हातकणंगले प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या एमपीएसी राज्यसेवा अंतिम परीक्षेतून कोल्हापूर जिल्ह्यातून 7 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसच्या 4 विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली आहे.
अंतिम निकालामध्ये घोडावत अकॅडमीच्या अपर्णा जयसिंग यादव निगवे दुमाला ( ता. करवीर) यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे, ही ईडब्ल्यूएस महिला प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. अपर्णाला संपूर्ण मार्गदर्शन संजय घोडावत इन्स्टिट्यूट फोर एडमिनिस्ट्रेटिव सर्व्हिसेसचे लाभले.
पूजा संजय अवघडे हिची नायबतहसीलदारपदी निवड झाली असून तिने अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. ती मूळची राजारामपुरी, कोल्हापूर येथील आहे.
म्हाळुंगे (ता. करवीर) गावचा विश्वजीत जालंदर गाताडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
हळदी (ता. करवीर) येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक यांची भूमिअभिलेख उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर SGIAS कोल्हापूर ब्रँचमध्ये एकच जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अपर्णा यादव हिने SGIAS मध्ये पूर्व, मुख्य व मुलाखत असे मार्गदर्शन मिळाले. तर विश्वजीत, ऐश्वर्या, पूजा या तिघांनी SGIAS कडून मुलाखतीसाठी मार्गदर्शन घेतले होते.
वरील यशस्वी विद्यार्थ्यांना SGIAS चे विश्वस्त मा. विनायक भोसले सर, डायरेक्टर विराट गिरी, कोल्हापूर ब्रांच प्रमुख अक्षय पाटील, अमोल पाटील, सचिन सिलवत, सूर्यकांत कांबळे, भरत साबळे सर तसेच इतर सर्वांचे सहकार्य लाभले.