कोल्हापूर प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण समिती संचलित म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बावडा, कोल्हापूर मध्ये शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासनाधिकरी डी सी कुंभार यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मोफत शाहू संस्कार व्यक्तिमत्त्व विकास शिबीर 1 मे पासून सुरू आहे.यामध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी मधील विद्यार्थ्यांना मोफत शिबिर मध्ये ध्यानधारणा, योगासने, एरोबिक्स,झांज पथक,कवायत,कागद काम,तायक्वांदो,इंग्रजी प्रभुत्व,प्रभावी वक्तृत्व,नाटयीकरण,सुदंर हस्ताक्षर,संस्कारक्षम बोधकथा, गणितीय गमती जमती,सर्प आपले मित्र,इत्यादी विषयावर सकाळी 8 ते 11 यावेळेत विविध मार्गदर्शक तज्ञ प्रदीप पाटील,राजेंद्र पाटील,द्वारकानाथ भोसले,संतोष कसबे,तमेजा मुजावर,सुभाष मराठे,सातप्पा पाटील,स्वाती रेळेकर,अरुण सूनगार,तानाजी इंदुलकर,या तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी,बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई यांनी विशेष सहकार्य केले.
सदर शिबिरातील विद्यार्थ्यांना शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,दिलीप माने,विलास पिंगळे,संजय पाटील,बजरंग रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते संजय लाड,भारतवीर मित्र चे सचिन चौगले, राहुल भोसले, यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किटे दिली.
शिबीर यशस्वी होणेसाठी उत्तम कुंभार,सुशील जाधव,तमेजा मुजावर, शिवशंभू गाटे,जोतिबा बामणे,यांनी सहकार्य केले.
आभार व नियोजन शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी नियोजन केले आहे याचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.