हेरले / प्रतिनिधी हातकणंगले तालुक्यामध्ये कृषी संजीवनी सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. हेरले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून खुदाई करण्यात आलेल्या विहिरीच्या पाणी पूजन समारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनीर जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत गौतम दादू कुरणे यांच्या शेतामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी हेरलेचे सरपंच प्रतिनिधी संदीप चौगुले,हातकणंगले पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश देशमुख, अभिजीत घोरपडे, विस्तार अधिकारी (कृषी).अर्चना कारंडे, सर्जेराव शिंदे, कृषी सेवा केंद्र चालक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावामध्ये विविध ठिकाणी रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच पंचायत समिती कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती दिली.
फोटो
हेरले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीचे पाणी पूजन मुनीर जमादार करतांना शेजारी अन्य मान्यवर