इचलकरंजी /प्रतिनिधी
दि.17/10/21
समाजातील वंचित निराधार लोकांना मायेचा आधार देत सामाजिक बांधिलकी जपत आभाळमाया संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा लक्ष्मीताई पाटील या संस्थेच्या माध्यमातून त्या विविध कार्यक्रमाद्वारे समाजभान जपत आदर्शवत कार्य करत आहेत.नवचैतन्य बालगृहातील विद्यार्थ्यांनी स्वच्छ आचरण स्वकर्तृत्वातून स्वतःच्या जीवनाचे नंदनवन फुलवावे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील व्यक्त केले.दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्यसाधतआभाळमाया शैक्षणिक सामाजिक सेवा संस्थेने नवचैतन्य बालगृह इचलकरंजी येथील ६० गरजू होतकरू मुलांना शालेय दप्तर शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप केला या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पाटील म्हणाल्या की, समाजातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य भेट देऊन आभाळमाया संस्था त्यांना शिकण्याचे बळ देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवीकुमार पाटील यांनी बालगृहातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत समाजातील होतकरू गरजू मुलांकरिता समाजातील दानशूर हातांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी राजू बिद्रेवाडी , सुनील एडके ,तुषार पाटील, रमेश पाटील,संतोष कोळी, बाळासाहेब नंदगावकर ,अजित वारके ,सविता पाटील, शुभांगी सुतार ,उषा नंदगावकर, बाजीराव पाटील, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वह्या खाऊ भेट देण्यात आला. तुषार पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो
नवचैतन्य बालगृहातील विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतांना