पेठ वडगांव / प्रतिनिधी
दि.10/9/21
मिलींद बारवडे
वडगाव विद्यालय जुनियर कॉलेज वडगावच्या माजी विद्यार्थ्यांनी ३० हजार रूपये खर्च करून वृक्षारोपणाच्या उपक्रमातून शाळेच्या निसर्ग सौंदर्यात भर घातली व शाळेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून ३० हजार रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे युनिट शाळेस भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
प्राचार्य आर. आर. पाटील यांच्या आवाहनास विद्यालयाच्या १९८९ च्या दहावी बॅचने प्रतिसाद देऊन शाळेच्या परिसरामध्ये जेसीबीने खड्डे काढून विविध प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण केले. तसेच पी.व्ही. सी. पाईपलाइन करून व ठिबक सिंचनची सोय करून प्रत्येक रोपास कायमच्या पाण्याची सोय केली. शाळेच्या नैसिर्गिक सौंदर्यात भर घालण्याच्या या उपक्रमासाठी ३० हजार रुपये वर्गमित्रांनी वर्गणी काढून खर्च केले. या उपक्रमामध्ये विक्रम माने, मुकुंद पारीसवाड, यु. सी. पाखरे आदीसह त्यांच्या मित्रांनी सहभाग घेऊन आर्थिक मदत केली.
प्राचार्य आर. आर. पाटील यांच्या आवाहनास विद्यालयाच्या १९९६ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी डॉ.भरत भोसले यांनी प्रतिसाद देऊन शाळेस ३० हजार रुपये मदतीचे सी. सी. टीव्ही कॅमेरे युनिट भेट दिले. यामध्ये चार कॅमेरे, डी. व्ही. आर. मशिन व केबल आदी साहित्याचा समावेश आहे. या सीसीटीव्ही कॅमेरे युनिटमुळे शाळेतील सर्व परिसर एका दृष्टिक्षेपात येऊन सर्व विभागावर लक्ष राहण्यासाठी मदत झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिला आघाडी यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून वडगाव विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार महाराष्ट्र राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष प्रविता शिवाजीराव सालपे, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष निर्मला सावर्डेकर ,हातकलंगले तालुका अध्यक्षा सुनिता पोळ , वडगाव शहराध्यक्ष गीता पोतदार , सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्षा रीना घोटणे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष फिरोज बागवान आदी मान्यवरांनी केला.
या प्रसंगी प्राचार्य आर.आर.पाटील, उपमुख्याध्यापक एस. डी. माने, पर्यवेक्षक डी. के. पाटील, कार्यवाह के. बी. वाघमोडे, तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी, डी. एस. शेळके, डी. एस. कुंभार, मिलींद बारवडे, अध्यापिका आर. आर. पाटील, एस. एस. चव्हाण आदी मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
फोटो
वडगांव विद्यालयाच्या १९८९ च्या दहावी बॅचच्या विदयार्थ्यां सोबत प्राचार्य आर. आर.पाटील