कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.21/9/21
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर यांच्या मार्फत शिक्षण आयुक्त कार्यालय प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांना संच मान्यता निकष या संदर्भात लेखी निवेदन देऊन सखोल चर्चा करण्यात आली.
यापूर्वी २०१९ साली व तत्पूर्वी झालेल्या संचमान्यतेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी ६१ च्या पुढे कितीही पट असला तरी 30 पटास १ शिक्षक अशी मान्यता होती व इयत्ता पहिली ते पाचवी साठी मुख्याध्यापक १५१ पटसंख्या निकष असला तरी पात्र शाळेसाठी दहा टक्के सवलत होती म्हणजे १३६ पटा पेक्षा जास्त पट असणाऱ्या शाळेत मुख्याध्यापक पात्रता व पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत १०१ पटास एक मुख्याध्यापक मान्यता होती व त्यातही दहा टक्के पात्र शाळेसाठी सवलत होती म्हणजे ९१ पट असला तरी मुख्याध्यापक पात्र होत होता.
यावर्षी २०२१ ची नवीन संच मान्यता ही आरटीई ऍक्ट २००९ नुसार होणार असून त्यामध्ये मध्यंतरी राज्य सरकारने पत्र काढून जी सवलत दिली होती ती आता असणार नाही. त्यामुळे अनेक चांगल्या शाळा मोठ्या शाळा या शिक्षकांअभावी मोडकळीस येणार असून अनेक मुख्याध्यापक अपात्र होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांवर एकीकडे चांगले काम करूनही, पट वाढवूनही, अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब व बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे म्हणून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर च्या वतीने प्राथमिक विभाग महाराष्ट्र संचालक दत्तात्रय जगताप यांची कार्यालयात भेट घेतली. त्यांनी सर्व बाजूने चर्चा करून विषय समजून घेतला व तशा पद्धतीने वरिष्ठांना कळवण्याची हमी दिली. त्याचबरोबर आधार सक्तीमुळे अनेक शाळांची संच मान्यता अडचणीत येणार आहे त्यासाठी मुदत वाढ द्यावी अशीही मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील, महिला अध्यक्षा लक्ष्मी पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, सुनील एडके, रोहिणी लोकरे, शुभांगी सुतार,सविता पाटील, संगीता खिल्लारे , जी .जी. पाटील आदी पदाधिकारी उपस्थीत होते.
फोटो
पुणे : येथे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांच्याशी चर्चा करतांना जिल्हाअध्यक्ष रविकुमार पाटील लक्ष्मी पाटील , सुनील पाटील व अन्य पदाधिकारी.