हेरले ( प्रतिनिधी )
कोरोना महामारी च्या काळात फ्रन्टलाइन वॉरियर म्हणून आव्हानात्मक कालावधीत covid-19 चे संक्रमण थांबविण्यासाठी लढणाऱ्या श्रीरंग जाधव यांचा लोकसेवा शिक्षण संस्था संचलित बालावधुत हायस्कूल च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे येथील कोविड सेंटरवर बालावधुत हायस्कूल, मौजे वडगाव चे लिपिक श्रीरंग जाधव हे संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथील covid-19 सेंटरमध्ये स्वॅब टेस्टिंग चे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी डेटा ऑपरेटर म्हणून गेले चार महिने कार्यरत होते. सदर केंद्रात त्यांनी डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कामकाज पार पाडले आहे. त्याबद्दल त्यांचा लोकसेवा शिक्षण संस्था संचलित, बालावधुत हायस्कूल च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक सदाशिव चौगुले, अध्यक्ष कराळे सर, उपाध्यक्ष नारायण संकपाळ, सचिव संजय चौगुले, मुख्याध्यापक एस .ए. चौगुले, यांच्यासह शिक्षक ,शिक्षकेत्तर, कर्मचारी पालक, उपस्थित होते.
फोटो
श्रीरंग जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करताना सदाशिव चौगुले, कराळे सर, नारायण संकपाळ, संजय चौगुले, व इतर मान्यवर (छाया सुरेश कांबरे)