हेरले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव फाट्यावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची प्रवेशद्वार कमान उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे व शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे यांनी शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार संजयजी राऊतसाहेब यांना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान दरम्यान देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शिरोली सांगली फाटा ते सांगली रोड या राज्य महामार्गावर तीन किलोमीटर आत मौजे वडगाव गाव आहे. पूर्वी फाट्यावरती भले मोठे चिंचेचे झाड होते त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना मोठ्या झाडाची खून लक्ष वेधत होती.परंतु रोडच्या चौपदरीकरण कामाच्या वेळी सदर चे चिंचेचे झाड तोडल्यामुळे गावचे लक्ष वेधत असलेल्या झाडाची खून नष्ट झाली आहे. त्यामुळे गावातील तमाम शिवसैनिकांच्या मागणीनुसार मौजे वडगाव फाट्यावरती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रवेशद्वार कमान उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार संजयजी राऊतसाहेब यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याशी संपर्क साधून सदर प्रवेशद्वार कमानीचे अंदाज पत्रक, ठराव, द्या त्यांच्याशी संपर्क करून कमानी साठी लागणारा निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिली.
फोटो
मौजे वडगाव फाट्यावरती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या कमानीसाठी निधी उपलब्ध व्हावा या मागणीचे निवेदन खासदार संजयजी राऊतसाहेब यांना देताना व स्वागत करताना मौजे वडगाव शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे व शिवसेना ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे