कोडोली हायस्कूल मधून सन 1998 साली 10 वी नंतर पुढील शिक्षणासाठी इतरत्र विद्यार्थी गेले. तेव्हा मोबाईल सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे इयत्ता दहावी पर्यंत सोबत असणारे लहानपणीचे मित्र संपर्कात राहणे अश्यक्य होते. यातच 15 ते 18 वर्षे निघून गेली. यातील जवळच असणारे काही मित्र एकमेकांच्या संपर्कात होते. पण उर्वरित मित्रांचे संपर्क हे रणजित घाटगे आणि प्रदीप जाधव यांनी शोधून काढायचे ठरवले आणि ते व्हॉटसअप, फेसबुक आदी मार्गांनी अत्यंत जिकिरीने मिळवले. पुढे त्यातूनच प्रत्यक्ष भेटण्याची आतुरता सर्वांना लागून राहिली. या संकल्पनेतून 2016 साली पहिला स्नेहमेळावा संपन्न झाला. यासाठी अमेरिकेत काम करत असताना मित्रांना भेटायचेच अशा निष्ठेने सुकुमार साळोखे, नाशिक हून नागेश मोहिते असे अनेक मित्र जे आज संपूर्ण भारत देशात आपापला व्यवसाय किंवा उद्योग, नोकरी, सामाजिक आणि राजकीय कार्य याच्या निमित्ताने दूर असले तरीही अनेक विद्यार्थी मित्र एकत्र आले. यानंतर दरवर्षी या स्नेहमेळाव्यात मित्र भेटू लागले, एकमेकांशी हितगुज साधू लागले. आणि याच हितगुजाचा मेळा घडवून आणण्यासाठी याही वर्षी रविवार दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजी मोहरे ता. पन्हाळा येथील शेळके रिसॉर्ट व लॉन येथे निसर्गरम्य वातावरणात स्नेहमेळावा आयोजित केला होता. यानिमित्त उत्कृष्ठ असे घरगुती पद्धतीचे जेवणाचे नियोजन केले होते. यास पन्नास हून अधिक विद्यार्थी आले होते. कार्यक्रम संपन्न झाले नंतर आनंदाने एकमेकांचे आभार व्यक्त करत सर्वांनी निरोप घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने मच्छिंद्र पाटील, संतोष मोरे, भरत कडवेकर, दिपक गायकवाड, शिवाजी पाटील, धीरज जाधव, विक्रांत पाटील, महेंद्र बिळासकर, सचिन मेनकर, प्रवीण लोखंडे, संदिप काशिद आदींनी परिश्रम घेतले. प्रकाश शिणगारे व विजय महापुरे यांनी सर्वांची नोंदणी करून छान प्रकारे आर्थिक नियोजन केले.