मौजे वडगांव ( ता . हातकणंगले)येथे सद्गुरु विनयानंद महाराज तथा के.डी. धनवडे यांच्या पंचधातूच्या मुर्तीची "प्राणप्रतिष्ठा " सोहळा श्री सदगुरु निरंजन महाराज आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शनिवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत श्री सदगुरू विनयानंद महाराज यांच्या मुर्तिची नगर प्रदक्षिणा मौजे वडगाव गावातून श्री नारायण एकल महाराज यांच्या उपस्थितीत पूर्ण उरण्यात आली. या प्रसंगी नागांव, संभापूर ,हमिदवाडा, हेरले या गावातील टाळकरी व पट्टणकोडोली गावातील ढोल वादक व भक्तगण सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी साडे सहा वाजता आचार्य अरुण टोपकर यांच्या मार्गदर्शना - खाली श्री सदगुरू विनयानंद महाराज यांच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सौ व श्री विवेक धनवडे यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला. सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री भजनी मंडळ हेरले यांचे भजन संपन्न झाले. तदनंतर हरिभक्त पारायण लक्ष्मण कोकटे महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले.
या प्रसंगी दीपक केळकर महाराज, नंदू माणगावकर महाराज ,शामराव बत्ते महाराज, सागर महाराज शामसुंदर महाराज, अभिनव कल्मेश्वर महाराज, बसवप्रभू महाराज, अत्री महाराज, सुनंदा बहेनजी, आत्मदर्शनचे संजीव कुलकर्णी, सेवानंद महाराज आदी मान्यवरांचा सत्कार मठाधिपती आदीनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. महाप्रसाद वाटप झाले नंतर दुपारच्या सत्रात दत्ता कुंभार (घालवाड ) यांचे एकतारी भजन संपन्न झाले. सहा ते आठ ह.भ.प. लक्ष्मण कोकाटे ( बारामती) यांचे 'सदगुरू सारखा असता पाठिराखा' या अभंगावरती कीर्तन झाले. सदगुरू निरंजन महाराज चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब देसाई यांनी भक्तांच्या उपस्थिती बद्दल कृतज्ञता वक्त केली व कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, गोकूळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण नरके,शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,
शिरोली एमआयडी पोलिस ठाणे प्रमुख सपोनि सागर पाटील, ह.भ.प. भाऊसाहेब पाटील, विरशैव बँकेचे माजी चेअरमन तथा विश्वप्रभा उद्योग समुहाचे प्रमुख राजेंद्र शेटे, कार्यकारी संचालक ए.वाय. पाटील, आदी प्रमुख मान्यवरांसह कोल्हापूर जिल्हयातील भक्तगण उपस्थित होते.
फोटो
मौजे वडगांव :आचार्य अरुण टोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरू विनयानंद महाराज यांच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा झाली. या प्रसंगी मठाधीपती आदीनाथ महाराजसह अन्य मान्यवर.