यासह ७० व्हर्चूअल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येणार आहेत.
    २५  सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती तर २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्याचे आवाहन विजय चौधरी यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश माळी यांनी केले तर आभार राजेंद्र गावित यांनी मानले.
    तसेच बैठक यशस्वीतेसाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष हर्षल पाटील ,शहराध्यक्ष नरेंद्र माळी,खुशाल चौधरी आदींनी परीश्रम् घेतले.


राज्यातील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकांना जूनी पेन्शन लागू करा या मागणी सह इतर प्रलंबित मागण्यासाठी निवेदन

*नंदुरबार  - प्रतिनिधी   -  -  वैभव करवंदकर - - - - -*
         राज्यव्यापी निवेदन मोहिमेत महाराष्ट्रात तील सर्व जिल्ह्यासह नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी  यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री  यांना जूनी पेन्शन लागू करा.  या प्रमुख मागणी सह इतर प्रलंबित मागण्यासंबंधीत निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीचे भान ठेवत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने  सामाजिक दुरी ठेवून  तसेच सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले.  राज्यातील  स्थानिक स्वराज संस्थेतील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकांच्या अनेक  प्रश्न वर्षानुवर्षे   प्रलंबित आहे  असून याबाबत महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब  याचे व शासनाचे लक्ष  वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्यव्यापी निवेदन मोहीम छेडण्यात आली.   पहिल्या टप्यात काल दिनांक 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील  तहसीलदार  मार्फत   तालुकास्तरावर व आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर मा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मा मुख्य कार्यकारी अधिकारी, व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.  या प्रसंगी राज्य सहकार्यवाह  पुरुषोत्तम काळे , नंदुरबार  जिल्हाध्यक्ष  आबा बच्छाव ,  जिल्हा संघटनमंत्री  राकेश आव्हाड ,  राज्य कार्यकारिणी सदस्य  रामकृष्ण बागल ,  जिल्हा कार्याध्यक्ष  दिनेश मोरे ,  महिला आघाडीचे  जिल्हाध्यक्ष  चेतना चावडा  , महिला आघाडी जिल्हा कार्यवाह  मीनल लोखंडे ,   जिल्हा कोषाध्यक्ष  सुभाष सावंत ,  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोकुळदास बेडसे ,  नंदुरबार तालुकअध्यक्ष  किरण घरटे  , तालुका कार्यवाह  अनिल देवरे ,  तळोदा तालुका अध्यक्ष मधुकर नागरे आदी उपस्थित होते.
   

देशासह नंदुरबार देखील स्वातंत्र्यसंग्रामाने भारावले , हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि बाल सवंगड्यांचा आज 9 सप्टेंबर रोजी शहीद दिन

