हेरले/ प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील डेडिकेटेड कोविड-१९ हेल्थ सेंटर एसजीयु मध्ये ७ हजार ४३९ नॉनकोविड सह उपचारासाठी रूग्ण दाखल होते, त्यापैकी ३८५० रूग्ण पॉझिटिव्ह होते त्यांच्यावर उपचार होऊन कोरोनामुक्त झाले तर ५४ जणांचा मृत्यू झाला.११ एप्रिलपासून हे कोविड सेंटर सुरू असून या सेंटरचे प्रमुख सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने सव्वासात महिने वास्तव्यास असून आहोरात्र सेवा देत कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या या अतुलनिय सेवेमुळे हातकणंगले तालुक्यास हे कोविड सेंटर गोर- गरीब जनतेस आधारवड ठरले आहे.
कोल्हापूर जिल्हा अधिकारी दौलत देसाई , मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तत्कालीन बीडीओ अरूण जाधव , तहसिलदार प्रदीप उबाळे, उदयोगपती संजय घोडावत महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने एसजीयु कोविड सेंटर ११ एप्रिल रोजी सुरू झाले. या सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. उत्तम मदने कार्यरत राहून पदभार सांभाळत आहेत.
या सेंटरमध्ये बाह्यरुग्ण कक्ष, अंतररूग्ण कक्ष, औषध भांडार विभाग, स्वॅब टेस्ट व अँटीजन टेस्ट प्रयोगशाळा कक्ष, एक्सरे कक्ष, जेवण विभाग रूग्णांना साहित्य पुरवठा आदी विभाग कार्यरत आहेत. डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग सेवा बजावत असून आरोग्य सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शैलेंद्र पाटील, डॉ. रूपाली किनींगे, डॉ.शोएब पटेल, डॉ. सविता बडबडे ,डॉ.अमोल नरदे, डॉ. कोमल खेडकर, डॉ.पूजा पाटील, डॉ. स्नेहा पुजारी, डॉ. आरती अळदी, डॉ. ललिता गायकवाड, डॉ.हर्षल शिखरे,डॉ. जिनेश्वरी मानगावे, डॉ. सुकन्या पाटील. डॉ. स्नेहल लवटे, डॉ. पूजा जाधव, डॉ. तेजस्विनी पाटील, डॉ.निकीता कोळी, डॉ. अंजली फुटाने ,डॉ.मयुरी खोत आदी१९ डॉक्टरांनी कोरोना योध्दा म्हणून सेवा बजावत रूग्णांना कोराना मुक्त केले आहे. चौदा लॅब टेक्निशयन, एक एक्सरे टेक्निशयन, दोन सुपरवायजर , सात डाटा ऑपरेटर, एक ईसीजी टेक्निशयन, चवेचाळीस आरोग्य सेविका , बावीस वॉर्डबॉय , अकरा सफाई कामगार , तीन सिक्युरिटी गार्ड आदीजण सेवा बजावत आहेत, यांचीही सेवा कोराना योध्दयांचीच आहे. चार इमारतीमध्ये एच सिक्समध्ये २५२बेड, एच सेवन -२५२, एच एठ- २९४, एच नाईन - २५५ बेड असे एकूण १०५३बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सेवेस उपलब्ध आहे. या पैकी ७o ऑक्सिजन बेड होते सद्या वाढवून ११० आहेत. पुढील धोका ओळखून सहा हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन टॅक बसवून २१० ऑक्सिजन बेडचे नियोजन केले आहे. सर्व रुग्णांना औषधे, इंजेक्शन्स, आवश्यक लागणाऱ्या वस्तू जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून पुरवठा होत आहे.
या सेंटरमध्ये २१ एप्रिलमध्ये पहिला कोविड रूग्ण उपचारासाठी दाखल झाला. आतापर्यंत २४३०७ बाह्य रुग्णांची तपासणी केली आहे. त्यापैकी ७४३९रूग्ण उपचारासाठी दाखल झाले त्यापैकी ३८५o रूग्ण पॉझिटिव्ह होते. त्यांच्यावर योग्य उपचार करून कोरोना मुक्त केले.पैकी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत सेंटरमध्ये १५४०८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. १९४१ जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली. या कोविड सेंटरमध्ये तपासणीतील २८२६ जणांची तपासणी अंती पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.यामध्ये कोविडचे काही लक्षणे नाहीत, सौम्य लक्षणे , मध्यम लक्षणे ,तीव्र लक्षणे आदी चार प्रकारान्वये रुग्णांवर सात ते अकरा दिवसापर्यंत औषधोपचाराचे किट देऊन उपचार केले जातात. तीव्र लक्षणांच्या रुग्णांवर रेमडीसिव्हर इंजेक्शन देणे,ऑक्सीजन लावणे व लक्षणानुसार औषधे देणे आदी सेवा दिल्या जात आहेत. या कोविड सेंटरमध्ये चार इमारतीमध्ये - काही लक्षणे नाहीत (२००२ रुग्ण ), सौम्य लक्षणे ( २७८४ रूग्ण), मध्यम लक्षणे ( १९४८ रुग्ण), तीव्र लक्षणे ( ३४५८रूग्ण) आदी रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.४१ रुग्णांना संदर्भ सेवेसाठी कोल्हापूरला पाठविण्यात आले आहे. सकस व उत्कृष्ठ दोन वेळा जेवण, चहा नाष्टा आदी आहाराची सेवाही रूग्णांना दिली जाते. संसर्ग वाढल्याने रुग्णांची संख्या जुलै ,ऑगस्ट, सप्टेबंर, ऑक्टोबंर या चार महिन्यात जास्त होती. संसर्ग कमी झाल्याने सद्या रूग्ण संख्यात घट झाली आहे. क्यूअर रेट ९९.३० असून डेथ रेट ०.७३ इतका आहे.अशी माहिती प्रसार माध्यमांना डॉ. उत्तम मदने यांनी दिली.
या कोविड सेंटरला हातकणंगले तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास कोरे , डॉ. राहूल देशमुख ( हेरले ), डॉ.जेसिका अॅडरुंज ( शिरोली ), डॉ. रामेश्वरी ( सावर्डे), डॉ.हर्षद बोरगावे ( साजणी), डॉ. रिजवाना बोरगावे (पट्टणकोडोली ), डॉ. माहेश्वरी उंबरजकर (भादोले), डॉ. राजवर्धन कदम ( हुपरी), डॉ. ठाकरे ( आळते), डॉ. शैलेंद्र गायकवाड ( अंबप ) आदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांची सेवा व सहकार्य लाभल्याने हातकणंगले तालुक्यातील कोविड रुग्णसंख्या घटली आहे.