कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.2/10/21
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर विद्यार्थी समाज कल्याण शिष्यवृत्ती बाबत समाजकल्याण विभागास दिलेल्या निवेदन संबंधी चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूरचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी शुक्रवारी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास निमंत्रित केले होते. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, संचालिका शिक्षक बँक व महिला अध्यक्षा लक्ष्मी पाटील कोल्हापूर, जिल्हा शिक्षक संघाचे शिष्टमंडळ यांनी सविस्तर चर्चा केली. समाजकल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती बाबत खुलासा करून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले.
शिक्षक संघाने मागणी केल्याप्रमाणे कोणत्याही बँकेचे खाते या शिष्यवृत्तीसाठी चालेल असे लेखी पत्र संघटनेला दिले यापूर्वी फक्त नॅशनलाईज बँकेत खाते चालेल असे पत्र होते मात्र संघटनेच्या मागणीवरून आयएफसी कोड असलेल्या व नेफ्ट किंवा ट्रान्सफर ऑनलाईन होणाऱ्या कोणत्याही बँकेतून ही सुविधा शिष्यवृत्ती साठी देण्याचे मान्य केले.
विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्ती रकमेपेक्षा बँकेत खाते काढण्यास खर्च अधिक येतो . वर्षातून एखादे वेळेस काहीशी रक्कम जमा होते. त्यामुळे बँक हे खाते इन ऑपरेट आहे असे मानतात. त्यामुळे झिरो बॅलन्स खाते काढण्यासाठी बँकांना पत्र काढावे. यावर जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्व बँकांना तसे पत्र काढण्याची कार्यवाही करू,जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत् जिल्हा परिषदेचा स्वतंत्र कॅम्प लावावा व माध्यमिक विभागाचा स्वतंत्र कॅम्प लावा अशी मागणी केली होती. ती जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी मान्य केली ४ तारखेपासून शाळा सुरू होत असल्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा हे कॅम्प घेण्यात येतील व जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळेसाठी स्वतंत्र कॅम्प घेतले जातील असे अभिवचन त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शिष्यवृत्तीसाठी विध्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्यांची सक्ती केली गेली नाही . भारत सरकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती या केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी जातीच्या दाखल्याची मागणी केली आहे.तरीही आपल्या संघटनेची दाखले बाबत मागणी लेखी स्वरूपात वरिष्ठांना कळवितो व त्यांच्या मंजुरीनंतर विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर जी पालकांचे दाखले ग्राह्य धरण्याची प्रक्रिया करू असे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हा नेते रघुनाथ खोत, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील , बाळासाहेब निंबाळकर, सुनील एडके, राजेंद्र माने, शुभांगी सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे प्राथमिक शिक्षक संघास चर्चेनंतर निर्णय झालेले लेखी पत्र जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी पाटील व शिष्टमंडळ यांना देतांना