हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले मतदारसंघात आजपर्यंत निराधारांना आधार देण्याचे जेवढे काम आमदार राजूबाबा आवळे यांनी केले आहे तेवढे काम यापूर्वी कोणत्याही आमदारांनी केलेले नाही. ते निराधारांचे खरे आधार आहेत असे गौरवोद्गार संजय गांधी कमिटी सदस्य डॉ. विजय गोरड यांनी काढले.
हेरले (ता.हातकणंगले ) येथे संजय गांधी मंजूर पेन्शन पत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आमदार राजू बाबा आवळे यांची होती.
यावेळी अतिग्रे, चोकाक, माले , हेरले आणि मौजे वडगाव येथील ७६ लाभार्थ्यांना मंजूर पेन्शन पत्राचे वाटप आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी मंडलाधिकारी कोरडे , तलाठी एस ए बरगाले, तलाठी जाधव , तलाठी इंगळे हेरले ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण , हेरलेचे उपसरपंच सतीश काशीद, मौजे वडगावचे सरपंच काशिनाथ कांबळे, राजू कचरे, अर्जुन पाटील, माजी उपसरपंच राहुल शेटे, विद्या चव्हाण, महंमद जमादार, इम्रान पटेल, जावेद हजारी, भगवान कांबळे, कृष्णात सावंत, बशीर हजारी, संजय जंगम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन हसीम मुल्लांनी यांनी केले तर आभार माजी सरपंच रियाज जमादार यांनी मानले.
फोटो
हेरले : आम. राजू बाबा आवळे लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचे वाटप करतांना शेजारी अन्य मान्यवर