हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे रविवार दि. १२रोजी मारुती मंदिरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत, माने केअर हॉस्पिटल, जयसिंगपूर व भूपाल कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भाजपा शाखा मौजे वडगांव यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी दलितमित्र जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने ,भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील व इतर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अशोकराव माने यांनी शासनाने दिलेल्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी स्वतः पुढाकार घेत असल्याचे सांगितले.तसेच तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये भागातील सर्व गोरगरीब, कष्टकरी जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
हे शिबिर भूपाल कांबळे यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा २२६ लोकांना फायदा झाला .यावेळी भाजपा शाखाध्यक्ष पवन जाधव यांनी योजनेची ओळख करून दिली . डॉ.अभिजित माने व त्यांचे वैद्यकीय युनिट उपस्थित होते. अशोकराव माने यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल ओंकार जाधव यांनी आभार मानले.यावेळी सुनील खारेपाटणे, अमोल झांबरे, राहुल चौगुले, अजमुद्दिन हजारी,शब्बीर हजारी,पवन सावंत,संकेत सोनवणे,सागर कांबळे,निहाल तराळ, विशाल तराळ ,प्रथमेश तोरसकर आदी उपस्थित होते.