हातकणंगले / प्रतिनिधी
दि.24/10/21
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरू करावे या मागणीचे लेखी निवेदन शेतक-यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना दिले.
लेखी निवेदनातील आशय असा की, गावठाण ते पाझर तलाव रस्त्यालगत आमच्या जमिनी आहेत सदर रस्त्याची सुधारणा ही गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होत आहे याकरिता शेतकऱ्यांनी विनामोबदला आपल्या मालकीच्या जमिनी बक्षीसपत्रांनी दिले असून ग्रामपंचायतच्या ठरावानुसार गावठाण ते पाझर तलाव रस्ता करण्याचे ठरले असून सदर कामाची वर्कऑर्डर तशीच आहे. असे असताना सदर कामाचे ठेकेदार व गावातील तथाकथित पुढारी यांनी सदर रस्त्याचे काम अंदाजे गावठाण पासून ५०० ते ७०० मीटर अंतर सोडून सूरू केले आहे. त्यामुळे सुरुवातीचा रस्ता सोडून पुढे रस्त्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे ठेकेदारांनी ग्रामसभेचे ठरावानुसार वर्कऑर्डर प्रमाणे रस्त्याचे काम करावे. तसे काम न झाल्यास शेतकऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही.
या लेखी निवेदनावर बाळासाहेब थोरवत, विलास सावंत, गुणधर परमाज,जयवंत चौगुले, सतीश चौगुले, सुरेश कांबरे,अविनाश पाटील, अवधूत मुसळे,विलास भोसले, सुनील खारेपाटणे, अमोल झांबरे, विजय चौगुले,अविनाश कांबळे, धोंडीराम काकडे, भाऊसो वाकरेकर, राजू हजारी, मधुकर अकिवाटे आदीसह ७० शेतकऱ्यांच्या सह्या या निवेदनावर आहेत.
रस्त्याचे काम करताना सुरवातीचा भाग ती लांबी अन्य लांबीच्या मानाने सुस्थितीत होती. त्यामुळे खराब भागाचे काम सुरुवातीस चालू केले आहे. ग्रामस्थांच्या गरजेनुसार सर्व लांबीमध्ये निधी उपलब्धतेनुसार रस्त्याचे काम हाती घेण्याचा कार्यालयाचा प्रयत्न असणार आहे.
महेंद्र क्षीरसागर
कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग कोल्हापूर
गावठाण ते पाझर तलाव या रस्त्यासाठी शेतक-यांनी विना मोबादला जमिनी दिल्या आहेत. गावाच्या सुरुवाती पासून जो पर्यंत रस्ता होत नाही. तो पर्यंत शेतकऱ्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही. अशी मागणी माझ्यासह सर्व शेतकऱ्यांची आहे.
शेतकरी- मनोहर चौगले
माजी पोलिस पाटील मौजे वडगाव
फोटो
कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना लेखी निवेदन देतांना मौजे वडगावचे शेतकरी बाळासाहेब थोरवत अविनाश पाटील सुरेश कांबरे व शेतकरी