  *नंदुरबार - प्रतिनिधी - वैभव करवंदकर ------*     

          ए मेरे वतन के लोगो... जरा आखमे भरलो पाणी.. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.. या गीतानुसार भारत मातेचा थोर सुपुत्र आणि ज्या बालवीराने  तिरंगा ध्वज धरून वंदे मातरमचा नारा देत जुलमी  ब्रिटिशांच्या गोळीबारात धारातीर्थी पडला. त्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि बाल सवंगड्यांचा आज 9 सप्टेंबर रोजी शहीद दिन !                                   नंद गवळी राजा यांनी वसवविलेल्या नंदनगरीत बाल शहीद शिरीषकुमार मेहता यांचा जन्म दिनांक 28 डिसेंबर 1926 रोजी नंदनगरीतील  मेहता व्यापारी कुटुंबीयांत झाला.  पातळ गंगा नदी किनारी डोंगर कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची ओळख व्यापाऱ्यांचे शहर म्हणून परिचित होते.  स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि त्यांचे सवंगडी शशिधर केतकर, लालदास शहा, घनश्यामदास शहा, धनसुखलाल वाणी या बालवीरांचा समावेश  होता. त्यामुळे नंदुरबारचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.  स्वातंत्र्यपूर्व काळापासून नंदुरबार शहरात व्यापार वैभव आणि एकमेकांप्रती असलेला  स्नेह आजही कायम आहे. म्हणूनच अनेक नामवंत व्यक्तींनी या शहराला भेट दिल्याचे सांगण्यात येते. सन 1590 मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले व सुबक घरांनी सजलेले शहर असे मत एन. एन. अकबरी यांनी मांडले होते.  सन 1660 मध्ये प्रसिद्ध प्रवासी पे नेव्हर  यांनी भेट दिली होती.  त्यावेळी त्यांनी नंदुरबारचा उल्लेख श्रीमंत आणि समृद्ध नंदनगरी असा केला होता.  याच नंदुरबारात बाळा शंकर इनामदार नावाचे तेलाचे व्यापारी होते. त्यांना मुलगा नसल्याने ते दुखी असत यातून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला.  त्यांना कन्या प्राप्त झाल्याने ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली.1924 ला पुष्पेंद्र आणि सविता यांचे शुभमंगल झाले. दिनांक 28 डिसेंबर 1926 रोजी या दांपत्याच्या पोटी शिरीषकुमारचा जन्म झाला. त्या काळी देशासह नंदुरबार देखील स्वातंत्र्यसंग्रामाने भारावले होते.  स्वातंत्र्य प्राप्तीसाठी विद्यार्थी आणि सामान्य जनतेने आपले सर्वस्व पणाला लावले होते. शिरीषकुमार मेहता शालेय जीवनात देशप्रेमाने अग्रेसर ठरला. त्यावेळी महात्मा गांधी आणि  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव  विद्यार्थ्यांवर होता. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजांना चले जाव असा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या काढून इंग्रजांना हिंदुस्तान सोडण्याचा इशारा देण्यात आला. त्याकाळी वंदे मातरम, भारत माता की जय घोषणा देणाऱ्यांना ब्रिटिश सरकार अटक करून तुरुंगात टाकत असे. बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे दिनांक 9 सप्टेंबर 1942 रोजी नंदुरबारात प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषकुमारने हातात तिरंगा घेऊन इंग्रजांना आव्हान दिले. "नही नमसे.. नही नमसे... निशाण भूमी भारत नुं..."  या घोषणेसह प्रभात फेरी नंदनगरीतील गल्लीबोळातून  मध्यवर्ती बाजारपेठेतील आणि आत्ताच्या माणिक चौकात पोहचली.  यावेळी इंग्रजांनी   प्रभात फेरी अडविली.  शिरीषकुमारचा हातात तिरंगा  ध्वज होता. पोलिसांनी प्रभातफेरी विसर्जित करण्याचे फर्मान सोडले. मात्र विद्यार्थ्यांनी वंदे मातरम भारत माता की जय आदी  जयघोष सुरू ठेवला. बालकांनी पोलिसांचे आवाहन नाकारले. अखेर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार सुरू केला. इंग्रज अधिकाऱ्याने मुलींच्या दिशेने बंदूक उगारली असता धाडसी शिरीषकुमारने सांगितले कि, गोळी मारायची तर मला मारा. यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सोडलेल्या  एक, दोन, तीन गोळ्या  शिरीषकुमार मेहताच्या छातीवर  लागल्या. यामुळे शिरीष कोसळला .या गोळीबारात शिरीषकुमार मेहतासह शशिधर केतकर, लालदास शाह,  धनसुखलाल वाणी, घनश्यामदास शाह हे पाचही बालवीर शहीद होऊन धारातीर्थी पडले.  म्हणून नंदनगरीतील माणिक चौकात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले.  आज 78 व्या हुतात्मा दिनानिमित्त नंदनगरीच्या बाल क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम आणि वंदन !  

संकलन - महादू हिरणवाळे, संस्थापक अध्यक्ष शहिद शिरीषकुमार मित्र , नंदुरबार

Wednesday, 9 September 2020

घोडावत कोव्हिड सेंटरला महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी यांची भेट,आहोरात्र कर्तव्य बजवणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य अतुलनीय.

