एकच मिशन 100 टक्के लसीकरण, कोरोना विरुद्धचा लढा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका व श्री दत्ताबाळ मिशन डीव्हाईन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीदत्ताबाळ हायस्कूल कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कोल्हापूर महापालिका उपायुक्त श्री. रविकांत अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. निखिल पाटील, लसीकरण मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ अजितकुमार पाटील, श्री दत्ताबाळ मिशन डीव्हाईनच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. पल्लवी देसाई, संस्थेचे सेक्रेटरी व माजी नगरसेवक श्री. निलेश देसाई, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सचिन डवंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी शेवाळे इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती मिठारे आरोग्य कर्मचारी सौ. दिपाली उलपे सौ. मनीषा धनवडे, सौ मंदाकिनी कांबळे, श्री मच्छिंद्र दाते उपस्थित होत्या. यावेळी उपायुक्त अडसुळे साहेब यांनी सर्वांनी मिळून 100 टक्के लसीकरण पूर्ण करु या व संकल्प पूर्ण करू या असे आवाहन केले.
प्रास्ताविक मध्ये नोडल अधिकारी डॉ अजितकुमार पाटील यांनी 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी,पालकांनी या देशाच्या अभियानास कर्तव्यदक्ष राहून लसीकरण करून घेऊन आपण सर्वजण कोरोनाकाळात कोरोनामुक्त राहून आरोग्य चांगले कसे राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे तरच आपण एकविसाव्या शतकातील आदर्श नागरिक म्हणण्यास पात्र आहोत.सर्वांनी आरोग्यबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल सहकार्य करावे असे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री बालाजी मुंडे यांनी केले तर आभार श्री गौरव काटकर यांनी मानले.