प्रतिनिधी सतिश लोहार
**
इचलकरंजी येथे चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत सुरू झालेल्या ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या वतीने डॉ.ज्योती बडे निर्मित नजराणा ब्रँड च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रोप वाटप कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास इचलकरंजीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय महाजन गुरुजी व वृक्षसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या सौ. चित्कला कुलकर्णी या उपस्थित होत्या. डॉ.ज्योती बडे यांनी स्वागत करून नजराणा ब्रँड च्या कामाची माहिती दिली. यानंतर चांगुलपणाच्या चळवळी च्या कार्यकर्त्या न्या. दिलशाद मुजावर यांनी शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्षा शैला कांबरे यांनी चांगुलपणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व नेत्रदान आणि देहदान करावे असे आवाहन केले.डॉ.दशावतार बडे यांनी नेत्रदान,देहदान,अवयव दान याबाबत शास्त्रोक्त माहिती दिली. शैला कांबरे यांच्या संकल्पनेतून नेत्रदान व देहदान संकल्प यासाठी ज्ञानेश्वर मुळे सरांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने नेत्रदान certificate वाटप करण्यात आले. डॉ.दशावतार बडे,डॉ.ज्योती बडे ,ऋत्विक बडे,देविका बडे,मनोहर कांबरे,शैला कांबरे, पुष्पा साळी, तुकाराम मोटे, नेहा काजवे,डॉ.वंदना बडवे यांनी नेत्रदान संकल्प जाहीर केला. नेत्रदान व देहदान संकल्प केलेल्या दात्यांचे सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.चित्कला कुलकर्णी यांनी वृक्षा मुळे होणारे फायदे सांगून वृक्ष लावा असा संदेश दिला.सध्याच्या कोरोना परिस्थितीस अनुसरून महाजन गुरुजी यांनी विविध रोगांवर लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती सांगून वृक्षांचे महत्त्व विशद केले.सक्रिय कार्यकर्ते
संजय परीट सर यांनी कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक मुक्ती हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी एक होऊन काम करू असे आवाहन केले. तसेच आदरणीय डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.चांगुलपणाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मुळे फाऊंडेशन च्या गेल्या दीड वर्षातील उपक्रमांच्या डॉक्युमेंट्स फाईल्स चे अनावरण गोधडी स्पेशालिस्ट विद्या गायकवाड, बिझिनेस वूमन श्रध्दा सातपुते, इंजिनिअर स्नेहा बडे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांना ज्योती बडे यांनी स्वतः तयार केलेल्या रोपांचे वाटप करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगुलपणाच्या चळवळी चे सच्चे कार्यकर्ते प्रा.श्री .मनोहर कांबरे यांनी उत्कृष्टपणे केले.चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.