हेरले / प्रतिनिधी
दि.22/11/20
हेरले (ता. हातकणंगले) येथील विराचार्य सेवाभावी संस्थेच्यावतीने गावातील रुग्णांची रुग्णवाहिके अभावी होणारी हेळसांड थांबावी.त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना व्हावा या हेतूने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माजी सभापती राजेश पाटील व जवाहर संचालक आदगोंडा पाटील यांच्या हस्ते येथील झेंडा चौक याठिकाणी सपंन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विराचार्य सेवाभावी संस्थेचे विशेष कौतुक केले.
यावेळी सुहास कोरेगावे,माजी उपसभापती अशोक मुंडे,डॉ प्रविण चौगुले, जिंनगोंड पाटील,अरविंद चौगुले,प्रकाश चौगुले ,शरद आलमान , प्रकाश पाटील,सतीश पाटील,बापू कोरेगावे,विशाल पाटील,अमित इंगळे,रावासो माने,कार्तिक कोळेकर व गावातील नागरिक उपस्थित होते.
फोटो
:हेरले: येथे विराचार्य सेवाभावी संस्थेच्यावतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करत असताना माजी सभापती राजेश पाटील,जवाहर संचालक आदगोंडा पाटील,जिंनगोंडा पाटील व आदी मान्यवर.