*
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर अंतर्गत मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये हराळे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला भारतवीर मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष विलास भोसले सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर राजकुमार पाटील व ज्ञानराज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज ,श्यामची आई ,स्वामी विवेकानंद, बोलणारा गुलाब, चिकट मामा, रणरागिनी झाशीची राणी यासारखी पुस्तके शाळेला म ल ग हायस्कूलच्या शिक्षिका शीतल हराळे यांच्या वाढदिवसानिमित्त गोष्टीची पुस्तक प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी डॉ अजितकुमार पाटील यांनी आज कोरोनाकाळामध्ये पुस्तक वाचन कमी होत आहे साने गुरुजींच्या सारखे उदात्त व्यक्तिमत्व असणारे व्यक्तिमत्व अनमोल ठेवा आहे या ठेवा मध्ये बोधपर कथा वैचारिक लेख यासारखे विचार सध्याच्या युगात महत्त्वाचे आहेत. एकविसाव्या शतकाला प्रेरक ठरणारे आहेत समाजामधील अस्पृश्यता नष्ट होऊन एकता निर्माण होण्यासाठी व शेतकरी कामकरी वर्गाचे दैन्य दारिद्र्य दूर होऊन सर्वत्र समाजवादी स्थापना व्हावी या हेतूने लहान मुले स्त्रिया तरुण दीनदलित यांना सत्वाची जाणीव निर्माण व्हावी व देशाच्या कार्याची उत्तमोत्तम विचारांची देणगी मिळाली असे कार्य साने गुरुजी यांनी या पुस्तकांमधून दिलेले आहे आणि हेच विचार सध्या आधुनिक काळात महत्त्वाचे आहेत. वैचारिक पातळीवर विचार करायचा ते पुस्तक आहे त्याचे वाचन करण्यात यावे असे प्रतिपादन डॉ अजितकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमेजा मुजावर यांनी केले आभार उत्तमराव सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवशंभु गाटे, आसमा तांबोळी ,सुजाता आवटे ,हेमंतकुमार पाटोळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नीलम पाटोळे सारिका कारंडे सोनाली जमदार दीपाली चौगुले स्नेहा दाभाडे नीता घाडगे उपस्थित होते.