हेरले / प्रतिनिधी
दि.22/10/21
हेरले (ता. हातकणंगले)येथील नूतन उपसरपंच पदी फरीद बादशहा नायकवडी यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी चौगुले होत्या.
स्वाभिमानी गावविकास आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच सतीश काशीद यांनी राजीनामा दिला त्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. आज शुक्रवार उपसरपंच पदाकरिता स्वाभिमानी गावविकास आघाडी कडून फरीद नायकवडी यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी आघाडी कडून बथुवेल कदम यांनी अर्ज दाखल केला.
अर्ज माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने उपसरपंच पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये फरीद नायकवडी यांना १३ व बथुवेल कदम यांना ५ मते मिळाली. यामध्ये फरीद नायकवडी विजयी झाल्याची घोषणा सरपंच आश्विनी चौगुले यांनी केली.४० वर्षानंतर स्वाभिमानी गावविकास आघाडीकडून मुस्लीम समाजास उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे.निवडीनंतर स्वाभिमानी गावविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी आघाडीचे नेते माजी सभापती राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील,मुनिर जमादार ग्रामपंचायत सदस्य राहुल शेटे,विजय भोसले, आशा उलसार, अपर्णा भोसले, विजया घेवारी, शोभा खोत, स्वरूपा पाटील, मजिद लोखंडे, रिजवाणा पेंढारी, सतीश काशीद,मिना कोळेकर ,निलोफर खतीब, बथुवेल कदम,शरद आलमान,आदिक इनामदार, आरती कुरणे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, संदिप शेटे आदी उपस्थित होते.