हेरले / प्रतिनिधी
सन २०१९ नंतर पराभवाचे अनेक धक्के महाडिक परिवार व कार्यकर्त्यांनी सहन केले आहेत. या पराभवामुळे आपले राजकीय खच्चीकरण झाले होते. पण आपण डगमगलो नाही. अखेर भारतीय जनता पक्षाने आपणास राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. सर्वांच्या सहकार्याने विजयी झालो. अशी प्रतिक्रिया नुतन खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. ते पुलाची शिरोलीत स्वागत प्रसंगी बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक यांचे पुलाची शिरोलीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना साष्टांग नमस्कार घालून खासदार महाडिक यांनी आशिर्वाद घेतला. त्यानंतर महाडिक कुटूंबाच्यावतीने फेटा, शाॅल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार महाडिक यांनी आमचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जिल्हात राजकारण करीत आहे. त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी आपणास संकटात गंभीरपणे पाठीशी उभे राहून सहकार्य करीत आहेत. भारतीय जनता पक्षाने आपणास खासदार करुन फार मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या विश्वासास पाञ राहून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्ष राजकीय निती व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सह टिम भाजपने केलेल्या सहकार्यामुळे आपला विजय झाला असे महाडिक यांनी सांगितले.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून भाजप व महाडिक गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले होते. खासदार महाडिक यांचे दुपारी तीनच्या सुमारास महाडिक यांच्या बंगल्यात आगमन झाले. यावेळी फटक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
चौकट.....
गेली चार वर्षे झाली महाडिक परिवारातील व्यक्तीला निवडणूकीत गुलाल लागला नव्हता. पण येथून पुढे गुलाल लागणार असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार अमल महाडिक, स्वरुप महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, सौ. मंगलताई महाडिक, सौ.ग्रिष्मा महाडिक, विश्वास महाडिक, ओम महाडिक यांचेसह दलितमित्र अशोकराव माने, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, छत्रपती राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, शिवाजी रामा पाटील, विजय पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, धनाजी पाटील, डॉ. सुभाष पाटील, सलिम महात, योगेश खवरे, प्रकाश कौंदाडे, बाळासो पाटील, धनाजी यादव, विजय जाधव, राजहंस पाटील, शितल पाटील, बबन संकपाळ, संदीप तानवडे, सचिन गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
फोटो.....
पुलाची शिरोली येथे नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे औक्षंण करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, प्रसंगी माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वरुप महाडिक,अमल महाडिक,ओम महाडिक आदी.