कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी सातवी अंतिम प्रज्ञाशोध निवड परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुका पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.गेली सलग चार वर्षे कागल तालुक्याने प्रथम स्थान टिकवून ठेवले आहे. अशी माहिती प्रसिध्दीस कागल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी
डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.
इयत्ता चौथीमध्ये अंतिम परीक्षेत तालुक्या तून 244 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील 238 विद्यार्थी पात्र ठरले असून पात्रतेची टक्केवारी वा 97.54%0 असून एक विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये असून जिल्ह्यातील सर्वसाधारण 100 विद्यार्थ्याच्या यादीत कागलचे 26 विद्यार्थी समाविष्ट आहेत. तर इयत्ता सातवी मध्ये 118 विद्यार्थी अंतिम परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील 114 विद्यार्थी पात्र झाले असून टक्केवारी 96.61% इतकी आहे. जिल्ह्याच्या सर्वसाधारण 100 च्या यादीत 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चौथी, सातवी एकत्रित निकालामध्ये कागल तालुका प्रथम स्थानावर असून एकूण 46 विद्यार्थी चमकले आहेत.
या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक यांचे मोठे योगदान असून समयदान उपक्रमातर्गत जादा वेळ देऊन मार्गदर्शन केले होते. प्रशासनाच्या वतीने देणगीदारांच्या मार्फत तालुका स्तरावर चार सराव चाचण्यांचे नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेस जिल्ह्यातील चौथी सातवी च्या वर्गात शिकणारे जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी प्रविष्ठ
होतात. या यशात केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, पालक, विस्तार अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.