हेरले प्रतिनिधी
मौजे वडगाव गावास जास्तीत जास्त विकास निधी देऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन असे मत आमदार राजू बाबा आवळे यांनी व्यक्त केले. ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील त्यांनी 20 लाख रुपयांचा आमदार फंड मंजूर केला आहे. त्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यामध्ये दहा लाख हायमास्टसाठी व दहा लाख गटर्ससाठी दिला आहे.
मुसळे कोपरा, कुंभार कोपरा, झेंडा चौक, लोहार कोपरा, माळवाडी बिरदेव मंदिरासमोर, दसरा चौक, स्मशानभूमी, गावातील शेंडगे कोपरा, चर्मकार समाज व बौद्ध समाज अश्या दहा ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आला आहे. गणेशोत्सवामध्ये हायमास्ट चालू करण्यात आले. यामुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वागत व प्रास्ताविक हातकणंगले तालुका संजय गांधी कमिटीचे सदस्य डॉ. विजय गोरड यांनी केले.
या प्रसंगी सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष अकीवाटे, पोलीस पाटील अमीर हजारी,तंटामुक्ती अध्यक्ष महेश कांबरे, नितीन घोरपडे, सुनील गरड, नारायण संकपाळ, इम्रान पटेल, संजय जंगम, कृष्णात सावंत, भगवान कांबळे, जावेद हजारी, हायमास्ट कॉन्ट्रॅक्टर मगदूम, संतोष लोंढे, बशीर हजारी, बाळासो बारगिर, तसेच तसेच ग्रामपंचायत सदस्य सरताज बारगिर, अश्विनी लोंढे, तानाजी गोरड, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सतीश कांबरे यांनी मानले.
फोटो
मौजे वडगांव : येथे विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजूबाबा आवळे डॉ. विजय गोरड सरपंच काशिनाथ कांबळे व शेजारी अन्य मान्यवर.