हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.8/11/20
मार्च 2020 पासून आपला देश व राज्य कोवीड सारख्या महाभयंकर रोगाचा सामना करीत आहेत. कोवीड संसर्ग होऊ नये या पार्श्वभूवीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या जनरल सभा घेण्यास महाराष्ट्र शासनाने दि .31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .
आर्थिक वर्षात झालेला नफा विभागणीस मंजूरी देण्याचे सर्वाधिकार जनरल सभेस असल्याने व सध्याच्या काळात जनरल सभा घेणे शक्य नसल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक 2/11/2020 च्या अद्यादेशाद्वारे संचालक मंडळास नफा विभागणीचे अधिकार दिले असून डिव्हिडंड वाटपास परवानगी दिली आहे.
सदर अद्यादेशाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक बँक , कोल्हापूरसह सर्वच नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळास सन 2019-20 चा नफा विभागणी करुन डिव्हडंड वाटपाचे अधिकार देणेबाबत आपणांकडून निर्देश व्हावेत व सर्व सभासदांची दिवाळी अधिक गोड करावी अशी मागणी रिझर्व्ह बँकेकडे प्राथमिक शिक्षक बँक संचालिका लक्ष्मी पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सभासदांना डिव्हिडंड मिळावा म्हणून शिक्षक नेते मोहनभोसले ,जनार्दन निउंगरे ,एन.वाय.पाटील ,बाळासाहेब निंबाळकर , शिक्षक संघ जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनिल पाटील ,रघुनाथ खोत ,रवींद्र भोई,दुंडेश खामकर,अरुण चाळके ,मधुकर येसणे,किरण शिंदे ,प्रकाश मगदूम ,विजय भोसले , प्रकाश सोहनी ,सुनील एडके , नंदकुमार वाईंगडे ,अशोक पाटील तिरपनकर ,शिवाजी रोडे पाटील ,प्रकाश येडगे,भीमराव रेपे,रोहिणी लोकरे ,वैशाली कोंडेकर ,नूतन सकट ,संगीता खिलारे ,प्राजक्ता जाधव आदिंनी शिक्षक बँकेकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली असल्याचे संचालिका लक्ष्मी पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिले आहे.