हेरले / प्रतिनिधी
दि.2/10/21
हालोंडी (ता.हातकणंगले) येथे आमदार राजूबाबा आवळे जि.प.सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व पंचायत समिती सदस्य मेहरनिगा जमादार यांच्या फंडातून मंजूर झालेल्या पाणंद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे, माजी सभापती राजेश पाटील व पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार यांच्या हस्ते संपन्न झाले.
हालोंडी गावांमध्ये शेती व्यवसाय प्रामुख्याने केला जातो व ऊसाचे नगदी पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावात पावसाळ्यात सर्वत्र नदीचे पाणी येत असल्याने शेतक-यांना शेतीकडे जाणे कठीण होते. त्यामुळे गावांतील पाणंद रस्त्यांचे मुरुमीकरण करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी आमदार राजूबाबा आवळे यांनी आपल्या फंडातून पाच लाख रुपये जि प सदस्या डॉ.पद्माराणी पाटील यांच्या फंडातून पाच लाख रुपये व हातकणंगले पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांच्या फंडातून दोन लाख रुपये असे बारा लाख रुपये पानंद रस्ता मुरूमीकरणासाठी विकास निधी मंजूर करून कामास सुरुवात केली आहे. तसेच उर्वरीत गावातील शेतीकडे जाणारे पाणंद रस्त्याचे पुढील काळात मुरुमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे लोक प्रतिनिधी यांनी ग्वाही दिली.
या प्रसंगी सरपंच जयश्री कोळी,उपसरपंच महावीर पाटील, सुनिल पाटील, मुनिर जमादार ,अजित पाटील, दिपक शेटे, चंद्रकांत माने, किरण कांबळे, बदाम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
हालोंडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार राजूबाबा आवळे, माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांचा सत्कार करतांना सरपंच उपसरपंच व मान्यवर