हेरले / प्रतिनिधी
दि.९/९/२०
             हातकणंगले तालुक्यातील घोडावत कोव्हिड सेंटर हातकणंगले तालुक्यातील  गोरगरीब व सर्वसामान्यांचे आधारड ठरत आहे. या सेंटरमधील प्रयोगशाळेतील यंत्रणा अतिशय उत्तम असून व्ही.टी. एम  लेंबलिंग स्वबकलेक्शन,पॅकिंग,आर.टी.पी.आर सॉफ्टवेअरमधील ऑनलाईन एन्ट्री यादी या कार्यासाठी उपजिल्हा आरोग्य अधिकारी कोविड सेंटर प्रमुख डॉ. उत्तम मदने  त्यांचे सहकारी वैद्यकिय सेवा बजावत असणारे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उत्कृष्ठ सेवाभावी वृत्तीने कर्तव्य बजावून कोरोना योध्दा होऊन रुगांना बरे करीत आहेत यांचे कार्य अतुलनिय असून या सेंटरला जिल्हा परिषदेकडून लागणाऱ्या मदतीस तत्पर आहोत .
     असे मत महिला व बाल कल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांनी व्यक्त केले. त्या हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरच्या भेटी प्रसंगी बोलत होत्या. त्यांनी घोडावत कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना दिली जाणारी वैद्यकिय सेवा, औषधोपचार, दिला जाणारा आहार, दिल्या जाणाऱ्या वैद्यकिय सेवा, स्वच्छता, आवश्यक असणाऱ्या वैद्यकिय सेवा आदीची माहिती डॉ. उत्तम मदने यांच्याशी चर्चा करून घेतली.
                घोडावत कोव्हिड सेंटरप्रमुख  डॉ. उत्तम मदने व  व्यवस्थापक विनायक बोरनाके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर आरोग्य निरीक्षक लोले आदीचे सहकार्य मिळत आहे.प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सागर पवार,के.एस. खतीब,एस. बी.टोपकर, रुपल पांढरपट्टे, संजय गायकवाड, नितीन चौगुले आरोग्य सेवक संदीप कुंभार,मारुती लेंगरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर सुलतान मोकाशी, विशाल कांबळे, अभिनंदन खोत, पिंटू तांबेकर आदी कर्मचारी वर्ग या जीवघेण्या कोरोना विषाणू संसर्ग महामारीत स्वतःला झोकून देऊन अहोरात्र काम करत आहेत. यांच्या सेवेचा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होत असून मोठया प्रमाणात या आजारातून रूग्ण बरे होऊन घरी सुखरूप जात आहेत.

        फोटो 
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरच्या भेटी प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ.पद्माराणी पाटील डॉ. उत्तम मदने यांच्याकडून माहिती घेतांना.

Tuesday, 8 September 2020

कोल्हापूरात पुन्हा जनता कर्फ्यू ?नागरिकांमध्ये संभ्रम



कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गात नवव्या स्थानावर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. मे महिन्यात केवळ दोन अंकी बाधित संख्या असणाऱ्या कोल्हापूरची रुग्ण संख्या तब्बल तीस हजार कशी झाली याचे उत्तर नाही. जवळपास हजारावर मृत्यू निव्वळ कोरोना मुळे झाले आहेत. पण लोकांना अजूनही काही गांभीर्य नाही असे वाटते. 

जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील  अनेक नागरिक, लोकप्रतिनिधी, मोठे व्यापारी यांनी शहरात जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी करत आहेत . मात्र यास अनेक छोटे-मोठे भाजीपाला, फळविक्रेते, व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे. याला अनुसरून सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. यामुळे कोल्हापूरात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करणार असे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच केवळ सहा दिवसांचा आणि पोकळ, दिखाऊ जनता कर्फ्यू न लावता कडक अंमलबजावणी करण्यात यावी असाही सुर नागरिकांमध्ये उमटत आहे. 
मागील लॉकडाऊन वेळी दुचाकी व चारचाकी वाहने बिनधास्त फिरत होती. एमआयडीसी व इतर ठिकाणी कामगार कामाला जात होते. लोक खरेदीसाठी गर्दी करत होते. त्यामुळे असाच जनता कर्फ्यू असेल तर त्याचा उपयोग काय ? 
म्हणून जनता कर्फ्यू लागू करणार असाल तर दुध आणि वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व बंद म्हणजे कडक बंद करायला हवे अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्यस्तरीय कोर कमिटीवर शिवाजी पाटील यांची निवड

     पेठ वडगांव / प्रतिनिधी
                  दि.8/9/20                                  राजेंद्र कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सप्टेंबर शिक्षक दिनी झालेल्या ऑनलाइन सभेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कार्यरत महाराष्ट्र राज्य शारीरिक  शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या राज्यस्तरीय कोर कमिटीचे नूतनीकरण करण्यात आले. या कोर कमिटीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून  शिवाजी पाटील क्रीडा शिक्षक आदर्श विद्यानिकेतन मिणचे यांची निवड करण्यात आली. शारीरिक शिक्षणातील व क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शारीरिक शिक्षण महासंघात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    या निवडीवर प्रतिक्रिया देत असताना शिवाजी पाटील यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रात निर्माण होत असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या पदाचा नक्कीच वापर होईल असा आशावाद व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे . क्रीडा क्षेत्रात काम करत असतान  त्यांना प्राचार्य डी एस घुगरे, मनोहर परीट, अजित पाटील, राजेंद्र कोतकर तसेच जिल्ह्यातील शारीरिक शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Monday, 7 September 2020

सत्संग मंडळाच्या वतीने दहा सप्टेंबर रोजी वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन.

उदगीर प्रतिनिधी :- गणेश मुंडे  वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना उदगीर सत्संग मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवार दिनांक एक सप्टेंबर2020 रोजी शरीर त्याग करून शिवैक्य झाले.राष्ट्रसंत गुरुमाऊली यांचे उदगीर व परिसरातील भक्तावर निस्सीम प्रेम होते.सत्संग,शिवनाम सप्ताह, परमरहस्य पारायण,शिवदिक्षा समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज उदगीर येथे येत असत सत्संग महिला मंडळाच्या वतीने उदगीर येथे एकूण 96 सत्संगाचे आयोजन करण्यात आले सत्संगाच्या माध्यमातून आपल्या आशीर्वादातून परमपूज्य राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अमृत उपदेश दिला आहे.गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी नळेगाव रोड उदगीर येथील परमेश्वरी मंगल कार्यालयात श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधीश डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता जंगम अर्चना व दुपारी एक वाजता वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियम व सूचनांचे पालन करून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्त मंडळींनी श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सत्संग मंडळाच्या अध्यक्षा शि.भ. प.शिलाताई मालोदे यांनी केले आहे.

पट्टणकोडोलीत मंगळवार 8 तारखेपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू......


पट्टणकोडोली (साईनाथ आवटे) :

 हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली शहरात कोरोनाने धुमाकूळ घालून शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. गावामध्ये दिवसेंदिवस  रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने  सामाजिक संघटना, संस्था, ग्रुप, मंडळे, व्यापारी व सुज्ञ नागरीक  यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची मागणी ग्रामपंचायतीकडे  केली होती. या मागणीनुसार  सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी ताबडतोब मिटिंग घेऊन मंगळवार.8 ते 12 सप्टेबर पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करणार असल्याची माहिती दिली.
 अत्यावश्यक सेवा असलेल्या बँका, पतसंस्था कार्यालये पाच दिवस बंद ठेवणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
      या बाबत बोलताना उपसरपंच कृष्णात मसुरकर म्हणाले की शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता सामाजिक बांधिलकी जपत  कोरोना या विषाणूचा संसर्ग  प्रादुर्भाव रोखणेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने कडक नियमांचे फलक लावणे, चौका चौकात गाडी लावून नियमावली सांगण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा विविध उपाययोजना केल्या  जाणार आहेत.
पट्टणकोडोली शहरामधील सर्व प्रभागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन समुह संसर्गा मध्ये वाढ होत असलेचे दिसुन येत असलेमुळे शहरामधील सामाजीक संघटना, संस्था, मंडळे, व्यापारी व नागरीक  यांनी कोरोना संसर्गामध्ये वाढ होत असलेली साखळी तोडणेसाठी शहरामध्ये जनता कफर्यू लागू करुन संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे गरजेचे असल्याबाबतच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या.त्यास अनुसरुन शहरामधील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 :- ग्रामसेवक हे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत.महत्वाच्या मिटींगना हजर राहत नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्य पद्धती बदल वरीष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे उपसरपंच मसूरकर यांनी सांगितले.त्याला उपस्थित नागरिकांनी पाठिंबा दिला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उदगीर तर्फे विविध मागणीचे दिले निवेदन.


उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 

 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उदगीर च्या वतीने दिनांक 07/09/2020 या दिवशी शासनाकडे विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले मागण्या एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक/अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखाची विशेष मदत तात्काळ देण्यात यावी दिनांक 29 सप्टेंबर 2018  ची अधिसूचना रद्द करण्यात यावी जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस वर्ष लागू करावी विस्ताराधिकारी शिक्षण केंद्रप्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांमधून भरण्यात यावी कॅशलेस विमा योजना लागू करावी जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावी Covid-19 चे कर्तव्य बजावताना ज्या शिक्षक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या कुटुंबीयांना तातडीने 50 लाख विमा संरक्षण अनुदान देण्यात यावे.अश्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उदगीर च्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष गणेश हंडरगुळे सर खाजगी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तातेराव मुंडे उपाध्यक्ष कांचन कुमार केंद्रे सर  आर आर जाधव सर  सर सुजित जाधव सर
बी एम बिरादार सर धनराज परगे सर श्री मोरे सर श्री धुमाळ सर इत्यादी सहशिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते

Sunday, 6 September 2020

पावसाने मारली दडी,शेतकरी हतबल.लोकप्रतिनिधी ने लक्ष द्यावे,शेतकरी यांची मागणी

उदगीर प्रतिनिधी:- 

उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी सह परीसरातील गावामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला आहे.डोंगरशेळकी सह परीसरात मृगनक्षञांच्या सुरूवातीला पावसाने चांगली सुरुवात केलीअसता.शेतकऱ्यांनी सोयाबीन,ज्वारी,मुग तुर,उडीद,आदि पिकांची पेरणीही केली. पिके पण चागले आले होते.यात मुग चांगला पिकतोय अशी असा असतांना पाऊस जास्त झाल्यामुळे मुगाची रास ही  खराब झाली.आता सोयाबीन पिक चागंले आले असताना शेंगा भरतेवेळी पावसाने मागील काही दिवसा पासून उघाड दिली आहे.अगोदरच बियांनाची उगवन झाली नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले होते.त्यात कोरोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांचे गणीत पुरते बिघडले आहे.परंतु पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतागृस्त झाला आहे.सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन तुर ज्वारी हे पिके कसदार जमिनीवर  चांगली तग  धरुन  आहेत तर हलक्या क्षेञातील पिकांना पावसाची गरज आहे या आठवड्यात पाऊस न झाल्यास ही पिके पावसा आभावी  करपुण जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चींनतेचे वातावरण आहे.एक दोन दिवसात पाऊस झाला तर सोयाबीन हे पिकेल नाहितर सोयाबीनचे ऊत्पादन फार मोठी  घट होनार आहे.सध्या गरज आहे लोकप्रतिनिधी नी बळीराजायाकडे लक्ष देण्याची. दिनांक 06/09/2020 रोजीचे मंडळनिहाय पर्जन्यमान (मी.मी.मध्ये)
मंडळ विभाग.आजचे.
1)उदगीर 00  (662) 2)नागलगाव 00(504),3)मोघा 00 (551),4)हेर 00(484)5)वाढवणा00(574)6)
नळगीर 00(621),7)देवर्जन 00(495),8) तोंडार 00(512)
आजचे एकून पर्जन्य- 00mm   
आजचे सरासरी पर्जन्य -00mm
एकूण पडलेले पर्जन्य -4403mm
एकूण सरासरी पर्जन्य -550.37mm असे आहे
     युवा शेतकरी यांची प्रतिक्रिया......
या संदर्भात MH9 ला बोलताना म्हणाले की पेरणी केली बियाने उगवले नाही दुबार पेरणी झाली उगवन ही झाली आता पावसाने दडी मारली शेतकरी यांचे नुकसान ही नुकसान होत असुन आर्थिक बाजु दिवसेन दिवस वाईट होत चालली आहे.लोकप्रतिनिधी बळीराजाकडे लक्ष द्यावे असे ही ते बोलताना म्हणाले.

कोरोना महामारीच्या काळात अविनाश बनगे यांचे कार्य उल्लेखनीय- पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा


हातकणंगले / प्रतिनिधी
    प्रशांत तोडकर
        चोकाक ता.हातकणंगले येथील अविनाश बनगे यांनी कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत हातकणंगले पोलीस ठाण्यास मास्क,सॅनिटायझर, व जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करून पोलीस प्रशासणाबद्दल आपुलकी दाखवली त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक प्रणिल    गिल्डा यांनीकेले.हातकणंगले पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना काळात पोलीस प्रशासनास मदत केलेल्या मान्यवरांच्या सत्कार प्रसंगीं ते बोलत होते.
     अविनाश बनगे यांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी दिग्विजय देसाई,मधुराज धम्म दीक्षित,यांचेसह पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.
     फोटो 
चोकाक येथील अविनाश बनगे यांचा सत्कार करताना पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा