हातकणंगले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील आदिनाथ नगरमध्ये जैन मंदिराच्या समोर सामाजिक सभागृहाचा पाया खुदाई शुभारंभ संपन्न झाला.
आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, पंचवीस पंधरा या फंडातून दहा लाखाचा फंड या सभागृहास दिला आहे. तसेच
गावच्या विकासासाठी आमदार फंडातून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्नशील असेन. माजी सभापती राजेश पाटील म्हणाले मंदीर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या फंडातून यथाशक्ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील असेन असे मत व्यक्त केले.
ते सामाजिक सभागृहाच्या पायाखुदाई शुभारंभ सदिच्छा भेट प्रसंगी बोलत होते. आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते पाया खुदाई शुभारंभ व भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी सुरेश चौगुले यांनी कॉलनीमध्ये विकास कामाची मागणी केली.याप्रसंगी जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील, उपसरपंच राहूल शेटे, पोलीस पाटील नयन पाटील, राजू कचरे ,ए बी चौगुले, अमोल पाटील आदी मान्यवरासह जैन समाजाचे बांधव उपस्थित होते.
फोटो
हेरले येथील आदिनाथ नगरमध्ये सामाजिक सभागृहाचा पाया खुदाई शुभारंभ करतांना आम. राजूबाबा आवळे माजी सभापती राजेश पाटील संचालक आदगोंडा पाटील व इतर मान्यवर.