हेरले / प्रतिनिधी
आशिष माने यांची SPI औरंगाबाद या संस्थेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे निवड झाली त्यास संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस जयसिंगपूर संस्थेमध्ये संपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
हि परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता असते, या परीक्षा करिता संपूर्ण महाराष्ट्र मधून जवळपास 40 हजार विद्यार्थी या परीक्षेस बसतात त्यातून आशिष माने यांचे अंतिम निवड झाली आहे. या विद्यार्थ्यास संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे ट्रस्टी माननीय विनायक भोसले , संचालक विराट गिरी शाखाप्रमुख सुर्यकांत कांबळे तसेच इतर मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन मिळाले.
संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस जयसिंगपुर मध्ये नवोदया, स्कॉलरशिप, NMMS,SPI, NTSE, NDA इत्यादी सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी ही एकाच छताखाली करून घेतली जाते.