एल्फस राज्य सरकार विश्वविद्यालय दिल्ली यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील संभापूर गावचे कर्तव्यदक्ष व विविध पुरस्काराने सन्मानित लोकनियुक्त सरपंच प्रकाश विष्णू झिरंगे यांना रविवारी दिल्ली येथे उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. के. डी.आर्या,जनरल सेक्रेटरी आय. एस. एस. सी. इंडिया युनिव्हर्सिटीचे कुलपती जनरल सेक्रेटरी एन.आय.सी. डी. एस. एस. सी. इंडिया डायरेक्टर जनरल ए.आय. आय. पी. पी. एच. एस. इन्स्टिट्यूट इंडिया प्रेसिडेंट यु.ए. डब्ल्यू सी इंडिया संभापुर गावचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय भोसले, तानाजी भोसले पापा, सुनिल झिरंगे ,सुभाष उर्फ प्रताप कोकाटे आदी संभापूरचे मान्यवर या कार्यक्रमास दिल्ली याठिकाणी ली मेरिडियन हॉटेलमध्ये उपस्थित होते.
फोटो
हातकणंगले तालुक्यातील संभापूर गावचे सरपंच प्रकाश झिरंगे यांना एल्फस राज्य सरकार विश्वविद्यालय दिल्ली यांच्या वतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करतांना मान्यवर.