कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.२१/११/२०
सद्याचे केंद्र सरकार शेतकरी कामगार व शिक्षण विरोधात असल्याने २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत निर्णय झाला. ही सभा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहामध्ये आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी एस.डी. लाड होते.
संविधान दिना दिवशी होणारा संप संविधान वाचविण्यासाठी असून तसेच केंद्र सरकार शेतकरी कामगार व शिक्षण कायदयांच्या विरोधात आहे. नविन शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संपा दिवशी संस्थाचालक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सकाळी ११ वाजता संग्राम उदयान (टाऊन हॉल )या ठिकाणी जमावे असे आवाहन एस डी लाड यांनी केले.
या सभेस शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख, अध्यक्ष सुरेश संकपाळ , सचिव दत्ता पाटील, भरत रसाळे, प्रा.सी एम गायकवाड, सुधाकर निर्मळे, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, संतोष आयरे, सुधाकर सावंत, राजेश वरक, आर.डी. पाटील, प्रा.एन. आर. भोसले, मिलींद पांगिरेकर, इरफान अन्सारी, जगदीश शिर्के, आर एस बरगे आदीसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड सचिव दत्ता पाटील वसंतराव देशमुख सुरेश संकपाळ भरत रसाळे व अन्य मान्यवर