कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.29/9/21
महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत नियमित अभ्यासक्रमास सोबत राष्ट्रीय छात्र सेनेतील सहभाग आपणास देशसेवेचे आवश्यक असणारे बालकडू तर देतेच शिवाय व्यावहारिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये ही आत्मसात करण्यास बळ देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील पिढ्यानपिढ्या चालत आलेले गुण देश सेवेकरिता नेहमी आत्म प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन ग्रुप कमांडर एनसीसी कोल्हापूरचे ब्रिगेडियर समीर साळुंखे यांनी केले.
सोमवार २० सप्टेंबरपासून एनसीसी भवन कोल्हापूर येथे १६ महाविद्यालयातील एनसीसी छात्र यांसाठी वार्षिक प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरात ड्रील ,फायरिंग , गार्ड ऑफ हॉनर , बेस्ट कैडेट आणि सांस्कृतिक या साठी स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी ब्रिगेडियर समीर साळुंखे बोलत होते. गत दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या बंद झालेली एनसीसीची वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरचे प्रशासन अधिकारी लेफ्टनंट कर्नल किशोर कुमार मोरे यांनी तत्परतेने आणि कोरोनाची खबरदारी घेऊन यशस्वीरित्या केले.
या शिबिरात विवेकानंद कॉलेज कोल्हापुरने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचे पारितोषिक पटकाविले . या वार्षिक प्रशिक्षण शिबिरासाठी लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, लेफ्टनंट प्रशांत पाटील, लेफ्टनंट स्वाती चौगुले, सुभेदार मेजर एच.डी. शिंदे,सुभेदार प्रशांत जमनिक, सुभेदार शिवानंद नागारी, सुभेदार शेटके, कार्यालयीन प्रशासकिय सेवक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक लेफ्टनंट कर्नल किशोर कुमार मोरे यांनी केले. आभार लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट अभिषेक हावळे व आदिती पवार यांनी केले .
फोटो
कोल्हापूर : एनसीसी भवन येथील वार्षिक प्रशिक्षण शिबीरामधील पारितोषिक वितरण समारंभामध्ये ब्रिगेडियर समीर साळुंखे यांच्या सोबत लेप्ट. कर्नल किशोर कुमार मोरे एनसीसी अधिकारी प्रशिक्षक व एनसीसी कॅडेट.